पुणे : पुण्याच्या कात्रजमध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या प्रयत्नातून उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीला केंद्रानं 5 कोटींची मदत सुपूर्द करण्यात आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 5 कोटींचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.


1999 साली युती सरकारच्या काळात शिवसृष्टी उभारण्यासाठी कात्रजजवळच्या आंबेगाव गावात 21 एकर जागा देण्यात आली होती. प्रत्यक्षात 2006 साली या कामाला सुरुवात करण्यात आली.  शिवसृष्टीच्या या कामासाठी 302 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. येत्या 2 वर्षांमध्ये संपूर्ण शिवसृष्टी उभा करण्याचा ट्रस्टचा मानस आहे.

एकीकडे राज्य सरकारने पुण्यातील बावधन भागातील बीडीपीच्या जागेवर 50 एकरात शिवसृष्टी उभारण्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन खात्याने पुरंदरेंच्या शिवसृष्टीला विशेष प्रकल्प म्हणून मान्यता दिली आहे.

पुरंदरेंच्या शिवसृष्टीला केंद्र सरकारकडून पाच कोटींची मदत