पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचं (Ajit Pawar) आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा (IPS Anjana Krishna) यांच्यातील संवादाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता, यावरती राज्यातील विरोधकांनी सत्ताधाऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. दरम्यान अजित पवारांनी याबाबत आपली भावना देखील व्यक्त केली होती. त्यानंतर आता कुर्डु गावातील अवैध उत्खननाच्या विषयावर बोलणे पुन्हा एकदा टाळल्याचं दिसून आलं आहे. महिला आयपीएस अधिकाऱ्याला फोन करुन धमकावल्याबद्दल वादात सापडलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून आज जनसंवाद उपक्रम सुरु करण्यात येतोय. या उपक्रमाची सुरुवात आजपासून पुण्यातील हडपसर मतदारसंघातून होत आहे.
या उपक्रमाच्या अंतर्गत अजित पवार सकाळी नऊ वाजल्यापासून नागरिकांच्या समस्या ऐकून घेत आहेत. राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून जाहीर करण्यात आलं आहे. त्यासाठी अजित पवारांसाठी काम करणाऱ्या डिझाईन बॉक्स कंपनीकडून त्यासाठी आखणी करण्यात आली आहे. सोलापुर जिल्ह्यातील कुर्डु गावात झालेल्या प्रकारामुळे अजित पवारांच्या प्रतिमेला धक्का लागल्याच मानलं जातं आहे. त्याची भरपाई करण्यासाठी डिझाईन बॉक्स कंपनीकडून अजित पवारांच्या जनसंवाद उपक्रमाचे राज्यभर आयोजन करण्यात आलं आहे. मात्र या उपक्रमाच्या आधी अजित पवारांना कुर्डू गावातील उत्खनन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अवैध ठरवल्याबद्दल विचारलं असता त्यांनी पुन्हा एकदा काढता पाय घेतला आहे.
नेमकं काय घडलं होतं?
माढ्याच्या कुर्डू गावात रस्त्यासाठी मुरुम उत्खनन होत असल्याची तक्रार आल्यानुसार करमाळ्याच्या पोलिस उपअधिक्षक अंजना कृष्णा या घटनास्थळी पोहचल्या. मुरुम उचलण्याच्या मुद्यावरुन कुर्डू गावातील नागरीक आणि अंजली कृष्णा यांच्यामध्ये शाब्दिक जुगलबंदी रंगली. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबा जगताप या कार्यकर्त्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावून अंजली कृष्णा यांच्या हातात दिला. मात्र त्यांना अजित पवार आणि त्यांचा आवाज ओळखता आला नाही. तिकडून अजित पवार दोनदा सांगताना दिसले की डीसीएम अजित पवार बोल रहा हूं. ये कार्यवाही बंद करो...मेरा आदेश हैं.. त्यावर कृष्णा म्हणतात मेरे फौन पर काॅल करें..त्यावर पवार म्हणताहेत..की तुम पे अॅक्शन लूंगा.. इतनी डेरिंग है तुम्हारी..मेरा चेहरा तो पेहचानोगा ना..असे रागावून अजित पवार बोलले आणि अजित पवारांनी व्हिडीओ काॅल केला. त्यावर कृष्णा बांधावरच जाऊन बसून पवारांशी बोलताना दिसल्या...यात अजित पवार कार्यवाही थांबवण्याचे आदेश देत असल्याचे पहायला मिळत असून...माझा फोन आलाय...तहसीलदारांना सांगा असे पवार सांगताना दिसतात.
कोण आहेत आयपीएस अंजना कृष्णा? (Who is IPS Anjana Krishna?)
1. आयपीएस अंजना कृष्णा मूळच्या केरळच्या त्रिवेंद्रममधल्या2. 2023 मध्ये यूपीएससी 355 रँकने उत्तीर्ण, आयपीएस केडर3. सुरुवातीला होम केडर, त्रिवेंद्रममध्ये एसीपीची जबाबदारी4. मग महाराष्ट्रात सोलापूर ग्रामीण पोलिसात कार्यरत5. प्रोबेशन कालावधीत पंढरपूरमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी6. अतिशय कडक शिस्तीच्या अधिकारी अशी ओळख निर्माण 7. करमाळ्यात अवैध व्यवसायाविरोधात कारवाईचा धडाका8. दोन दिवसांपूर्वी अवैध मुरूम उपसा सुरू असताना माढा तालुक्यातील कुर्डू येथे कारवाई 9. याच कारवाईसंदर्भात अजित पवारांशी बोलताना ठाम भूमिका