Pune Rain Update:  मागील तीन दिवस पुणे (Pune) शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. शहर आणि ग्रामीण परिसरात अति मुसळधार पाऊस पडत आहे. तीन दिवस पुण्यात रेड अलर्ट (Red Alert) जारी केला आहे. त्यामुळे पुणेकरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. घाटमाध्यावर चांगला पाऊस झाल्याने शहराजवळील चारही धरणात चांगला पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे शहराच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. 


बाबा भिडे पुल  पाण्याखाली 
बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला की पाऊस झाला असा अंदाज वर्षानुवर्षे पुणेकर वर्तवतात. गेले तीन दिवस पुण्यात संततधार पाऊस पडल्याने खडकवासला धरण 100 टक्के भरलं. धरणातील पाण्याचा विसर्ग मुठा नदीत सोडण्यात आलं. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. भिडे पूल पाण्याखाली गेला म्हणजे पुण्यात पाण्याचा प्रश्न मिटला असं समजल्या जातं. काही दिवसांसाठी या पुलावरुन वाहतुक बंद ठेवण्याल आली आहे आणि नदी पात्रातून प्रवास न करण्याचं आवाहन देखील प्रशासनांनी पुणेकरांना केली आहे.


पुण्यात झालेल्या संततधार पावसामुळे खडकवासला धरणात 100 टक्के पाणीसाठा झाला आहे. आणखी पावसाचा अंदाज लक्षात घेऊन मध्यरात्रीपासून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सुरुवातीला सुमारे 1000 क्युसेक पाणी सोडण्यात येत होते. आता आम्ही काल दुपारी 12 वाजल्यापासून धरणाच्या सांडव्यातून चालू असणारा 3424 क्युसेक विसर्ग वाढवून ठीक  5992 क्युसेक करण्यात आला होता. त्यामुळे आजुबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस पुणे शहरात रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे दोन दिवस अतिमुसळधार पाऊस पडणार आहे.


पुण्यात आतापर्यंत 30 टक्के क्षेत्रावर पिकाची लागवड करण्यात आली आहे. त्यात भातशेती आणि बाकी पिकांचा समावेश आहे. 46000 हेक्टरवर पिकाची लागवड झाली आहे. असाच पाऊस सुरु राहिला तर पिक लागवडीचं प्रमाण वाढणार आहे. अनेकांच्या पिकांना चांगल्या प्रमाणात पाऊस पडल्याने बळीराजा सुखावला आहे.