Vaishnavi Hagawane death : हगवणे प्रकरणात अंधारेंकडून चाकणकर नाही तर ठोंबरेंचं कौतुक; चाकणकरांना आयोगाचे अध्यक्षपद कोणत्या निकषावर दिलं? सुषमा अंधारे संतापल्या
Vaishnavi Hagawane death : वैष्णवी हगवणे प्रकरण हे राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असलेल्या नेत्याशी निगडित असल्याने या प्रकरणांमध्ये महिला आयोगाची भूमिका समोर येत नसल्याचं टीका विरोधकांकडून करण्यात येत होती.

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी पदाधिकारी असलेल्या राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट पसरली आहे. हे प्रकरण अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असलेल्या नेत्याशी निगडित असल्याने या प्रकरणांमध्ये महिला आयोगाची भूमिका समोर येत नसल्याचं टीका विरोधकांकडून करण्यात येत होती. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील रूपाली चाकणकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
सुषमा अंधारे यांनी रूपाली चाकणकांवर हल्लाबोल तर सोशल मिडियावरती लिहलं की, "चाकणकरांची रूपाली असंवेदनशीलतेने वागली तरी ठोंबरेंच्या रूपालीने दाखवलेली संवेदनशीलता, वैष्णवीचे बाळ कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यासाठी घेतलेला पुढाकार प्रशंसनीय आहे. दादा, 100 पैकीं 90 प्रकरणात अत्यंत अकार्यक्षम ठरलेल्या महिलेला आयोगाचे अध्यक्षपद कोणत्या निकषावर दिले असेल बरे? असा सवाल देखील सुषमा अंधारेंनी उपस्थित केला आहे.
सुषमा अंधारेंची पोस्ट काय?
चाकणकरांची रूपाली असंवेदनशीलतेने वागली तरी ठोंबरेंच्या रूपालीने दाखवलेली संवेदनशीलता, वैष्णवीचे बाळ कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यासाठी घेतलेला पुढाकार प्रशंसनीय आहे. दादा, 100 पैकीं 90 प्रकरणात अत्यंत अकार्यक्षम ठरलेल्या महिलेला आयोगाचे अध्यक्षपद कोणत्या निकषावर दिले असेल बरे?
केवळ हकालपट्टी नको तर राजेंद्र हगवणेंना तातडीनं अटक करा
चाकणकरांची रूपाली असंवेदनशीलतेने वागली तरी ठोंबरेंच्या रूपालीने दाखवलेली संवेदनशीलता, वैष्णवीचे बाळ कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यासाठी घेतलेला पुढाकार प्रशंसनीय आहे.
— SushmaTai Andhare (@andharesushama) May 22, 2025
दादा, 100 पैकीं 90 प्रकरणात अत्यंत अकार्यक्षम ठरलेल्या महिलेला आयोगाचे अध्यक्षपद कोणत्या निकषावर दिले असेल बरे? pic.twitter.com/FtSUgWvUrr
वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी सासरे राजेंद्र हगवणे आणि पती शशांक हगवणेंची राष्ट्रवादीने हकालपट्टी केली आहे, पण एवढं करुन चालणार नाही. तर राजेंद्र हगवणेंना तातडीनं अटक करा. अशी मागणी वैष्णवीच्या वडिलांनी केली आहे. राज्य महिला आयोग पदी ही अजित पवार गटाच्या रुपाली चाकणकर आहेत, त्यांनी जे वक्तव्य दिलं ते योग्य आहे. पण त्यांनी अद्याप आम्हाला एकदा ही संपर्क साधला नाही. किंबहुना अजित पवार गटाकडून कोणीही आमचं सांत्वन करायला आलं नाही, अशी खंत वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी व्यक्ती केली.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल
पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतःहून (सुमोटो) दखल घेतली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलं आहे. पोलिसांनी निष्पक्ष तपास करावा अशा आयोगाने सूचना दिल्या आहेत. जर आरोप खरे असल्याचे आढळून आले तर सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आयोगाने महाराष्ट्र पोलिसांकडून तीन दिवसांच्या आत सविस्तर कारवाई अहवाल मागितला होता, तो अहवाल आज पोलिसांकडून आयोगाला अहवाल सादर केला जाण्याची शक्यता आहे.
नेमकं प्रकरण काय?
सासरच्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (वय 23) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केली आहे. सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे व दीर सुशील राजेंद्र हगवणे हे फरार असून, त्यांच्या तपासासाठी पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली आहेत. राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा राज्य कार्यकारिणी सदस्य होता.
वैष्णवी हगवणे हिने शुक्रवारी (16 मे) राहत्या घरात गळफास घेतला. वैष्णवी यांचे वडील आनंद कस्पटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वैष्णवीच्या लग्नात 51 तोळे सोने, फॉर्च्यूनर गाडी, चांदीची भांडी देण्यात आली. त्यानंतर लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून शशांक व तिचे सासू-सासरे यांनी घरातील किरकोळ कामाच्या वादातून तिच्याबरोबर भांडण सुरू केले. तिच्या चारित्र्यावरून बोलणं वैष्णवीला सासऱ्याच्या लोकांनी शारीरिक व मानसिक त्रास देणं चालू केलं होतं. पती, सासू-सासरे, नणंद, दीर यांनी हुंड्यासाठी मानसिक छळ करून कुर वागणूक दिली. पोस्ट मार्टममध्ये वैष्णवीच्या अंगावर मारहाणीचे व्रण आढळले होते.























