एक्स्प्लोर

Devendra Fadnavis and Supriya Sule: फडणवीसांनी मोफत मेट्रो प्रवासावरुन अजितदादांची खिल्ली उडवली, सुप्रिया सुळे मदतीला धावल्या, 15 लाखांचा मुद्दा बाहेर काढला

Supriya Sule on Devendra Fadnavis: कदाचित हा त्यांचाही अनुभव असेल, 15 लाख रुपये प्रत्येकाच्या अकाउंट मध्ये ते घालणारच होते ना, त्यामुळे त्यांचा अनुभव असेल तो, कदाचित असूही शकतो असंही सुळेंनी म्हटलं आहे.

पुणे: महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभरात घडामोडींना वेग आला आहे, तर राज्यातील सत्तेत सहभागी असलेले पक्ष महापालिकेत वेगवेगळे लढत आहे, या दरम्यान त्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप देखील केल्याचं दिसून येत आहे. भाजप नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी काढलेल्या जाहीरनाम्यावर आणि केलेल्या मोफत मेट्रोच्या घोषणेची खिल्ली उडवली. त्याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या कदाचित हा त्यांचाही अनुभव असेल, 15 लाख रुपये प्रत्येकाच्या अकाउंट मध्ये ते घालणारच होते ना, त्यामुळे त्यांचा अनुभव असेल तो, कदाचित असूही शकतो, आमचा अनुभव आणि आमचं काम आहे. आम्ही जे जे शब्द दिले आहेत, ते ते नेहमीच पाळले आहेत, सरसकट कर्जमाफी 70 हजार कोटी रुपयांची ही आम्ही केली होती, त्यांनी शब्द दिला आहे पण त्यांनी अजूनही कर्जमाफी दिलेली नाही, असेही पुढे सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे 

तर आज-काल भाषणे कमी झाली आहेत. पण इंटरव्यू वाढले आहेत. महाराष्ट्रात सध्या बघते आहे मी सर्व न्यूज चैनल वरती तेच दिसत आहे,  ही लोकशाही आहे प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे मला असं वाटतं महाराष्ट्रात आम्ही बहीण भाऊ किंवा ते दोन भाऊ काय करतात त्याच्यापेक्षा जास्त आव्हान आज देशासमोर आहेत असाही पुढे सुप्रिया सुळे यांनी म्हटला आहे.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणालेत?

अजित पवार म्हणाले मेट्रोचे तिकीट मोफत केलं तर हे खरंच शक्य आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले आज मी जाहीर करणार होतो की पुण्यातून उडणारी जेवढी विमान आहेत, त्या विमानांमध्ये महिलांना तिकीट माफ केलं पाहिजे, अनाउन्स करायला काय जातंय, अनाउन्स करायला आपल्या बापाचं काय जातंय, यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. 

पुढे फडणवीस म्हणाले कसंय, अनेक वेळा आम्ही राजकीय क्षेत्रातील लोक आहोत, अनेक वेळा निवडणुकीच्या जिंकण्याच्या डेस्परेशनमध्ये ज्यावेळी आम्हाला माहिती असतं की निवडून येता येत नाही अशा परिस्थितीत आम्ही काही जाहीरनामे काढतो, त्या जाहीरनाम्यामध्ये काहीही म्हणतो पण तरी माझं म्हणणं आहे की किमान पब्लिकचा विश्वास बसेल असा तरी गोष्टी म्हटल्या पाहिजे ज्या आपण करू शकू, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या घोषणांची खिल्ली उडवली आहे

देवेंद्र फडणवीस म्हणाले, अजित पवार फक्त बोलतात. माझं काम बोलतं. मी आत्तापर्यंत संयम पाळला त्यांचा संयम ढासळला आहे. १५ तारखेनंतर अजित दादा नाही बोलणार देवेंद्र फडणवीस बोलणार आहे. कुठलाही परिवार एकत्र येत असेल तर मला आनंद आहे. राज ठाकरे यांनी मला क्रेडिट दिलं त्यांचं मी आभार मानतो, त्यांचा मला आशीर्वाद मिळेल असंही फडणवीस म्हणालेत.

Devendra Fadnavis and Ajit Pawar: अजित पवारांच्या घोषणा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षांनी संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यामध्ये, महापालिकेवर सत्ता आल्यास पुणेकरांना मेट्रो मोफत करणार अशी भलीमोठी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी केली. त्यामुळे, सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मात्र, मेट्रो (Metro) मोफत करण्याचा अधिकार महापालिकेला आहे का, यासह अनेक प्रश्न मतदारांना पडले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुणेकरांना मोफत मेट्रो आणि मोफत बस सेवेचे आश्वासन देण्यात आले आहे. पुण्यातील वाहतूक कोंडी आणि खराब रस्ते यामुळे पुणेकरांचे पेट्रोलच्या स्वरूपात दररोज साडे सात कोटी रुपये वाया जातात. अशाप्रकारे वर्षाला दहा हजार आठशे कोटी रुपये पेट्रोलच्या स्वरूपात वाया जातात. त्यामुळे ते पैसे मेट्रोच्या प्रवासासाठी वापरता येतील, असा मोठा प्लॅन अजित पवारांनी सांगितला आहे. त्यामुळे, पुण्यात मोफत मेट्रो शक्य आहे का? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Parth Pawar on Baramati By Election: बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती, पण काही लोकांनी...; पार्थ पवारांचा मोठा दावा
बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती, पण काही लोकांनी...; पार्थ पवारांचा मोठा दावा
Pimpri-Chinchwad: व्हॉट्सॲपवर भ्रष्टाचाराचे आरोप, भाजपचे दोन नेते आपापसात भिडले, आधी धमकी अन् नंतर हल्ला... नेमकं काय घडलं?
व्हॉट्सॲपवर भ्रष्टाचाराचे आरोप, भाजपचे दोन नेते आपापसात भिडले, आधी धमकी अन् नंतर हल्ला... नेमकं काय घडलं?
Chhota Varkari : 'छोटा वारकरी'ने मारली बाजी! महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेचा जागतिक गौरव, वारीव्हर्स स्टुडिओजला Creative AI Luminary Award 2026 प्रदान
'छोटा वारकरी'ने मारली बाजी! महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेचा जागतिक गौरव, वारीव्हर्स स्टुडिओजला Creative AI Luminary Award 2026 प्रदान
Pune Crime News : खळबळजनक! मुठा नदीपात्रात अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला, घातपाताचा संशय, पुणे पोलिसांकडून तपास सुरु
खळबळजनक! मुठा नदीपात्रात अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला, घातपाताचा संशय, पुणे पोलिसांकडून तपास सुरु

