पुणे : मुंबई आणि पुण्यातील पर्यटकांसाठी जवळचं आणि हक्काचं पर्यटनस्थळ म्हणजे लोणावळा. पावसाळ्यात फुलणाऱ्या लोणावळ्याकडे पर्यटकांचे पाय ओढावतात. मात्र लोणावळ्याचं आकर्षण असलेलं भुशी धरण अजून भरलेलं नसल्यामुळे पर्यटक विचार करत होते. पण हे धरण आता भरलं आहे.


लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हर फ्लो झालं आहे. धरणाच्या पायऱ्यांवरुन पाणी वाहू लागलं आहे. शुक्रवारपासूनच पावसाने जोर धरला होता. गेली चार दिवस झालेल्या पावसामुळे आज अखेर पाणी ओव्हर फ्लो झालं.

पर्यटक याच क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतात, ती प्रतीक्षा अखेर संपली आहे. त्यामुळे येत्या वीकेंडला जर तुम्ही पर्यटनासाठी बाहेर पडणार असाल, तर भुशी धरणाचा चांगला पर्याय आता उपलब्ध झाला आहे.

वर्षा पर्यटनासाठी लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. या वीकेंडलाही लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी होती. मात्र भुशी धरण भरलेलं नसल्यामुळे पर्यटकांना हवा तसा आनंद घेता आला नाही. पण आता भुशी धरणाच्या पायऱ्यांवर पाण्याचा आनंद घेण्याची इच्छा पूर्ण होणार आहे.

संबंधित बातमी :

वीकेंडचा प्लॅन करताय? राज्यातली ही सुंदर ठिकाणं पाहा