पुणे : पुणे जिल्ह्यात 231 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान होत आहे. त्यापैकी 37 ग्रामपंचायतींची निवडणूक पूर्णपणे बिनविरोध पार पडली. त्यात पुणे जिल्ह्यात अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. इंदापूर तालुक्यातील सहा ग्रामपंचायतसाठी आज मतदान पार पडत आहे. त्यामध्ये बावडा ग्रामपंचायतसाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे. दरम्यान अजित पवारांच्या आईने अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येकच आईला आपला मुलगा पुढे जावं, असं वाटतं, असं हर्षवर्धन पाटील म्हणाले आहे. 


कुटुंबियांसोबत मतदानाचा हक्क बजावला...


पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बावडा गावी भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, यांनी आपल्या कुटुंबासमवेत मतदानाचा हक्क बजावला आहे. भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, मुलगी अंकिता पाटील ठाकरे , पत्नी भाग्यश्री पाटील व मुलगा राजवर्धन पाटील यांनी मतदान हक्क बजावला आहे.


बावड्याच्या सुपुत्र दिल्लीत गेला...


मी बावडाचा  सुपुत्र आहे. ज्याने या गावाचं नेतृत्व केलं आहे. ते नेतृत्व दिल्लीत गेलं आहे. ही बावड्याचीग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून आम्हाला साथ दिली आहे. मागच्या 2 निवडणूक बिनविरोध झाल्या. यावर्षी सर्व जागा विक्रमी मताने येतील, असा दावा हर्षवर्धन पाटलांनी केला आहे.


आशा पवारांनी मुलाला आशिर्वाद दिला आहे...


अजित पवारांच्या आईने अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावंस अशी ईच्छा बोलून दाखवली आहे. मी जिवंत असेपर्यंत किंवा माझ्या डोळ्यादेखत त्यांनी मुख्यमंत्री व्हावं, असं आशा पवार म्हणाल्या आहेत. दरम्यान त्यावर हर्षवर्धन पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येकच आईला आपला मुलगा पुढे जावा, असं वाटतं, असं ते म्हणाले आहे.आशा पवार यांनी  मातृत्वाचा भावनातून बोललं असेल अजित पवारांना आईने दिलेला तो आशीर्वाद आहे, असं ते म्हणाले. 


अजित पवार गट विरुद्ध भाजप लढतीत कोण मारणार बाजी?


इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या बावडा गावात देखील भाजप विरुद्ध अजित पवार गट अशी लढत होत आहे. इंदापूर तालुक्यातील 6 ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे.माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या बावडा येथे ग्रामपंचायत निवडणूकीसाठी मतदान सुरु आहे. इंदापूर, बारामतीत अजित पवार गट विरुद्ध भाजप अशी लढत असल्याने एकमेकांवर विकासाच्या मुद्द्यावरुन आरोप प्रत्यारोप सुरु आहे. त्यामुळे यंदा गावात नेमकी कोण गुलाल उधळणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Asha Pawar On Ajit Pawar : मुलगा मुख्यमंत्री होणार का? अजित पवारांच्या आई म्हणाल्या, "माझ्या डोळ्यादेखत..."