पुणे : आरबीआयचे निर्देश आणि FEMA  आणि इतर कायद्याचे उघडपणे उल्लंघन करून अत्यंत बेकायदेशीररित्या लोकांची फसवणूक करून सोलापूर, पुणे,नागपूर, मुंबई, सातारा या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यासह  देशातील गुजरात, कर्नाटक,राजस्थान, ओरिसा, कर्नाटक आदी अनेक राज्यात सुरू असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या बेकायदेशीforex ट्रेडिंग रॅकेटवरतात्काळ कारवाई करा,अशी मागणी  किसान आर्मी व वॉटर आर्मीचे नेते प्रफुल्ल कदम यांनी केली आहे.


या रॅकेटमध्ये सहभागी असणाऱ्या देशातील व परदेशातील दोषी व्यक्तीवर कारवाई करण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने या रॅकेटची  पाळं-मुळं शोधण्यासाठी तत्काळ एक विशेष कृती दल स्थापन करून एक विशेष मोहीम तत्काळ  राबवा आणि या सर्व बेकायदेशीर प्रकारात फसवणूक झालेल्या गुंतवणूकदाराची कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक त्यांना तत्काळ परत करा अशी  मागणी ED ला व राज्य पोलिस विभागाला किसान आर्मी व वॉटर आर्मीचे नेते प्रफुल्ल यांनी केली आहे.


विविध धमक्यांमुळे गुंतवणूकदार सैरभैर


3 फेब्रुवारी 2022 रोजी आरबीआयने unauthorised ETP वरून trading  करू नका, अन्यथा FEMA  कायद्यांतर्गत संबंधितावर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा दिला होता. तरीही सोलापूर,पुणे,मुंबई, नागपूर,सातारा, विजापूर आदी जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यात आणि देशात अनेक राज्यात कोट्यावधी रुपयांचे बेकायदेशीर forex ट्रेडींग चालू आहे. हे फसवणूक करणारे लोक गुंतवणूकदारांना FIR केला तर आम्ही तुमची गुंतवणूक परत करणार नाही अशी धमकी देत असल्याने हे गुंतवणूकदार सैरभैर झाले आहेत. हा सर्व प्रकार अत्यंत बेकायदेशीर असून या घोटाळ्याची व्याप्ती कोट्यावधी रुपयांची असू शकते. महत्त्वाचे म्हणजे हा सर्व प्रकार मला थेट राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर वाटत आहे, असं प्रफुल्ल कदम यांनी सांगितले.


राष्ट्रीय सुरक्षेतेच्या दृष्टीने गंभीर बाब


यातील फसवणूक करणारी मंडळी काही आपल्या देशात तर काही परदेशात आहेत.या सर्वांचा हा बेकायदेशीर कारभार एवढा उघडपणे कसा चालू आहे याचे आश्चर्य वाटत आहे. भारतात ED, पोलीस आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा यासारख्या यंत्रणा असताना एवढ्या मोठ्या उघड बेकायदेशीर कारभारावर सनियंत्रण कसे नाही? हाही प्रश्न आहे. यातून देशातील नागरिकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक तर होत आहेच त्याचबरोबर भारतातील पैसा बेकायदेशीरित्या परदेशात जात असल्याने राष्ट्रीय सुरक्षेतेच्या दृष्टीने ही बाब गंभीर असल्याचे प्रफुल्ल कदम यांनी सांगितले.


इतर महत्वाची बातमी-


OBC Reservation History : भाजपच्या कमंडलला व्हीपी सिंहांचे 'मंडल'ने उत्तर, पवारांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा जीआर काढला; असा झाला OBC आरक्षणाचा जन्म