Rupali Patil will Join NCP : मनसे माजी फायरब्रॅण्ड नेत्या रुपाली पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. गुरुवारी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होण्याची दाट शक्यता आहे. आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने हा पक्ष प्रवेश महत्त्वाचा समजला जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बुधवारपासून पुणे दौऱ्यावर आहेत. त्याच्या एकदिवस आधीच रुपाली पाटील यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांच्या या निर्णयामुळे मनसेला धक्का बसला असल्याचे म्हटले जात आहे. रुपाली पाटील यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांची भेट घेतली होती.
आज बुधवारी रुपाली पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मनसेतून बाहेर पडण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी म्हटले की, राज ठाकरे यांना पाहून राजकारणात आले. मला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्याबद्दल वाईट बोलणार नाही. ती माझी वृत्ती नसल्याचे पाटील यांनी सांगितले. राजीनामा देण्याआधी माझ्या मनातील खदखद राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवली आहे. काही अपरिहार्य कारणांमुळे राजीनामा दिला असल्याची कबुली त्यांनी दिली.
पक्षाच्या आंदोलनात सात दिवस तुरुंगवास भोगला आहे. मनसेत निस्वार्थीपणे काम करणारे अनेक कार्यकर्ते आहेत. त्यांच्याबद्दल आदर आणि प्रेम आहे. मनसे अथवा महाराष्ट्र सैनिकांना बदनाम करणार नसल्याचे रुपाली पाटील यांनी म्हटले.
रुपाली पाटील काय म्हणाल्या ?
मी मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राज ठाकरे यांना पाहून राजकारणात आले. मला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्याबद्दल वाईट बोलणार नाही. ती माझी वृत्ती नसल्याचे पाटील यांनी सांगितले. राजीनामा देण्याआधी माझ्या मनातील खदखद राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवली आहे. काही अपरिहार्य कारणांमुळे राजीनामा दिला असल्याची कबुली त्यांनी दिली. मुंबईत काही कामानिमित्त मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि युवा सेना नेते वरूण सरदेसाई यांची भेट झाली असल्याचे रुपाली पाटील यांनी म्हटले.