Deenanath Mangeshkar Hospital Pune: गर्भवती महिलेकडून 20 लाखांची मागणी, जुळ्या मुलांचा जन्म, पण आईचा दुर्दैवी मृत्यू; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Deenanath Mangeshkar Hospital Pune: राज्यभरातून पुण्यातील दीनानाथ रुग्णालयाच्या कारभारावर तीव्र संतप्त प्रतिक्रिया येतं असतानाच रुग्णालया प्रशासनाकडून समाधनकारक स्पष्टीकरण देण्यात येतं नाहीय.

Deenanath Mangeshkar Hospital Pune पुणे: पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रूग्णालय (Deenanath Mangeshkar Hospital Pune) सध्या वादात सापडलंय. तनिषा भिसे (Tanisha Bhise) यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल केलं. तेव्हा हॉस्पिटल प्रशासनाने 20 लाखांची मागणी केली होती. पण अडीच लाख भरायला तयार असूनही रुग्णालयाने दाखल करुन घेतली नाही, अशी तक्रार भाजप आमदार अमित गोरखेंनी केली आहे. दीनानाथ मंगेशकर या रुग्णालयातून दुसरीकडे नेत असतानाच वाटेतच तनिषा यांनी जुळ्या मुलांना जन्म दिला, पण तनिषा भिसेंचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.
राज्यभरातून पुण्यातील दीनानाथ रुग्णालयाच्या कारभारावर तीव्र संतप्त प्रतिक्रिया येतं असतानाच रुग्णालया प्रशासनाकडून समाधनकारक स्पष्टीकरण देण्यात येतं नाहीय. यावरुन नागरिक चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. पुण्यातील दीनानाथ रुग्णालयाच्या कारभाराविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेसह शिंदेंची शिवसनेना आक्रमक झाली आहे. चर्चा करायला आलेल्या रूग्णालय अधिकाऱ्यांवर आंदोलकांनी चिल्लर फेकले. रूग्णालयाच्या बेफिकिरीवर मंगेशकर कुटुंबाने उत्तर देण्याची मागणी देखील करण्यात येत आहे. त्यानंतर काही वेळांनी आंदोलकांनी इथल्या अधिकाऱ्यांना निवेदन दिलं. यावेळी रुग्णालय प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, तर संतप्त पतित पावन संघटनेकडून रूग्णालयाच्या बोर्डाला काळं फासण्यात आलं.
पुण्याचे जिल्हाधिकारी काय म्हणाले?
सदर प्रकरणाची आम्ही नोंद घेतली आहे. उचित कारवाई करणार आहोत, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले. भाडेतत्वावर कुणालाही जमीन देताना काही अटी असतात. त्या अटी शर्थी बघून निर्णय घेऊ, असंही जितेंद्र डुडी यांनी स्पष्ट केले. कडक कारवाई करणं आवशक आहे. रिपोर्ट आल्यानंतर कळेल नेमकं काय घडलं होत. चूक कोणाची आहे? हे नेमकं रिपोर्ट आल्यानंतर कळेल.दोन दिवसात रिपोर्ट देण्यास सांगितलं आहे. केस पेपर आम्ही बघणार आहोत, असं जितेंद्र डुडी यांनी स्पष्ट केले आहे.
दीनानाथ रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर काय म्हणाले?
दीनानाथ रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर म्हणाले की, या घटनेसंदर्भात दीनानाथ रुग्णालयाकडून चौकशी केली जाईल. यासंदर्भातला अहवाल आम्ही राज्य सरकारला सादर करणार आहोत. मीडियात सध्या बातम्या येत आहेत त्या अर्धवट आहेत. त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी केली जाणार आहे. सध्या मला जास्त बोलता येणार नाही, असं रवी पालेकर यांनी सांगितले.






















