पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये प्लास्टिक पिशवी मागितली म्हणून ग्राहकाला बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. नेहरुनगर येथील ओव्हन बेकरीत हा प्रकार शुक्रवारच्या सकाळी घडला.
या मारहाणीत ग्राहक मनवेल दासच्या डोक्याला पाच टाके पडले आहेत.
बेकरीत खरेदी केलेल्या वस्तू घरी नेहण्यासाठी दासने प्लास्टिक पिशवी मागितली. मालक मोहम्मद नसरुद्दीन अन्सारी यांनी प्लास्टिक पिशवीवर बंदी असल्याचं सांगताच, दोघांमध्ये वाद सुरु झाले. वादाचे रूपांतर भांडणात झाले.
दासच्या डोक्यावर बांबूने प्रहार केला गेला. त्यामुळं पाच टाके टाकण्याची वेळ आली. मात्र दास नेहमीच पैसे न देता वस्तू नेहतो आणि पैसे मागितल्यास शिवीगाळ करतो. यावरून भांडण झालं असून, प्लास्टिक पिशवीचे दासने कारण पुढं केल्याचं अन्सारी यांचं म्हणणं आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये परस्परविरोधी तक्रारी दाखल आहेत.
प्लास्टिक पिशवी मागितल्याने ग्राहकाला बांबूने मारहाण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Jun 2018 08:14 PM (IST)
बेकरीत खरेदी केलेल्या वस्तू घरी नेहण्यासाठी दासने प्लास्टिक पिशवी मागितली. मालक मोहम्मद नसरुद्दीन अन्सारी यांनी प्लास्टिक पिशवीवर बंदी असल्याचं सांगताच, दोघांमध्ये वाद सुरु झाले. वादाचे रूपांतर भांडणात झाले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -