पुणे: पुण्यात १६ वयोवृद्ध रुग्णांना वृद्धाश्रमाच्या (Old Age home) नावाखाली अक्षरश उघड्यावर ठेवण्यात आलं. उपचारांसाठी ससून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या या जेष्ठ नागरिकांना परत नेण्यासाठी त्यांचे कुटुंबीय आलेच नाहीत. अशा रुग्णांना विविध वृद्धाश्रमांमध्ये (Old Age home) काही दिवसांनी पाठवण्यात येतं. असे काही रुग्ण ससून रुग्णालयाकडून दादासाहेब गायकवाड चालवत असलेल्या आस्क ओल्ड एज होम या संस्थेकडे सोपवले होते. ही संस्था धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असून संस्थेचा पुण्यातील फुरसुंगी भागात वृद्धाश्रम (Old Age home) असल्याचा संस्थेकडून दावा करण्यात आला होता. मात्र काही दिवसांनी या संस्थेचा प्रमुख दादासाहेब गायकवाडने संस्थेसाठी सरकारने मोफत जागा उपलब्ध करून द्यावी अन्यथा या वृद्ध रुग्णांचा सांभाळ करणं आपल्याला शक्य नाही असं म्हणत तो त्या रुग्णांना अक्षरश उघड्यवर घेऊन आला.(Old Age home)
Old Age home Pune Sassoon: कडाक्याच्या थंडीत हे वयोवृद्ध रुग्ण अक्षरश उघड्यावर
पुण्यातील भारत फोर्ज कंपनीच्या समोर कडाक्याच्या थंडीत हे वयोवृद्ध रुग्ण अक्षरश उघड्यावर राहत आहेत. थोडे थोडके नाहीतर १६ वयोवृद्ध रुग्ण इथं बेवारसपणे राहत आहेत. ससून रुग्णालयाने दादासाहेब गायकवाडकडे जेवढे रुग्ण सोपवले होते, तेवढे रुग्ण आत्ता तिथे नाहीयेत. या रुग्णांची चौकशी करण्यासाठी जेव्हा रुग्णांचे परिचित तिथं जातायत, तेव्हा दादासाहेब गायकवाड उडवाउडवीची उत्तरं देतोय, तर ससून रुग्णालय देखील हात झटकत आहेत. एकदा संस्थेकडे रुग्ण सोपवले की आमची जबादारी संपते, समाजकल्याण आणि धर्मादाय आयुक्ताची जबादारी सुरु होते असं ससून मधल्या संबंधित अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. यातील काही रुग्णांना गंभीर जखमा झालेल्या असून त्यातून रक्त आणि पु वाहतोय.
Old Age home Pune Sassoon: आपल्या वडिलांना घरी नेण्याबाबत बोलणं टाळलं
दुर्दैवाची बाब म्हणजे यातील एका रुग्णाला एक महिला पाणी पाजत असल्याचं एबीपी माझाच्या टीमला आढळलं. एबीपी माझाच्या प्रतिनिधींनी त्या महिलेला त्या संदर्भात विचारलं असता त्या वयोवृद्ध रुग्णाची आपण मुलगी असल्याचं तिने सांगितलं. मग तुम्ही तुमच्या वडिलांना घरी का घेऊन जात नाही असं एबीपी माझाच्या प्रतिनिधींनी त्या महिलेला विचारलं असता आपल्याला याबाबत काहीही बोलायचं नाही असं ती म्हणाली. यातून ढासळलेल्या कुटुंब व्यवस्थेच चित्रच जणू समोर येतंय. आई-वडील म्हातारे झाले की त्यांची देखभाल करण्याची आपली संस्कृती विसरून त्यांना निष्ठूरपणे रस्त्यावर सोडून दिलं जातंय. कौटुंबिक मूल्ये रसातळाला जातायत याच हे निदर्शक आहे.
Old Age home Pune Sassoon: पुन्हा असा प्रकार घडू नये यासाठी काळजी घेण्यात येईल
समाजकल्याण विभागाने दखल घेतल्यानंतर दादासाहेब गायकवाडला त्याच्या वृद्धाश्रमासाठी मदत करण्यात येणार आहे. त्यामुळे दादासाहेब गायकवाडने त्याचा फुरसुंगी इथला वृद्धाश्रम पुन्हा सुरु करायचे ठरवले आहे. त्यामुळे या रुग्णांना फुरसुंगी इथल्या गायकवाडच्या आश्रमात हलवण्यात येणार आहे. तर पुन्हा असा प्रकार घडू नये यासाठी काळजी घेण्यात येईल असं समाजकल्याण विभागाच्या आयुक्त दीपा मुंडे यांनी म्हटलंय. भारत फोर्ज कंपनी समोरील १६ पैकी १५ वृद्धांना पुन्हा दादासाहेब गायकवाड यांच्या वृद्धाश्रमात हलवण्यात येतंय, तर एका वृद्ध व्यक्तीला उपचारांसाठी ससुन रुग्णालयात भरती करण्यात येत आहे.
Old Age home Pune Sassoon: प्रकाश पुरोहीत या जेष्ठ नागरिकाचा मात्र ठावठिकाणा नाही
दादासाहेब गायकवाड यांच्याकडील १५ वृद्धांना पुन्हा वृद्धाश्रमात हलवण्यात आलं असलं तरी प्रकाश पुरोहीत या जेष्ठ नागरिकाचा मात्र ठावठिकाणा लागू शकलेला नाही. पुरोहित यांच्या परिचितांकडून पोलीस आयुक्तांना तक्रार देण्यात आलयानंतर मुंढवा पोलीसांना चौकशीचे आदेश देण्यात आलेत. पुण्याच्या कोथरुड भागात राहणाऱ्या प्रकाश पुरोहित यांना २३ सप्टेंबर २०२४ ला त्यांच्या नातेवाईकांनी ससुन रुग्णालयात दाखल केले होते. मात्र पुन्हा पुरोहित यांचे नातेवाईक ससुनकडे फिरकले नाहीत. त्यामुळे ससुन प्रशासनाने पुरोहितांना ४ डिसेंबर २०२४ ला दादासाहेब गायकवाडकडे सोपवले होते. गायकवाडचे म्हणणे आहे की त्याने पुरोहितांना पुन्हा ससुनमधे नेऊन सोडले आहे. मात्र ससुन प्रशासनाने याला नकार दिल्याने पोलीसांनी कारवाई सुरु केली आहे.