Pune Metro :   मागील काही दिवसांपासून कॉंग्रेसचे नेते, कार्यकर्ते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (chandrakant Patil) यांच्यात सारखी तू तू मै मै होताना दिसत आहे. कधी घोषणेवरुन तर कधी बॅनरवरुन त्यांच्यात तू तू मै मै पहायला मिळत आहे. त्यातच आता पुण्यातील काँग्रेस प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे यांनी चंद्रकांत पाटलांना दिलेल्या पत्राची सगळीकडे चांगलीच चर्चा सुरु आहे. दादा... पुणेकरांना वाचवा असं त्यांनी पत्र लिहिलं आहे. पुणेकरांना स्वतः च्या मालकीच्या घराच्या घरपट्टीमध्ये 40 टक्के सवलत मिळत होती. ही सवलत आता रद्द करण्यात आल्याच्या पुणेकरांना नोटीसा आल्या आहेत, त्यामुळे त्यांनी हे पत्र चंद्रकांत पाटलांना लिहिलं आहे.  


संजय बालगुडे यांनी पत्रात काय लिहिलंय?


पुण्यातील नागरिकांना 1970 सालापासून स्वतः च्या मालकीच्या घरात राहात असल्यास घरपट्टीमध्ये 40 टक्के सवलत मिळत होती. 2011 मध्ये महालेखा परिक्षकांनी याबाबत नोंदवला होता. पुणे महापालिकेच्या गेल्या 30 वर्षांपासून असलेल्या अनेक निर्णयांबाबतही आक्षेप नोंदवला होता. याचाच आधार घेऊन 2018 मध्ये तुमचे सरकार असताना व तत्कालीन मुख्यमंत्र्याच्याकडे नगर विकास खाते असताना एक अध्यादेश काढण्यात आला.


या अध्यादेशानुसार 1900 सालापासून पुणेकरांना मिळणारी घरपट्टीतील सवलत रद्द करण्यात आली आहे. केवळ सवलतच रद्द केली नाही तर 1300 सालापासून सन 2018 पर्यंत मिळालेली सवलत व्याजासहित पुणेकरांकडून वसूल करा असा स्पष्ट आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे आपण वारंवार आश्वासन देऊन ही आता पुणेकरांना नोटीस येऊ लागल्या आहेत. 40 टक्के सवलत पुणेकरांना मिळाली पाहिजे. चंद्रकांत दादा आपण पालकमंत्री असून आपण पुणेकरांना वाचवा," असं या पत्रात लिहिलं आहे.



पुणे महानगरपालिकेमध्ये आपली सत्ता असतांना वसूली व व्याज घेण्यावर स्थगिती दयावी असा ठराव करून सरकार कडे पाठविण्यात आला. याबाबत आपण पुन्हा मंत्री झाल्यावर आपल्याला याबाबत विचारले असता, या वसूलीलाच अध्यादेशाला स्थगिती देऊन पुणेकरांना दिलासा देऊ असे जाहीर सांगितले होते. पण अद्याप याबाबत शुध्दी पत्रक शासनाने पाठवलेले नाही असे मनपा आयुक्तांनी कळवले आहे. सध्या पुणेकर नागरिकांना सन 2018 पासून 40 टक्के सवलत रद्द धरून थकीत रक्कम व्याजासहित भरावी अशा नोटीसा व संदेश मोबाईलवर येत जाहेत. सामान्य पुणेकर हा घरपट्टीच्या ओझ्या खाली दबून गेला आहे. त्यामुळे आपण आत्ता लक्ष देऊन पुणेकरांना वाचवल पाहिजे," असंही यावेळी संजय बालगुडे यांनी म्हंटलं आहे.