पुणे: पुणे शहरातील सदाशिव पेठेमध्ये एका भिंतीवर हिरवा रंग लावून चादर आणि फुलं चढवल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेची दखल भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी घेतली. ही घटना लक्षात येताच भाजप खासदार मेधा कुलकर्णी आणि काहींनी मिळून पुन्हा त्या हिरव्या रंगावरती भगवा रंग देऊन त्या ठिकाणी एक गणपतीचा फोटो ठेवला आहे. पुणे शहरातच नाही, तर महाराष्ट्रसह इतर अनेक ठिकाणी हे प्रकार सध्या वाढले असल्याचा दावा मेधा कुलकर्णी यांनी केला आहे. आपल्या आजूबाजूला काय घडतंय याकडे एक सजग हिंदू म्हणून आपण लक्ष देऊ या कृती करूया, असं आवाहन भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी केलं आहे.
आपण जागरूक राहिलं पाहिजे
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी एबीपी माझाशी बोलताना नेमकं काय घडलं याची माहिती दिली आहे. मेधा कुलकर्णी म्हणाल्या व्हाट्सअप वरती अनेक मेसेज येत राहिले. अनेकांकडून याबाबतची माहिती मिळाली. त्याचबरोबर त्याचे फोटो देखील पाठवण्यात आले होते. त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो, फुलं होती, उदबत्ती लावल्या होत्या आणि हिरवा रंग लावला होता. त्या भिंतीवर ती आधीचा पिवळा रंग होता, जर भिंतीला रंगच द्यायचा होता तर पिवळा देता आला असता पण त्या कोपऱ्यावरती फक्त हिरवा रंग देण्यात आला होता. बऱ्याचदा अशा घटना कळतात, आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना याची माहिती देत असतो. अशा गोष्टी घडल्या नाही पाहिजेत आणि जिथे घडत असतील तिथे आपण जागरूक राहिलं पाहिजे, असं आहे असं मेधा कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय घडलं?
आम्हाला अर्धी माहिती मिळालेली आहे आणि मला त्याच्यात वस्तूस्थिती जाणवत नाही, शाळेची सुद्धा आमचा पत्रव्यवहार होणार आहे. सुट्टी आहे, आम्ही त्यांना संपर्क करू आणि अशा प्रकारे कुठलाही तथ्यहीन आणि तर्कहीन अशा गोष्टी पुण्यामध्ये चालू दिल्या जाणार नाहीत, असेही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
त्याचबरोबर हिरवा रंग लावला होता, तिथे गणपती बाप्पांची प्रतिमा कडेला होती. आणखी दोन-तीन प्रतिमा तिथे होत्या. त्या आम्ही इकडे आणून ठेवल्या. आम्हाला कुठल्याही प्रकारे अशा ठिकठिकाणी कॉर्नर बळकवलेले चालणार नाहीत. दुसरी गोष्ट रेल्वे लाईनच्या कडेला देखील ठिकठिकाणी पीर आणि मजारी आहेत. अल्हा शिवाय इतर कोणाची प्रार्थना केली जावी हे त्यांना पटतं नाही. मग हे पीर कसे, आपल्याकडे सुद्धा कोणी महंत, साधुसंत किंवा अशी एक महात्मा व्यक्ती जेव्हा दिवंगत होते. तेव्हा ते समाधी घेतात. पण ते जाहिर असते, त्यांचं नाव आपल्याला माहिती असतं. ते समाधी स्थळ माहिती असते. त्या व्यक्तीचं नाव आणि कार्य आपल्याला माहिती असेल आणि त्यांना आपण रस्त्याच्या कडेला काही समाधी स्थान करत नाही. तर हे सगळं फेक असतं. तर या फेक गोष्टींपासून सगळ्या हिंदूंनी सावध राहायला पाहिजे, आपल्या जागा आपण संरक्षित केल्या पाहिजेत, असं मला वाटतं असंही पुढे त्यांनी आवाहन केलं आहे.
अशा बाबतीत आपण अलर्ट राहिले पाहिजे
तिथे अनेक दुकानदारांकडे आम्ही चौकशी केली आणि चौकशी अंतिम कळलं की, हे आत्तापर्यंत नव्हतं आणि आता नुकतंच झालेला आहे आणि याच्यामध्ये कधी कधी असंही होतं की हिंदूंचा वापर केला जातो, यावेळी एबीपी माझाशी बोलताना त्यांनी एक उदाहरण देखील सांगितलं आहे, मलंग बाबा नाथपंथीय बाबा होते आणि आता तिथे हाजी मलंग या नावाने ते प्रचलित केले गेले, ते तीर्थक्षेत्र हिंदूंचे तीर्थक्षेत्र आहे, वेगवेगळ्या लोकांनी अतिशय चुकीच्या पद्धतीने कार्यनीती अवलंबून आता ते सर्व धर्मीय प्रार्थना केले आहे, ते सर्व धर्मीय प्रार्थना स्थळ नाही ते केवळ तीर्थक्षेत्र आहेत, अशा बाबतीत आपण अलर्ट राहिले पाहिजे असं मला वाटतं, आम्ही जी माहिती घेतली त्या माहितीनुसार मी त्यांचं नाव घेत नाही. अजूनही आम्ही डिटेल माहिती घेणार आहोत. मात्र, तर्कहीन आणि तथ्यही अशा गोष्टी तिथे चालू आहेत हे मात्र नक्की असं त्यांनी पुढे म्हटले आहे.