व्हिडीओ

Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका
Special Report Mumbai Local : मुंबईमध्ये आता अंडरग्राऊंड लोकल सुरु होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दादांच्या निधनानंतर साहेब थोडे मानसिक खचले होते, या वयात ट्रिटमेंटचं कोण धाडस करत नाही, पण त्यातून बाहेर आले; रोहित पवारांकडून जयसिंगराव पवारांच्या कुटुंबियांचे सांत्वन; आठवणींना उजाळा
दादांच्या निधनानंतर साहेब थोडे मानसिक खचले होते, या वयात ट्रिटमेंटचं कोण धाडस करत नाही, पण त्यातून बाहेर आले; रोहित पवारांकडून जयसिंगराव पवारांच्या कुटुंबियांचे सांत्वन; आठवणींना उजाळा
'भाजप संपवायला निघालेले मुश्रीफ गोकुळमध्ये आपल्यासोबत नकोत' आमदार शिवाजी पाटलांची चंद्रकांतदादांसमोर भूमिका; मूश्रीफ सुद्धा बोलले, दिवसभरातील हायहोल्टेज बैठकांमध्ये काय काय घडलं?
'भाजप संपवायला निघालेले मुश्रीफ गोकुळमध्ये आपल्यासोबत नकोत' आमदार शिवाजी पाटलांची चंद्रकांतदादांसमोर भूमिका; मूश्रीफ सुद्धा बोलले, दिवसभरातील हायहोल्टेज बैठकांमध्ये काय काय घडलं?
IPL 2026: सचिन, सेहवाग, धोनीसोबत टीम इंडियाकडून टी-20 खेळला, तरीही आयपीएलमधून बाहेर! 'या' क्रिकेटरसोबत असं नेमकं काय घडलं?
सचिन, सेहवाग, धोनीसोबत टीम इंडियाकडून टी-20 खेळला, तरीही आयपीएलमधून बाहेर! 'या' क्रिकेटरसोबत असं नेमकं काय घडलं?
Rashid Khan: 'आयपीएलच्या 2023 च्या मोसमात मला अफगाणिस्तान सोडून...' राशिद खानचा सनसनाटी खुलासा! नेमकं काय म्हणाला फिरकी स्टार?
'आयपीएलच्या 2023 च्या मोसमात मला अफगाणिस्तान सोडून...' राशिद खानचा सनसनाटी खुलासा! नेमकं काय म्हणाला फिरकी स्टार?
Kolhapur Crime: ऑनलाईन गेमिंगमध्ये लावलेले सगळे पैसे हरला, कोल्हापुरात तरुणाने नैराश्याच्या भरात आयुष्य संपवलं; अवघ्या वर्षभरापूर्वीच वडिलांचे निधन
ऑनलाईन गेमिंगमध्ये लावलेले सगळे पैसे हरला, कोल्हापुरात तरुणाने नैराश्याच्या भरात आयुष्य संपवलं; अवघ्या वर्षभरापूर्वीच वडिलांचे निधन
Hingoli Crime : अनैसर्गिक संबंधांसाठी नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकाचा तगादा, सततच्या त्रासाला कंटाळून 24 वर्षीय तरुणाने आयुष्य संपवलं, कळमनुरी हादरलं!
अनैसर्गिक संबंधांसाठी नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकाचा तगादा, सततच्या त्रासाला कंटाळून 24 वर्षीय तरुणाने आयुष्य संपवलं, कळमनुरी हादरलं!
Sudhir Mungantiwar vs Kishor Jorgewar: 'हा वाद माझ्या आटोक्याबाहेर'; चंद्रपुरातील मुनगंटीवार-जोरगेवार वादासमोर भाजप प्रदेशाध्यक्षांनी टेकले हात, आता थेट दिल्लीतून होणार फैसला, नेमकं काय घडलं?
'हा वाद माझ्या आटोक्याबाहेर'; चंद्रपुरातील मुनगंटीवार-जोरगेवार वादासमोर भाजप प्रदेशाध्यक्षांनी टेकले हात, आता थेट दिल्लीतून होणार फैसला, नेमकं काय घडलं?
Sanjeev Jaiswal Motilal nagar: 'घरं कशी मिळतात बघतो, तू घुसखोर आहेस का?, इथूनच उचलतो', म्हाडाच्या संजीव जयस्वालांची रहिवाशांच्या बैठकीत मुजोरी
'घरं कशी मिळतात बघतो, तू घुसखोर आहेस का?, इथूनच उचलतो', म्हाडाच्या संजीव जयस्वालांची रहिवाशांच्या बैठकीत मुजोरी
Embed widget