Israel-Iran War Affect India: अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये 11 दिवसांपासून भयंकर युद्ध (Israel-Iran War) सुरूच आहे. युद्धात तेहरानसह अनेक इराणी शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. तर 1332 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. नॉनमध्ये इस्रायली हल्ल्यांमध्ये 339 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.तर अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यामुळे 12 हजार इराणी नागरिक जखमी झाले आहेत. दरम्यान, अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धाचे परिणाम आता भारतावर दिसू लागले आहेत.
आखाती देशातील युद्धाची झळ आता भारतातील लघुउद्योग कंपन्यांना बसणार आहे. युद्धामुळं व्यावसायिक गॅस पुरवठा बंद करण्यात आला आहे. परिणामी पिंपरी चिंचवडमधील पंधरा हजारांपैकी साडे सात हजार कंपन्यांना याचा फटका बसणार आहे. यापैकी काही कंपन्यांमधील गॅसचा साठा तर आजचं संपुष्टात आला आहे. तर काही कंपन्यांचा साठा येत्या चार ते पाच दिवसांत संपुष्टात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Israel-Iran War Affect India)
दिवसाचं उत्पादन थेट निम्म्यावर आलं- (Israel-Iran War Affect India)
भोसरीतील श्री इंजिनिअर्स कंपनीतील व्यावसायिक गॅस संपल्यानं प्लाजमा मशीनचा पर्याय अवलंबला आहे. मात्र दिवसाचं उत्पादन थेट निम्म्यावर आलं आहे. एरवी त्यांचं महिन्याला चाळीस लाखांची उलाढाल होते, पण आजची परिस्थिती पाहता महिन्याकाठी वीस लाखांची उलाढाल घटणार हे उघड आहे. याचा विचार करता साडे सात हजार कंपन्याधील व्यावसायिक गॅस संपुष्टात आल्यावर नुकसानीचा आकडा कोट्यवधीत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उरले सुरले इराणी नेतेही लवकरच मारून टाकू- डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump On Iran Israel War)
दरम्यान या युद्धाच्या झळा जगाला बसू लागल्या असतानाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. युद्ध लवकरच संपेल, अनेक अर्थांनी आम्ही हे युद्ध जिंकलोय असं ट्रम्प यांनी म्हटलंय. इराणचं नौदल, वायुदल आम्ही बेचिराख करून टाकलंय. इराणच्या 5000 ठिकाणांवर आम्ही हल्ला केला. त्यांच्याकडून जगावर अणुहल्ल्याचा धोका होता तो आम्ही उधळला असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. मोजतबा खामेनींची नियुक्ती आपल्याला आवडलेली नाही, कट्टरतावादी विचारसरणीचे उरले सुरले इराणी नेतेही लवकरच मारून टाकू असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
घरगुती गॅस वापरला सरकारचे प्राधान्य- (Israel-Iran War Affect India)
सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्यातील व्यत्यय आणि एलपीजी पुरवठ्यातील निर्बंध लक्षात घेता, मंत्रालयाने तेल रिफायनरीजना अधिक एलपीजी उत्पादन करण्याचे आणि त्या अतिरिक्त उत्पादनाचा वापर घरगुती एलपीजी साठी करण्याचे आदेश जारी केले आहेत. मंत्रालयाने घरगुती एलपीजी पुरवठ्याला घरगुती ग्राहकांना प्राधान्य दिले असून, साठेबाजी/काळ्या बाजाराला रोखण्यासाठी 25 दिवसांचा इंटर-बुकिंग कालावधी सुरू केला आहे. आयातित एलपीजी पासून होणाऱ्या नॉन-डोमेस्टिक पुरवठ्याला रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांसारख्या आवश्यक नॉन-डोमेस्टिक क्षेत्रांना प्राधान्य देण्यात येत आहे.
