Eknath Shinde On Vidyanand Bapat Pune Marathi News: पुण्यातील गणेशोत्सवातील मिरवणुकांमध्ये डीजे आणि ढोल पथकांच्या माध्यमातून होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाविरोधात आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट (Vidyanand Bapat) यांना आज एका व्यक्तीकडून मारहाण करण्यात आली. संतोष चव्हाण या मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. एका माध्यमांशी बोलताना पुण्यातील टिळक रोड येथे विद्यानंद बापट यांना मारहाण झाली. विद्यानंद बापट यांना मारहाण झाल्यानंतर विविध स्तरावरुन प्रतिक्रिया समोर येत आहेत. याचदरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देखील प्रतिक्रिया दिली. गणेशोत्सव आपली संस्कृती आहे. त्याला गालबोट न लागता जोपसलं पाहिजे. नागरिकांची गैरसोय होईल, असं काही करू नका, हीच सरकारची भूमिका आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. (Eknath Shinde On Vidyanand Bapat)

Continues below advertisement

विद्यानंद बापट यांना मारहाण, सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप- (Supriya Sule On Vidyanand Bapat)

विद्यानंद बापट यांना मारहाण झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. डीजेच्या विरोधात आग्रही भूमिका मांडणारे विद्यानंद बापट यांच्याशी माझे बोलणे झाले. त्यांना काही व्यक्तींनी केलेल्या मारहाणीची घटना अत्यंत निषेधार्ह आहे. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. आपल्याला एखाद्याचे मत मान्य नसले, तरी त्या मताचा आणि ते मांडण्याच्या अधिकाराचा आदर व्हायला हवा. मात्र, अलीकडच्या काळात विरोधी मत मांडणाऱ्यांचा आवाज दडपण्यासाठी मारहाण करणे, दांडगाई करून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करणे, ही प्रवृत्ती लोकशाहीसाठी घातक आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. वैचारिक मतभेदांना हिंसेने उत्तर देण्याची ही पद्धत महाराष्ट्राच्या सुसंस्कृत आणि पुरोगामी परंपरेला अजिबात शोभणारी नाही. विद्यानंद बापट यांना झालेल्या मारहाणीचा आम्ही तीव्र निषेध करतो. गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे. बदलत्या काळाशी सुसंगत राहून, आपल्या संस्कृतीचे भान जपत हा उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा व्हावा. गणेशोत्सव हा समाजाला एकत्र आणणारा, आनंद देणारा आणि उत्साह वाढविणारा असावा, हीच सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

विद्यानंद बापट यांना मारहाण करणारा नेमका कोण? (Vidyanand Bapat Pune Marathi News)

विद्यानंद बापट यांना मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव संतोष चव्हाण असून तो पुण्यातील कोथरूड परिसरातील राऊतवाडी येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. तो एका बांधकाम व्यावसायिकाकडे कामाला असल्याचीही माहिती आहे. राऊतवाडी येथील प्रियदर्शनी गणेश मंडळाचा तो माजी अध्यक्ष असल्याचेही सांगितले जात आहे. गणेशप्रेमी असलेल्या संतोष चव्हाणने बापट यांच्यावर हल्ला नेमका का केला? यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Continues below advertisement

विद्यानंद बापट यांना मारहाण, नेमकं काय घडलं? (Vidyanand Bapat Pune News)

पुण्यातील गणेशोत्सवातील मिरवणुकांमध्ये डीजे आणि ढोल पथकांच्या माध्यमातून होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाविरोधात आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना आज (3 सप्टेंबर) मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. विद्यानंद बापट यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे धार्मिक संघटना, डीजेप्रेमी आणि ढोलवादक पथकातील अनेकजण नाराज झाले होते. विद्यानंद बापट यांनी यापूर्वी पुणे महानगरपालिकेच्या सभेत डीजेला विरोध केला होता. तेव्हाही गणेश मंडळांचे प्रतिनिधी आणि राजकीय व्यक्तींनी बापट यांना विरोध केला होता. तेव्हादेखील बापट यांना पालिकेच्या सुरक्षारक्षकांनी बंदोबस्तात बाहेर काढले होते. मात्र, आता विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला झाला आहे. त्यांना मारहाण करण्यात आली आहे.

संबंधित बातमी:

Vidyanand Bapat Marathi News: पुण्यात डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण; हल्ला होताच म्हणाले, घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्!

Vidyanand Bapat Marathi News: घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्...; विद्यानंद बापट यांनी उच्चारलेल्या वाक्याचा नेमका अर्थ काय?