एक्स्प्लोर

ऊसाला तोड का देत नाही?  इंदापुरात कारखान्याच्या संचालकाकडूनच कर्मचाऱ्याला मारहाण,  संचालकावर गुन्हा दाखल

श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या (Shri Chhatrapati Cooperative Sugar Factory) फिल्डमनला त्याच कारखान्याच्या संचालकाने मारहाण केल्याची घटना घडली आहे.

Shri Chhatrapati Cooperative Sugar Factory : इंदापूर (Indapur) तालुक्यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या (Shri Chhatrapati Cooperative Sugar Factory) फिल्डमनला त्याच कारखान्याच्या संचालकाने ऊसाला तोड का देत नाही? या कारणातून शिवीगाळ करत ऊसाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुरेश विरचंद भोईटे असं मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे. तो छत्रपती सहकारी साखर कारखान्यात फील्डमन म्हणून काम करतो.  सुरेश भोईटे यांच्या तक्रारीवरून आता वालचंद नगर पोलीस ठाण्यात कारखान्याचे संचालक सर्जेराव शिवाजी जामदार यांच्यासह अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारखान्यातील कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण मिळाला पाहिजे अशी मागणी

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना चालवला जातो. राज्यात ऊस गाळपाचा हंगाम चालू आहे. शेतकऱ्यांच्या उसाला वेळेवर तोड मिळत नाहीत म्हणून शेतकरी देखील मेटाकुटीला आले आहेत. अशा वेळी कारखान्याचे संचालकच नियम धाब्यावर बसून ऊसाला तोड मागत असतील आणि थेट कर्मचाऱ्यांनाच मारहाण करत असतील तर सर्वसामान्य शेतकऱ्यांनी जाब विचारायचा कोणाला ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळं या सर्व प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. तर या सर्व घडामोडीनंतर कारखान्यातील कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण मिळाला पाहिजे अशी मागणी विशाल मधुसुदन निंबाळकर यांनी कारखाना प्रशासनासह राज्याच्या साखर आयुक्तांकडे केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय बाबुराव चांदेरे यांनी एका नागरिकाला मारहाण केल्याचा व्हिडीओ देखील नुकताच व्हायरल झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस नेते बाबुराव चांदेरे यांनी भरदिवसा विजय रौंदळ या नागरिकाला मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती.  बाबुराव चांदेरे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे माजी नगरसेवक पुणे महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर ते अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत. या अगोदरही बाबुराव चांदेरे  यांनी एका रिक्षाचालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ही घटना ताजी असतानाच अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालकाने कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे.

महत्वाच्या बातम्या:

Ajit Pawar: अजित पवारांच्या निकटवर्तीयांकडून वृद्ध नागरिकाला मारहाण; अजितदादांना विचारणा करताच म्हणाले, 'त्यांचा फोन बंद आहे...'

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
Ajit Pawar : महेश लांडगे नासका आंबा, भारंदाज डाव टाकून फिरवून फेकून दिला नाही तर पवारांची औलाद नाही : अजित पवार
महेश लांडगे नासका आंबा, भारंदाज डाव टाकून फिरवून फेकून दिला नाही तर पवारांची औलाद नाही : अजित पवार
Devendra Fadnavis and Ajit Pawar: पुण्यातील शेवटच्या प्रचारसभेतही देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांना सोडलं नाही, म्हणाले, 'खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा'
पुण्यातील शेवटच्या प्रचारसभेतही देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांना सोडलं नाही, म्हणाले, 'खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा'
Nashik Election 2026: 'आप'च्या उमेदवारावर रोखलेली 'ती' बंदूक नव्हे तर लायटर; परस्पर विरोधी गुन्हा दाखल, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
'आप'च्या उमेदवारावर रोखलेली 'ती' बंदूक नव्हे तर लायटर; परस्पर विरोधी गुन्हा दाखल, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
Ajit Pawar : महेश लांडगे नासका आंबा, भारंदाज डाव टाकून फिरवून फेकून दिला नाही तर पवारांची औलाद नाही : अजित पवार
महेश लांडगे नासका आंबा, भारंदाज डाव टाकून फिरवून फेकून दिला नाही तर पवारांची औलाद नाही : अजित पवार
Devendra Fadnavis and Ajit Pawar: पुण्यातील शेवटच्या प्रचारसभेतही देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांना सोडलं नाही, म्हणाले, 'खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा'
पुण्यातील शेवटच्या प्रचारसभेतही देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांना सोडलं नाही, म्हणाले, 'खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा'
Nashik Election 2026: 'आप'च्या उमेदवारावर रोखलेली 'ती' बंदूक नव्हे तर लायटर; परस्पर विरोधी गुन्हा दाखल, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
'आप'च्या उमेदवारावर रोखलेली 'ती' बंदूक नव्हे तर लायटर; परस्पर विरोधी गुन्हा दाखल, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
Uddhav Thackeray: प्रचंड खुर्च्यांसमोर मुख्यमंत्र्यांनी संबोधित केलं; खुर्च्यांचा प्रचंड प्रतिसाद होता, उद्धव ठाकरेंनी भाजपच्या मोकळ्या खुर्च्यांच्या व्हायरल व्हिडीओवरून डिवचलं
प्रचंड खुर्च्यांसमोर मुख्यमंत्र्यांनी संबोधित केलं; खुर्च्यांचा प्रचंड प्रतिसाद होता, उद्धव ठाकरेंनी भाजपच्या मोकळ्या खुर्च्यांच्या व्हायरल व्हिडीओवरून डिवचलं
तोपर्यंत बिनविरोध नगरसेवकांवर स्थगिती कायम ठेवावी; अविनाश जाधवांनी मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या तातडीची सुनावणी
तोपर्यंत बिनविरोध नगरसेवकांवर स्थगिती कायम ठेवावी; अविनाश जाधवांनी मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या तातडीची सुनावणी
Ajit Pawar Pune Metro: पुणे मेट्रो मोफत करण्यावरुन फडणवीसांनी खिल्ली उडवली, अजितदादांनी प्लॅनच सांगितला
पुणे मेट्रो मोफत करण्यावरुन फडणवीसांनी खिल्ली उडवली, अजितदादांनी प्लॅनच सांगितला
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी अदानींचा वकील नाही, पण...; राज ठाकरेंचा पुन्हा पलटवार, एकच उद्योगपती एवढा मोठा कसा?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी अदानींचा वकील नाही, पण...; राज ठाकरेंचा पुन्हा पलटवार, एकच उद्योगपती एवढा मोठा कसा?
Embed widget