एक्स्प्लोर

दीनानाथ रुग्णालय महिला मृत्यू प्रकरण : माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल आज सादर होणार नाही; समोर आलं मोठं कारण

Deenanath Mangeshkar Hospital : माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल आज सादर होणार नाही, अशी माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.

Deenanath Mangeshkar Hospital : पुण्यात तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मागील आठवड्यात घडली. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर (Deenanath Mangeshkar Hospital) या प्रकरणी हलगर्जीपणाचा आरोप होत आहे. रुग्णालयाने उपचारांसाठी 10 लाख रुपये अनामत रक्कम मागितली, ती न दिल्याने उपचारांना उशीर झाला आणि तनिषा भिसे दगावल्या असा आरोप केला जात आहे आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. त्यात राज्य शासनाच्या समितीचा अहवाल काल (दि. 07) सादर झाला. त्यात रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आला आहे. तर आज (दि. 08) माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल येणार होता. मात्र आज हा अहवाल सादर होणार नाही, अशी माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.  

माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल आज सादर होणार नाही

दीनानाथ रुगणालय महिला मृत्यू प्रकरणाचा माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल आज सादर होणार नाही, अशी माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. या समितीकडून डॉक्टर आणि भिसे कुटुंबीयांची सखोल चौकशी करण्यात आली आहे. या सगळ्यांकडून माहिती संकलित केलेली आहे. त्या माहितीच्या पडताळणीसाठी वेळ लागणार असल्याची माहिती समोर येत आहे. दीनानाथ रुग्णालयासंदर्भातील निष्कर्ष आज ठरणार नाही.  या प्रकरणी तीन समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. त्यात राज्य शासनाच्या समितीचा अहवाल काल सादर झाला आणि त्यात रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आला. आता माता मृत्यू समिती आणि धर्मादाय आयुक्तांच्या समितीचा अहवाल आल्यानंतर अंतिम निष्कर्ष ठरवण्यात येणार आहे. आज हा अहवाल येणार होता. मात्र माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल यायला वेळ लागणार आहे. त्यामुळे दीनानाथ रुग्णालयासंदर्भातील निर्णय आज होणार नाही. 

महापालिका पाठवणार मंगेशकर रुग्णालयाला नोटीस

तसेच मिळकत कराच्या थकबाकीसाठी महापालिका मंगेशकर रुग्णालयाला नोटीस पाठवणार आहे. मंगेशकर रूग्णालय धर्मादाय संस्थेच्या माध्यमातून चालविण्यात येत असल्याने त्यानुसार मिळकत करामध्ये सवलत देण्याबाबत रुग्णालय न्यायालयात गेले आहे. त्यावर न्यायालयाने निर्णय दिलेला नाही किंवा कर वसुलीला स्थगिती दिलेली नाही. 22 कोटी रुपयांची थकबाकी भरण्यासाठी महापालिकेकडून रुग्णालयास नोटीस बजावण्यात येणार आहे. धर्मादाय कायद्यानुसार मिळकत करामध्ये सवलत द्यावी, या मागणीसाठी रूग्णालय प्रशासन 2017 मध्ये न्यायालयात गेले आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. तसेच न्यायालयाने कर वसुलीला स्थगिती देखील दिलेली नाही.

...तर पुणे पोलीस गुन्हा दाखल करणार

दरम्यान, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणात मेडिकल निगलिजन्स आढळल्यास पुणे पोलीस गुन्हा दाखल करणार आहेत. या प्रकरणी ससूनच्या अधीक्षकांना पत्र लिहीत पोलिसांनी स्पष्टीकरण मागितले आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात झालेल्या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून पुणे पोलिसांनी पत्र लिहिलं आहे. यात महिलेला 5.30 तास रुग्णालयात बसवून ठेवल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी ससूनला लेखी पत्र लिहित पोलिसांनी माहिती मागवली आहे. या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे पोलिसांनी पत्रासोबत जोडली असल्याची माहिती समोर येत आहे. 

आणखी वाचा 

VIDEO Chitrasen Khilare : 35 वर्षांपूर्वी 'दीनानाथ'ला जागा देऊन आम्ही चूक केली का? मूळ मालक खिलारे कुटुंबीयांना आज काय वाटतंय?  

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pune FDA Mahaprasad : गणेश मंडळांकडून प्रसाद अन् अन्नदानासाठी एफडीए नोंदणी बंधनकारक; ‘एफडीए’ची नजर, नोंदणी बंधनकारक, नवी नियमावली जाहीर
गणेश मंडळांकडून प्रसाद अन् अन्नदानासाठी एफडीए नोंदणी बंधनकारक; ‘एफडीए’ची नजर, नोंदणी बंधनकारक, नवी नियमावली जाहीर
Maharashtra Rain News: गणपतीत पाऊस धिंगाणा घालणार, राज्यातील 11 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’, हवामान विभागाचा अंदाज काय?
गणपतीत पाऊस धिंगाणा घालणार, राज्यातील 11 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’, हवामान विभागाचा अंदाज काय?
Congress Ratnakar Mahajan Passes Away: मोठी बातमी: काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचं पुण्यात निधन
मोठी बातमी: काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचं पुण्यात निधन
साखर आणि तेलानंतर आता कांद्याच्या दरात मोठी वाढ, पण शेतकऱ्यांना फायदा मिळतोय का? प्रति किलोसाठी किती दर? 
साखर आणि तेलानंतर आता कांद्याच्या दरात मोठी वाढ, पण शेतकऱ्यांना फायदा मिळतोय का? प्रति किलोसाठी किती दर? 

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BRICS Summit: दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
Chandrashekhar Bawankule on OYO rooms:ओयो रुमबाबतचे नियम आणखी कडक करणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे संकेत, विश्वास नांगरे पाटलांचं कौतुक, म्हणाले...
ओयो रुमबाबतचे नियम आणखी कडक करणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे संकेत, विश्वास नांगरे पाटलांचं कौतुक, म्हणाले...
Seema Haider Video: सचिन मीना कुठे गेला? सीमा हैदरचा शेअर केलेल्या व्हिडीओत दिसला वकीलांचा फोटो, युजर म्हणाले,
सचिन मीना कुठे गेला? सीमा हैदरचा शेअर केलेल्या व्हिडीओत दिसला वकीलांचा फोटो, युजर म्हणाले, "मागे...."
Ajay Baraskar: मनोज जरांगे चालबाज अन् बंडलबाज माणूस; एवढी वाईट वेळ आली की मुंबईला जाण्याचा मार्ग बदलला, कारण...; अजय बारसकरांची बोचरी टीका, सगळंच काढलं!
मनोज जरांगे चालबाज अन् बंडलबाज माणूस; एवढी वाईट वेळ आली की मुंबईला जाण्याचा मार्ग बदलला, कारण...; अजय बारसकरांची बोचरी टीका, सगळंच काढलं!
BRICS Summit : ग्लोबल गव्हर्नन्स रिफॉर्म्ससाठी ब्रिक्स देशांनी 10 प्रस्ताव तयार करावेत, ब्रिक्सनं नव्या आणि महत्वाकांक्षी अजेंड्यावर काम करावं : नरेंद्र मोदी
ब्रिक्सनं नव्या आणि महत्वाकांक्षी अजेंड्यावर काम करावं, ब्रिक्सच्या 20 वर्षांच्या प्रवासाचा दाखला देत नरेंद्र मोदी यांचं आवाहन
Embed widget