पुणे: स्वारगेट एसटी डेपो बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला अखेर पोलिसांनी शुक्रवारी स्थानिकांच्या मदतीने अटक केली आहे. मध्यरात्री 1 ते दीड वाजण्याच्या सुमारास त्याला शेतातून अटक करण्यात आली आहे. पुण्यात शिवशाही बसमध्ये या नराधमाने एका तरुणीवर बलात्कार केला होता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या 13 टीम, ड्रोन, डॉग स्कॉड तयार करण्यात आले होते. अखेर मध्यरात्रीच्या सुमारास शेतातून त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी हे सर्व ऑपरेशन कशा पद्धतीने केलं, त्याबद्दल पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. त्याचबरोबर स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे यानी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर आली आहे. गुन्ह्याचा तपास करणाऱ्या पोलिसांची माहिती दिली आहे. स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र, दोरी तुटली त्यामुळे तो वाचला अशी माहिती समोर आली आहे. 

Continues below advertisement

दत्तात्रय गाडेने आत्महत्येचा प्रयत्न केला, पण दोरी तुटली त्यामुळे तो वाचला असल्याची माहिती दिली आहे. आरोपीची प्राथिमक आरोग्य तपासणी झाली. त्याच्या गळ्यावर मार्क आहे. त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जातं. दोरी तुटली आणि लोकांनी घटनास्थळी जाऊन त्याला वाचवल्याने त्याने आत्महत्या केली नसल्याचं बोललं जातंय, असं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेवेळी सांगितलं आहे. पोलीस आयुक्तांनी दिलेल्या या माहितीमुळे त्याने अटक होण्याआधी आत्महत्येचा प्रयत्न केला होता का? अशी चर्चा सुरु झाली आहे. तर त्याची आणि ज्या ठिकाणी अत्याचाराचा प्रयत्न झाला त्या ठिकाणी तपास केला जाणार असल्याची माहिती देखील आयुक्तांनी दिली आहे.

मानेवरती दोरखंडाचे व्रण 

आरोपी दत्तात्रय दत्तात्रय गाडेच्या मानेवरती दोरखंडाचे व्रण आढळून आले आहेत. पोलिसांनी अटक करण्याआधी त्याचा आत्महत्येचा प्रयत्न होता का? असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होत आहे. त्याच्या मानेवरती दोरखंडाचे व्रण आढळल्या असल्याच्या बातमीला देखील पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी देखील दुसरा दिला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेवेळी बोलताना सांगितलं, त्याचे पहिले मेडिकल चेकअप झालेले आहे. त्यामध्ये त्याच्या मानेवरती काही व्रण आढळून आले आहेत. त्यावरून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असे सांगतात. तर दोरी तुटल्यामुळे आणि तिथे लोक तातडीने पोहोचल्यामुळे तो वाचला अशा प्रकारची माहिती लोक सांगत आहेत. या गोष्टीची पडताळणी करण्यासाठी तिथे पोलिसांना जावं लागेल. ते पडताळणी केल्यानंतर कळेल परंतु आता एका मेडिकलमध्ये त्याच्या गळ्यावरती व्रण दिसून येत आहेत, असं अमितेश कुमार यांनी सांगितलं आहे.

Continues below advertisement

एक लाखाची मदत मिळणार का?

ज्यांनी आरोपीची महत्त्वाची माहिती दिली. ज्याच्या माहितीनंतर आरोपीपर्यंत पकडण्यात यश आलं, त्यांना एक लाखांचं बक्षीस देण्यात येणार आहे, त्याव्यतिरिक्त गावासाठी आम्ही काय करू शकतो ते देखील आम्ही करू असंही पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं आहे. गावातील ज्या व्यक्तीने दत्ता गाडेची माहिती दिली, त्या व्यक्तीला एक लाखांचे बक्षीस दिले जाईल.ज्या गुन्हेगारांवर या आधी विनयभंग, बलात्कार यासारखे गंभीर गुन्हे नोंद आहेत, त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल.आरोपी दत्तात्रय गाडेच्या मानेवर दोरखंडाचे व्रण आढळले आहेत. त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता का हे तपासावे लागेल, अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली आहे.