पुणे : आज पुण्यात 33 वी आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली. दरवर्षीप्रमाणे यात आफ्रिकन खेळाडूंचेच वर्चस्व राहिले. इथिओपियाचा धावपटू अटलाव डेबेड हा मुख्य स्पर्धेचा विजेता ठरला. 42 किलोमीटरची मुख्य स्पर्धा त्याने जिंकली.
मॅरेथॉन स्पर्धेत 15 हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. यात 102 परदेशी खेळाडूंचा समावेश होता. बाबूराव सणस मैदानातून स्पर्धेला सुरुवात झाली. फुल मॅरेथॉन 42 किलोमीटर, हाफ मॅरेथॉन 21 किलोमीटर, 10 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि व्हील चेअर रन अशा वेगवेगळ्या गटात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी माजी खासदार सुरेश कलमाडी, खासदार वंदना चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
विजेत्यांची नावे
21 किमी हाफ मॅरेथॉन (पुरुष गट)
1- हेकेबा मिटकू ताफा
2- मोली जीओर्गिस मेगानेन
3 - जेकेबे गदिसा ताफा
21 किमी हाफ मॅरेथॉन (महिला गट)
1- देफा गदीदी
2- मोती वोनशेत खीना
3- दादी सिवे गदिसा
5 किमी महिलांची मॅरेथॉन
1- आकांक्षा गायकवाड
2- सायली गांजवे
3- सिया दत्तात्रेय मूलक
5 किमी पुरुषांची मॅरेथॉन
1- सागर दळवी
2- तेलवी सागर बेग
3- पियुष मोहन बडू
10 किमी महिलांची मॅरेथॉन
1- शितल भगत
2- स्वाती वानवडे
3- निकिता जयदेव नागपुरे
पुणे मॅरेथॉन : यंदाही आफ्रिकन खेळाडूंचेच वर्चस्व, इथिओपियाचा अटलाव डेबेड विजयी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Dec 2018 01:04 PM (IST)
आज पुण्यात 33 वी आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. इथिओपियाचा धावपटू अटलाव डेबेड हा मुख्य स्पर्धेचा विजेता ठरला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -