एक्स्प्लोर

Gautami Patil : गौतमी पाटील चक्क पुण्याच्या पुस्तक महोत्सवामध्ये, कोणतं पुस्तक घेतलं? म्हणाली...

Gautami Patil in Pune : पुण्यात पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाला गौतमी पाटीलने हजेरी लावली. यावेळी तिने संवाद साधला. तसेच ती कोणतं पुस्तक वाचणार याबाबत तिने यावेळी बोलताना सांगितलं आहे.

पुणे : आपल्या नृत्यानं अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना भुरळ घालणारी गौतमी पाटील पुण्यातील पुस्तक महोत्सवात सहभागी झाली आहे. या महोत्सवात ती सहभागी झाल्याने उपस्थितांच्या देखील भुवया उंचावल्या, ती महोत्सवात नृत्य करण्यासाठी नाही तर पुस्तक वाचण्यासाठी आमि कार्यक्रमासाठी आली होती. पुण्यात पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाला गौतमी पाटीलने हजेरी लावली. यावेळी तिने संवाद साधला. तसेच ती कोणतं पुस्तक वाचणार याबाबत तिने यावेळी बोलताना सांगितलं आहे. 

यावेळी माध्यमांशी बोलताना ती म्हणाली, 'मला इतर ठिकाणी नाचायला बोलवतात पण इकडे पुस्तक वाचायला बोलावलं. पुण्यात एवढा मोठा पुस्तक महोत्सव भरला आहे, मला यापुढे मोकळा वेळ मिळाला तर मी पुस्तक वाचणार आहे. मला प्रवीण तरडे आता पुस्तक निवडून देणार आहेत. त्यांनी मला या ठिकाणी बोलावलं त्याबद्दल आभारी आहे. पुस्तक महोत्सवाला आल्यामुळे मला चालना मिळेल, वळण मिळेल. प्रवीण तरडे आणि त्यांच्या पत्नीने गौतमी पाटीलला यावेळी पुस्तक भेट दिली आहे. मला लहानपणापासून डान्स करत होते,पण आता नक्की पुस्तक वाचेल, सर्वांनी पुस्तक वाचा, मला पुस्तक वाचण्याची संधी मिळाली नाही, पण इथून पुढे नक्की पुस्तक वाचणार आहे. प्रवीण दादा सुचवेल ते वाचणार आहे, मी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुस्तक वाचणार आहे, असंही गौतमीने पुढे म्हटलं आहे. 

नेमकं काय म्हणाली गौतमी?

मी लहानपणापासून या गोष्टींमध्ये कधी गेलेच नाही. आत्तापर्यंत मी फक्त डान्स केला, पण आज काही वेगळं करायला आले आहे, असं गौतमीने सांगितलं. पुण्यात एवढा मोठा पुस्तक महोत्सव भरला आहे. आजपर्यंत मला पुस्तकं वाचायची संधी तर मिळाली नाही, पण आज इथे येऊन पुस्तकांच्या या दुनियेत मी फेरफटका मारणार आहे. इथून पुढे मी पुस्तकं नक्की वाचणार आहे, तुम्ही सगळ्यांनीही आवर्जून पुस्तकं वाचा असं आवाहन तिने केलं. पुस्तक ही खूप छान गोष्ट आहे , त्यातून तुम्हाला बरंच काही शिकायला मिळतं, मीही आता वाचाणार आहे, तु्म्हीही सर्वांनी नक्की वाचा, असा आग्रह गौतमीने केला आहे.

आज या पुस्तक प्रदर्शनात येताना कोणती पुस्तकं घ्यायची असा काही ठोस विचार मी केलेला नाही, उलट प्रवीण तरडे दादांनाच मी सांगितलं की, तुम्ही मला सुचवा पुस्तकांची नावं, कोणती पुस्तकं घेऊ ते सांगा. पण छत्रपती शिवाजी महाराजाचं पुस्तक मी नक्की घेणार आणि ते आवडीने वाचणार असल्याचं गौतमीने सांगितलं आहे.

गौतमी पाटील कायमच चर्चेत!

गौतमी पाटील नेहमीच चर्चेत असते. एकीकडे तिच्यावर जोरदार टीका होत असली तरी तिला पाठिंबा देणारी मंडळी कमी नाहीत. आपल्या नृत्य सादरीकरणात अश्लील इशारा करत असल्याने तिच्यावर प्रचंड टीका झाली. त्यानंतर गौतमीनेदेखील सर्वांची माफी मागत चूक सुधारणार असल्याचं सांगितलं. गौतमीच्या कार्यक्रमांना पुरुष चाहत्यांप्रमाणे महिलावर्गदेखील मोठ्या संख्येने उपस्थित असतो. गौतमीचा 'घुंगरू' हा मराठी सिनेमा काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला. पण या सिनेमाच्या माध्यमातून गौतमीने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं.

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! शिक्षणासाठी बारामतीत आलेल्या युवकानं उचललं टोकाचं पाऊल, डोक्यात गोळी झाडून घेतली, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिक्षणासाठी बारामतीत आलेल्या युवकानं उचललं टोकाचं पाऊल, डोक्यात गोळी झाडून घेतली, नेमकं प्रकरण काय?
Pune FDA Mahaprasad : गणेश मंडळांकडून प्रसाद अन् अन्नदानासाठी एफडीए नोंदणी बंधनकारक; ‘एफडीए’ची नजर, नोंदणी बंधनकारक, नवी नियमावली जाहीर
गणेश मंडळांकडून प्रसाद अन् अन्नदानासाठी एफडीए नोंदणी बंधनकारक; ‘एफडीए’ची नजर, नोंदणी बंधनकारक, नवी नियमावली जाहीर
Maharashtra Rain News: गणपतीत पाऊस धिंगाणा घालणार, राज्यातील 11 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’, हवामान विभागाचा अंदाज काय?
गणपतीत पाऊस धिंगाणा घालणार, राज्यातील 11 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’, हवामान विभागाचा अंदाज काय?
Congress Ratnakar Mahajan Passes Away: मोठी बातमी: काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचं पुण्यात निधन
मोठी बातमी: काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचं पुण्यात निधन

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India China Summit : भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
Gokul Election: 'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
Zomato: तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
BRICS Summit: दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
Donald Trump : नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...कॅनडाबाबत म्हणाले...
नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
Embed widget