पुणे: गणेशोत्सवाच्या दरम्यान पुणे जिल्ह्यात दुर्दैवी घटना घडली आहे. मावळात घरगुती गणपती मूर्तीचे विसर्जन करताना बाप लेक बुडाल्याची दुर्दैवी घटना पवन मावळातील कडधे या गावात घडली आहे. वडिलांचा मृतदेह सापडला असून मुलाच्या मृतदेहाचा पाण्यात शोध घेण्याचं काम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय धोंडू शिर्के या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या वडिलांचं नाव आहे. तर हर्षल संजय शिर्के या मुलाचा मृतदेह पाण्यात शोधण्याचं काम सुरू आहे. कडधे गावात हे बाप, लेक घरगुती गणपती मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी घराच्या जवळ असलेल्या माळावर उत्खनन केलेल्या जागेत साचलेल्या पाण्याच्या डबक्यात गेले होते.
मुलगा हर्षल शिर्के बुडत असताना त्याला वाचवण्यासाठी बापाने पाण्यात उडी घेतली, पण दोघेही पाण्यात बुडाले. घटनास्थळी वन्यजीव रक्षक मावळ टीम, कामशेत पोलिस आणि लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्कू टीमने धाव घेतली. रेस्कू टीमच्या शोध मोहिमेत वडिल संजय शिर्के यांचा मृतदेह सापडला असून मुलाचा पाण्यात शोध सुरू आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार कडधे येथे संजय शिर्के व हर्षल शिर्के यांनी घरगुती गणपती मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी त्यांच्या घराजवळ असलेल्या माळावर उत्खनन केलेल्या खाणींमध्ये साचलेल्या पाण्यात गेले, यावेळी मुलगा हर्षल शिर्के बुडत असताना, त्याचे वडील संजय शिर्के यांनी पाण्यात उडी घेतली, मात्र, दोघेजण पाण्यात बुडाले.
संबधित घटनेची माहिती मिळताच कामशेत पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली. शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी मृतदेह बाहेर काढला. गणेशोत्सव काळात शिर्के कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला, आहे घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
गणपतीचं दर्शन घेऊन घरी परत जात असताना पती-पत्नीचा अपघाती मृत्यू
गणपतीचं दर्शन घेऊन घरी परत जात असताना एका भरधाव वेगात जाणाऱ्या डंपर चालकाने दुचाकीवरील पती-पत्नीला जोरात धडक दिली. या घटनेत दोघां पती-पत्नीचा जागेवरच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या भीषण घटनेत अनिल काळू सूर्यवंशी आणि प्रिया अनिल सूर्यवंशी या दोघा पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. मुळशी तालुक्यातील भुकूम परिसराजवळ हा भीषण अपघात (Pune Accident) झाला आहे. घटनेनंतर डंपर चालकाने घटना स्थळावरून पळ काढला. त्याच्या विरोधामध्ये पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल सूर्यवंशी आणि प्रिया सूर्यवंशी यांचं आठच महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. अशातच ही घटना घडल्याने लोकांनी संताप व्यक्त केला आहे.