भिमाशंकर, पुणे : बारा जोतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या पुण्यातील भिमाशंकर मंदिरात पुजारीच आपसात भिडल्याचं समोर आलंय. पूजा करण्याचा मान नेमका कोणाचा यावरून सुरू झालेला वाद, थेट हाणामारीपर्यंत गेला. आता याची दृश्यं समोर आलेली आहेत. हातात लाठ्या-काठ्या, लोखंडी रॉड घेऊन, एकमेकांची डोकी फोडण्यापर्यंत या पुजाऱ्यांची मजल गेलेली आहे. पुजाऱ्यांची दोन गटातील हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर खेड पोलिसांनी 36 पुजाऱ्यांवर गुन्हे दाखल केलेले आहेत.