Hidden Waterfall In Junnar : पुणे (Pune) आणि पुणे जिल्ह्याला निसर्ग सौदर्यांची (Hidden Waterfall In Junnar) देण आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगा आणि याच डोंगरांमधून वाहणारे धबधबे अनेक पर्यटकांना आकर्षित करत असतात. दर पावसाळ्यात पर्यटक पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आवर्जून (Pune waterfall) भेट देतात आणि वर्षाविहाराचा (famouse waterfall in Pune) आनंद लुटतात.पावसाळा सुरुवात झाली की मुंबई व पुणेकरांची पाऊल आपोआपच जुन्नरच्या दिशेन पडायला सुरुवात होते. शिवजन्मभूमी असलेल्या जुन्नर तालुक्यातील धबधबे (Waterfall) निसर्गसौंदर्याने नटलेले आहे. यातील काही धबधब्यांना तुम्ही नक्कीच भेट दिली पाहिजे.
तुम्ही पण पावसाळी पर्यटनाचा विचार करत असाल तर,जुन्नर तालुक्यातील या ठिकाणांना नक्की भेट द्या...
1. नाणेघाट- नाणेघाट हा पुण्यापासून साधारण 90 किमी तर मुंबई पासून 120 किमी अंतरावर आहे. या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रात ‘उलटा वाहणारा धबधबा’ म्हणून प्रसिद्ध असलेला नाणेघाट धबधबा पाहायला मिळतो. नाणे घाटात अनेक पर्यटक दरवर्षी गर्दी करत असतात आणि वर्षाविहाराचा आनंद लुटत असतात.
2. माळशेज घाट- माळशेज घाट हा आपल्या अजस्र अशा वाहणाऱ्या धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी आपल्याला खोलदऱ्या सोबतच धुक्यांचा अनुभव घेता येतो. हे ठिकाण पुण्यापासून 110 किमी तर मुंबईपासून 90 किमी आहे.
3. अंबोली दाऱ्या घाट- दाऱ्या घाटआपल्या फेसाळणाऱ्या धबधब्यांसाठी ओळखला जातो.या ठिकाणी आपल्याल घनदाट झाडी,प्रचंड धुके आणि सोबतच कोसळणारे धबधबे यांचा आनंद घेता येतो. हे ठिकाण मुंबईपासून 130 किमी तर पुण्यापासून 115किमी अंतरावर आहे.
4. धुरनळी धबधबा- आपल्या अजस्त्र रूपासाठी प्रसिद्ध असणारा हा धबधबा ओतुर शहराजवळ आहे. प्रचंड उंच कड्यावरून हा धबधबा खाली कोसळतो. हे मनमोहक रूप पाहण्यासाठी पर्यटक कायमच गर्दी असतात. हे ठिकाण मुंबई पासून 120 किमी तर पुण्यापासून 90 किमी आहे. या ठिकाणी आपल्याला गरमागरम कांदाभजी, प्रसिद्ध अशी ओतूरची भेळ आणि खेकडे खाण्यासाठी मिळतात.
5. काळू धबधबा - सोशल मीडिया आणि तरुणाईमध्ये प्रचंड प्रसिद्ध असणारा काळू धबधबा हा अहमदनगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील करंजाळे गावापासून 4 किमी अंतरावर आहे. हरिश्चंद्रगडाच्या कुशीतून वाहणाऱ्या या धबधब्याची पर्यटकांमध्ये प्रचंड लोकप्रियता आहे.
6. आंबेहातवीज- आंबेहातवीज हे गाव सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं आहे. याठिकाणी गर्द झाडी आणि धुक्यांसोबतच कड्यावरून खळाळणारे धबधबे आपल्याला पहायला मिळतात. हे ठिकाण मुंबई पासून 140 किमी व पुण्यापासून 130 किमी अंतरावर आहे.