Food and Drug Administration Action : अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) पुणे (Pune) जिल्ह्यातील गुळ उत्पादकांवर (Jaggery producer) मोठी कारवाई केली आहे. दौंड तालुक्यातील दापोडी आणि केडगाव येथील तीन गुळ उत्पादकांवर ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये सुमारे पाच लाख 33 हजार 870 रुपये किंमतीचा भेसळयुक्त गुळ आणि साखर जप्त करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनातर्फे मुदतबाह्य चॉकलेट, भेसळयुक्त गुळ आणि साखर वापरणाऱ्या गुळ उत्पादकांवर  कारवाई करण्यात येत आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये अन्न व औषध प्रशासान विभाग सतर्क झाला आहे. 


दापोडी येथील मे. सचिन गुळ उद्योग आण मे. सुपर स्टार गुळ उद्योगाचे मालक सचिन मोहिते या गुळ उत्पादकावर धाडी टाकून भेसळयुक्त गुळ आणि साखरेचे नमुने घेण्यात आले. उर्वरित 51 हजार 30 रुपये किंमतीचा सुमारे 1 हजार 458 किलो गुळ आणि 51 हजार रुपये किंमतीची 1 हजार 500 किलो साखरेचा साठा जप्त करण्यात आला होता. केडगाव येथील मे. समर्थ गुळ उद्योगाचे मालक अमोल गव्हाणे या गुळ उत्पादकावर धाडी टाकून भेसळयुक्त गुळ आणि  साखरेचा एक नमुना घेऊन उर्वरित 3 लाख 72 हजार 640 रुपये किंमतीचा सुमारे 10 हजार 960 किलो गुळ आणि 59 हजार 200 रुपये किंमतीची 1 हजार 850 किलो साखर जप्त करण्यात आली आहे.


ग्राहकांची फसवणूक करणाऱ्याविरुद्ध 1800 222 365 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी 


याबाबत प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत असल्याने प्रशासनामार्फत लवकरच विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. याप्रकरणी गैरप्रकार आढळून येणाऱ्या गुऱ्हाळ घरावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. सणासुदीच्या काळात ग्राहकांची फसवणूक करुन कमी दर्जाचे अन्न पदार्थ विक्री करणाऱ्याविरुद्ध  1800 222 365 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी असे आवाहन प्रशासनानं केलं आहे. जिल्ह्यातील सर्व गुऱ्हाळ चालकांनी अन्न सुरक्षा आणि मानदे कायदा 2006 या कायद्याअंतर्गत आवश्यक असलेला परवाना प्राप्त करुनच गुळ उत्पादन करण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सहायक आयुक्त संजय नारागुडे यांनी केले आहे. चॉकलेट, भेसळयुक्त गूळ व साखर वापरणाऱ्या गूळ उत्पादकावर अन्न व औषध प्रशासनातर्फे कारवाई करण्यात येत आहे.  या सगळ्यांच्या विक्रीमुळे नागरीकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळं तातडीने करावाई करण्यात येत आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Pune Food and Drug Administration Action: तुम्ही भेसळयुक्त गूळ खाताय? दौंडमध्ये अन्न व औषध प्रशासाने 324 किलो भेसळयुक्त गूळ केला जप्त