पुणे : नृत्यांगना गौतमी पाटील हिच्यावर पुण्यातील मरगळे कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत. गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्या कारने धडक दिल्यानंतर रिक्षा चालक गंभीर जखमी झाला आणि तो रुग्णालयात उपचार घेत आहे. एवढा मोठा अपघात झाला असतानाही गौतमी पाटील हिच्या टीमकडून कोणतीही चौकशी करण्यात आली नाही, किंवा साधा एक मेसेजही आला नाही असा आरोप रिक्षा चालकाच्या कुटुंबीयांनी केला. तसेच या प्रकरणी पोलिसही सहकार्य करत नसल्याचाही आरोप करण्यात आला.

पुण्यात नृत्यांगना गौतमी पाटीलच्या वाहनाने 30 सप्टेंबर रोजी एका रिक्षाला वडगाव पुलाजवळ मागून जोरदार धडक दिली. त्यामध्ये रिक्षाचालक मरगळे हे गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या अपघातात रिक्षात बसलेले इतर दोघेही जखमी झाल्याची माहिती आहे.

Gautami Patil Car Accident : पोलीस सहकार्य करत नाहीत

गौतमी पाटील हिच्या कार चालकाची चूक असताना हा अपघात झाला. मात्र या संपूर्ण प्रकरणाची गौतमी पाटीलच्या टीमकडून दखल घेण्यात आली नाही. तसेच पोलिसांकडून सीसीटीव्ही उपलब्ध होत नाही, पोलीस योग्य ते सहकार्य करत नाहीत असा आरोप आता रिक्षाचालक मरगळे यांच्या कुटुंबीयांनी केला.

Gautami Patil News : गौतमी कारमध्ये नव्हती

पुण्यातील मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ हा अपघात झाला. पण अपघातावेळी कारमध्ये गौतमी पाटील नव्हती अशी माहिती समोर आली आहे. एका हॉटेल समोर थांबलेल्या रिक्षाला कारने धडक दिली.

Pune Accident : अपघात नेमका घडला कसा?

पुण्यातील मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ एका हॉटेलसमोर समोर एक रिक्षा उभी होती. त्यात रिक्षाचालकासह दोन प्रवासी होते. मागून आलेल्या गौतमी पाटीलच्या भरधाव कारनं उभ्या असलेल्या रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की, यामध्ये रिक्षाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या अपघातात रिक्षाचालकासोबतच रिक्षातील दोन प्रवासीही गंभीर जखमी झाले.

पोलिसांना अपघाताबाबत माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी कार आणि ड्रायव्हर तिथेच होता. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. त्यावेळी ड्रायव्हरनंच ती कार सुप्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिची असल्याची माहिती दिली.

ही बातमी वाचा :