पुणे : पुण्यासह राज्यातील २९ महानगरपालिकांचा निकाल (Pune Municipal Corporation Result) काल (शुक्रवारी, ता १६) रोजी जाहीर झाला, अेक महानगरपालिकांमध्ये भाजपने गुलाल उधळला तर त्याखालोखाल शिंदेंनी, तर मोठा धक्का बसला तो उद्धव ठाकरेंना आणि राज ठाकरेंना. अशातच पुणे महापालिका (Pune Municipal Corporation Result) निवडणुकीचा निकाल देखील स्पष्ट झाला, पुण्यात एकाच घरातील एकापेक्षा अधिक उमेदवार (Pune Municipal Corporation Result) निवडून येण्याची परंपरा यावेळीही (Pune Municipal Corporation Result) कायम राखली गेली आहे. महापालिकेच्या निवडणुकीत पती-पत्नी, दोन सख्खे भाऊ, सासू-सून विजयी झाल्याने आता पती-पत्नीसह सासू अन् सुनबाईही सभागृहात दिसणार आहेत.(Pune Municipal Corporation Result)
एकाच घरातील एकापेक्षा अधिक उमेदवार निवडून आलेले उमेदवार
पुणे महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३ विमाननगर लोहगावमधून भाजपच्या ऐश्वर्या सुरेंद्र पठारे, तर प्रभाग क्रमांक ४ खराडी वाघोलीमधून भाजपचे उमेदवार सुरेंद्र पठारे विजयी झाले आहेत. आता हे पती-पत्नी आता थेट सभागृहात दिसणार आहेत.
तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते दीपक मानकर यांची दोन्ही मुलं निवडणुकीत विजयी झाली आहे, प्रभाग क्रमांक ११ रामबाग कॉलनी शिवतीर्थनगरमधून हर्षवर्धन मानकर राष्ट्रवादी अजित पवारांकडून, तर प्रभाग क्रमांक २५ मधून महात्मा फुले मंडईमधून भाजपचे उमेदवार राघवेंद्र मानकर हे दोघे बंधू विजयी झाले आहेत. (Pune Municipal Corporation Result)
याशिवाय प्रभाग क्रमांक २३ रविवारपेठ, नाना पेठमधून राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या सोनाली आंदेकर 'अ'मध्ये आणि 'ब' प्रवर्गात लक्ष्मी आंदेकर सून आणि सासू विजयी झाल्या.गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील तीन महिला उमेदवारांनी राष्ट्रवादीकडून (अजित पवार) निवडणूक लढविली. नाना पेठेतील आयुषकोमकर खून प्रकरणातील आरोपी आणि सध्या तुरुंगात असलेल्या सोनाली आंदेकर व लक्ष्मी आंदेकर या दोघी सून, तसेच सासू प्रभाग २३ रविवारपेठ नानापेठमधून निवडणुकीला उभी होती.(Pune Municipal Corporation Result)
प्रभाग क्रमांक १० बावधन भुसारी कॉलनीमधून कुख्यात गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे निवडणूक लढवित होत्या. मारणे यांचा पराभव झाला. प्रभाग क्रमांक ३९ मध्ये राष्ट्रवादीकडून (अजित पवार) गुंड बापू नायर निवडणूक लढवत होते, पण नायर यांचा पराभव झाला आहे. त्यापैकी सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर या विजयी होऊन सभागृहात गेल्या आहेत.(Pune Municipal Corporation Result)
