पुणे: पुण्यातील कोथरुड पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून मुलींसोबत (kothrud Police Station) गैरव्यवहार केला होता, त्यांना मारहाण केली आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप मुलींनी केला होता. त्यानंतर मोठी आंदोलनं उभी राहिली. पोलिस आयुक्तालयात मुली आणि त्यांच्यासोबत अनेक जणांनी पोलीस आयुक्तालयात जाऊन रात्रभर ठिय्या मांडला होता. मात्र त्यानंतर पुणे पोलिसांनीच (kothrud Police Station)  या मुलींवर सरकारी कार्यात अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल केला. त्यानंतर या मुली पेटून उठल्या आणि त्यांनी थेट पुणे सत्र न्यायालयात याचिका (Pune Court) दाखल केली होती, याप्रकरणी अखेर कोथरुडच्या 'त्या' मुलींच्या लढ्याला यश मिळालं आहे. कोर्टाकडून पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता संबंधित पोलीसांवर गुन्हा दाखल करुन या प्रकरणाचा तपास एक सीपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडून करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.(kothrud Police Station) 

Continues below advertisement

आठ पोलीस कर्मचाऱ्यांवर दरोडा आणि इतर गंभीर गुन्हे दाखल करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली होती. या याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत. पोलिसांनी आपली ओळख सांगितली नाही. त्यांनी मुलींची तपासणी करून त्यांचा आणि त्यांच्या मैत्रिणींचा जातीय आधारावर अपमान केला, असं कोर्टानं म्हटलं आहे. या आदेशानंतर पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यासाठी या मुली आणि त्यांना या लढ्यात साथ देणारे कोथरुड पोलीस ठाण्यात जाणार आहेत आणि तक्रार करणार आहे. २ ऑगस्टला एबीपी माझाने ही बातमी दाखवली होती. आता तीन महिन्यानंतर पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश आल्याने मुलींच्या लढ्याला यश आलं आहे. 

Pune News: नेमकं प्रकरण काय?

कोथरुडमधील तीन मुलींसोबत तपासादरम्यान पोलीसांकडून गैरवर्तन करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर संबंधित मुली आणि विविध संघटनांकडून पुणे पोलीस आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते. मात्र पोलीसांनी त्या तीन मुली आणि आंदोलन करणाऱ्यांवरच गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर संबंधित मुली आणि ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, अशा आंदोलनकर्त्यांनी पुणे सत्र न्यायालयात याचिका दाखल करुन पोलीसांवर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने सहा पोलीसांवर गुन्हे दाखल करण्याचा आणि या प्रकरणाचा तपास एक सीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून करण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाच्या विरोधात पुणे पोलीसांनी आपली बाजू ऐकून घेण्याची विनंती केली होती. मात्र पुणे पोलीसांची बाजू ऐकून घेतल्यानंतर देखील न्यायालयाने सहा पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेत. हे आदेश देताना पोलीसांनी अधिकारांचा गैरवापर केल्याचं न्यायालयाने म्हटलंय. न्यायालयाच्या निर्णयानंतर संबंधित मुली आणि ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत असे आंदोलनकर्ते कोथरुड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहेत.

Continues below advertisement