पिंपरी: हगवणे जेसीबी विक्री प्रकरणी आता थेट इंडसइंड बँक चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे. म्हाळुंगे पोलिसांनी बँकेच्या लीगल डिपार्टमेंटला आज चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तक्रारदार प्रशांत येळवंडे यांनी हगवणेकडून खरेदी केलेला जेसीबी नेमका कोणी जप्त केला? जप्त करून ठेवण्यात आलेल्या गोडाऊनमधून शशांक हगवणेने त्याचा ताबा कसा काय घेतला? याचं गूढ उकलण्यासाठी बँकेची चौकशी केली जाणार आहे. शशांक आणि लता हगवणे या माय-लेकाने येळवंडे यांची 11 लाख 70 हजारांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी माय-लेकाला 6 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर म्हाळुंगे पोलिसानी थेट इंडसन बँकेला चौकशीच्या फेऱ्यात घेतलेलं आहे.
आज चौकशीवेळी जेसीबी मशीन व्यवहारातील आर्थिक फसवणूकप्रकरणी बँकेचा रिकव्हरी एजंट कोण होता? त्याने बँकेला माहिती देऊन सर्व कायदेशीर प्रक्रिया करून जेसीबी मशीन ताब्यात घेतली होती का? या सर्व गोष्टींता तपास करण्यात येणार आहे. त्यासाठी एजंटकडे महाळुंगे एमआयडीसी पोलिस चौकशी करणार आहेत. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील तिचा पती शशांक आणि सासू लता हगवणे यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली. जेसीबी खरेदीचा व्यवहार नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाने केला होता. पोलिसांनी शशांकचा जबाब सादर करून पोलिस कोठडी मागितली. या प्रकरणी माय-लेकाला 6 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. रिकव्हरी एजंटने अनधिकृतपणे जेसीबी मशीन ताब्यात घेतल्याचे निष्पन्न झाल्यास त्यालाही सहआरोपी करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
पोलिसांनी मांडलेली भूमिका
जेसीबी मशीन खरेदीचा व्यवहार नोंदणीकृत करण्याऐवजी त्याची 'नोटरी' केली. त्यामुळे हा व्यवहार अधिकृत आहे किंवा नाही, याचा तपास करायचा आहे. प्रशांत येळवंडे यांच्याकडून घेतलेल्या पैशांचे शशांक आणि लता हगवणे यांनी काय केले, ते पैसे कुठे गेले, या सर्व बाबींचाही तपास करायचा आहे. येळवंडे यांच्या ताब्यात असलेले जेसीबी मशीन अनधिकृतपणे ताब्यात घेतल्याची शंका आहे. याबाबत संबंधित बँकेला माहिती नसल्याचीही शक्यता आहे. त्याची आज चौकशी केली जाणार आहे.
जेसीबी मशीनचा व्यवहार फक्त भाडेतत्त्वावर झाला असल्याचा युक्तिवाद हगवणे कुटुंबीयांच्या वकिलांनी केला होता. त्यामुळे ही आर्थिक फसवणूक म्हणता येणार नाही, असे देखील त्यांनी म्हटले होते. यावर म्हाळुंगे पोलिसांनी शशांकचा जबाब न्यायालयाकडे सादर केला. मे 2024 मध्ये हा जबाब नोंदवण्यात आला होता. जेसीबी खरेदीचा आर्थिक व्यवहार झाल्याचे शशांकने दिलेल्या जबाबात म्हटले आहे.