Elon Musk News: टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर ते ट्विटरवर खूप सक्रिय आहेत. त्यातच त्यांचं एक विनोदी ट्वीट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.पुण्यातील एक सॉफ्टवेअर कंपनीचा सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून कार्यरत असलेल्या इंजिनियरला त्यांनी विनोदी ट्वीट करत रिप्लाय दिला आहे. प्रणय पाथोले असं या इंजिनिअरचं  नाव आहे.


इलॉन मस्क आणि प्रणय पाथोले हे दोघेही ट्विटरवर कायम सक्रिय असतात.त्यात फणय कायम एलॉन मस्कला काहीतरी ट्विटकरुन टॅग करत असतो.यावरुन  दोघांमधील ऑनलाईन मैत्री चांगली आहे, असं दिसतं.ते दोघेही एकमेकांना रिट्विट करत असतात.


प्रणय पाथोलेचं ट्विट


"बर्‍याच लोकांना वाटते की इलॉन मस्क माझे ट्विटर खाते चालवतो आणि ते खरे आहे. तो खूप व्यस्त माणूस आहे, रॉकेट बनवतो, जीवन बहुग्रह बनवतो, भविष्यासाठी इलेक्ट्रिक वाहने बनवतो, बोगदे खोदतो आणि कसा तरी त्याला वेळ मिळतो. एकाधिक Twitter खाती चालवा.. होय,असं सोमवारी सॉफ्टवेअर कंपनीचा सॉफ्टवेअर डेव्हलपर असलेल्या प्रणय पाथोलेने केलं होतं. त्यावर एलॉन मस्कने मजेदार रिप्लाय दिल्याचं दिसतं. प्रणय पाथोळे याचे ट्विटरवर दीडलाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत.सध्या प्रणय पाथोळे हे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये कार्यरत आहेत.


इलॉन मस्कचा रिप्लाय


"हाहा माझ्याकडे बर्नर ट्विटर खाते देखील नाही! माझे एक अतिशय गुप्त Instagram खाते आहे त्यामुळे मी मित्रांनी मला पाठवलेल्या लिंकवर क्लिक करू शकतो.", असा रिप्लाय इलॉन मस्क यांनी पाथोले यांनी दिला आहे. 


ट्विटरमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्यांच्या संख्येत वाढ


इलॉन मस्क यांनी संपूर्ण ट्विटर विकत घेण्याच्या सौद्यामुळे ट्विटरमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्यांची संख्या 250 टक्क्यांनी वाढली आहे. मात्र, ट्विटरमध्ये आधीपासून काम करणारे नोकरदार चिंतेत आहेत. मध्यंतरी मस्क यांनी यासंबंधित ट्विटरवर भाष्य केलं होतं. मस्क म्हणाले होते की, ट्विटर विकत घेण्याचा व्यवहार पूर्ण झाला तर, सर्वात आधी कंपनी हार्डकोर सॉफ्टवेयर इंजिनीरयरिंग, डिझाइन, इन्फोसेक आणि सर्व्हर हार्डवेयर यांवर अधिक लक्ष केंद्रित करेल. टेक्निकल भागाचे सर्व मॅनेजर हे अव्वल दर्जाचे असले पाहिजेत, असेही मस्क म्हणतात