तब्बल 150 महिलांची फसवणूक, तोतया दिग्दर्शकाला अटक
एबीपी माझा वेब टीम | 24 Oct 2017 09:36 PM (IST)
पुण्यात दिग्दर्शक आणि निर्माता असल्याचे सांगून 150 महिलांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला पोलिसांनी अटक केली आहे.
पुणे : पुण्यात दिग्दर्शक आणि निर्माता असल्याचे सांगून 150 महिलांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला पोलिसांनी अटक केली आहे. चौकशीदरम्यान या तोतया दिग्दर्शकानं तब्बल दीडशे महिलांना फसवल्याची माहिती समोर आली आहे. संदीप व्हरांबळे असं या भामट्याचे नाव असून त्याने चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने या महिलांची फसवणूक केली आहे. यामध्ये मॉडेल आणि फोटोग्राफर यांचा समावेश आहे. आपण दोन सिनेमाचा आर्ट डायरेक्टर असल्याचं तो अनेकांना भासवत होता. अखेर आज पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने आणि चित्रपट महामंडळाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने भामट्याला अटक करण्यात आली आहे.