एक्स्प्लोर

Hanumant Pawar Crime: काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवारांना मारहाण, पोलिसांनी तुषार दामगुडेची रिव्हॉल्व्हर जप्त केली अन् नोटीस देऊन घरी सोडलं

Hanumant Pawar Crime: तुषार दामगुडेजवळ असलेलं परवानाधारक शस्त्र पोलिसांनी जप्त केलं आहे. दामगुडे आणि इतरांना पोलिसांनी नोटीस देऊन सोडून दिल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे : काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे आणि त्यांच्या साथीदारांनी हल्ला केल्याची घटना काल (सोमवारी, ता २३) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मित्रमंडळ चौकाजवळ घडली. यावेळी पिस्तुलाचा धाक (Pune Crime News) दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप हनुमंत पवार यांनी दामगुडे यांच्यावर केला आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना मारहाण (Pune Crime News) केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. तर हिंदुत्ववादी कार्यकर्ता तुषार दामगुडेसह तिघांविरुद्ध गुन्हा (Pune Crime News) दाखल केला आहे. तर तुषार दामगुडेजवळ असलेलं परवानाधारक शस्त्र पोलिसांनी जप्त केलं आहे. दामगुडे आणि इतरांना पोलिसांनी नोटीस देऊन सोडून दिल्याची माहिती समोर आली आहे. (Pune Crime News)

हनुमंत पवार  यांनी याबाबत बोलताना म्हटलं की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आम्हाला मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र त्यांनी आपल्या मातृसंघटनेच्या संस्कारांना जागून गृहमंत्रिपदाच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष केल्याची खंत आहे. तरीदेखील आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आरोपींवर कठोर कारवाईची अपेक्षा ठेवत आहोत. पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेऊन नोटीस देत सोडून दिले, ही बाब गंभीर आहे. अशा प्रकरणांत कठोर शिक्षा व्हायला हवी. आमचा जीव गेल्यानंतर किंवा आमच्या कुटुंबियांवर संकट आल्यानंतरच पोलीस कारवाई करणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच तुषार दामगुडेला परवानाधारक पिस्तूल स्वतःच्या संरक्षणासाठी देण्यात आले आहे की इतरांना दमदाटी करण्यासाठी, याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

नेमकं काय घडलं?

हनुमंत पवार आणि तुषार दामगुडे एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमासाठी आलेले होते. कार्यक्रम संपल्यावर सुरुवातीला दामगुडे बाहेर पडले. त्यानंतर फोनवर बोलत पवारही बाहेर येत होते. मित्रमंडळ चौकाजवळ आधीच फुटपाथवर बाहेर थांबलेल्या दामगुडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पवार यांना आवाज देऊन बोलावलं आणि त्यांच्याशी वाद घालायला सुरूवात केली.(Pune Crime News)

सुरूवातीला सुरू असलेल्या वादावादीचे रूपांतर हाणामारीत झाले. दामगुडे आणि त्यांच्या साथीदारांनी पवार यांना मारहाण केली. अचानक घडलेल्या प्रकारामुळे पवार संतापले. आपला बचाव करण्यासाठी कार्यालयाच्या सुरक्षारक्षकांकडे धावले. दामगुडे पिस्तुलाने धमकावत असल्याचे ते मोठ्याने सांगत होते. मात्र दामगुडे हे त्यांच्या सहकाऱ्यासह दुचाकीवरून तत्काळ निघून गेले.(Pune Crime News)

तर या घटनेबाबत बोलताना काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार म्हणाले, दामगुडे यांनी माझ्यावर हल्ला (Pune Crime News) करण्यासाठी मित्रमंडळ चौकाजवळ आधीच कार्यकर्त्यांना बोलावून ठेवले होते. मी बाहेर आल्यावर त्यांनी मला पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावलं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याबाबतही त्यांनी अपशब्द वापरत शिवीगाळ केली. दामगुडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मला मारहाण केली.

या घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी अॅड. अभय छाजेड, प्रशांत जगताप आणि कार्यकर्ते स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गेले. पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते, पोलिस उपायुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहाय्यक पोलिस आयुक्त धन्यकुमार गोडसे, स्वारगेट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत निकम व त्यांचे कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News : पुण्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ! नामंकित कॉलेजच्या विभागप्रमुखाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण समोर
पुण्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ! नामंकित कॉलेजच्या विभागप्रमुखाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण समोर
Pune Crime: जुन्या वादातून पुण्यात गोळीबाराचा थरार! विदेशी बनावटीच्या पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह दोघांना अटक
जुन्या वादातून पुण्यात गोळीबाराचा थरार! विदेशी बनावटीच्या पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह दोघांना अटक
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
विनयभंग करणारा तरुण निघाला MPSC चा विद्यार्थी, 24 तासाच्या आतच शिवाजीनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
विनयभंग करणारा तरुण निघाला MPSC चा विद्यार्थी, 24 तासाच्या आतच शिवाजीनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India vs New Zealand, Final T20 World Cup: टीम इंडियाला गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी पणवती म्हणून कायम चर्चेत; आज फायनलसाठी नेमका कोणता बदल केला? धक्कादायक खुलासा!
टीम इंडियाला गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी पणवती म्हणून कायम चर्चेत; आज फायनलसाठी नेमका कोणता बदल केला? धक्कादायक खुलासा!
Crime News: मंदिराच्या बाथरूममध्ये जिवलग मैत्रिणींनी संपवलं आयुष्य; भूल देण्याचे इंजेक्शन अन् इंटरनेटवर शोधल्या जीवन संपवण्याच्या पद्धती, घटनेनं खळबळ
मंदिराच्या बाथरूममध्ये जिवलग मैत्रिणींनी संपवलं आयुष्य; भूल देण्याचे इंजेक्शन अन् इंटरनेटवर शोधल्या जीवन संपवण्याच्या पद्धती, घटनेनं खळबळ
Pune Crime News : पुण्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ! नामंकित कॉलेजच्या विभागप्रमुखाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण समोर
पुण्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ! नामंकित कॉलेजच्या विभागप्रमुखाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण समोर
इन्स्टा Live करताना 150च्या स्पीडने गाडी डिव्हाडरला धडकली; रस्त्यावर तडफडताना दिसला 'बिग बॉस'फेम अभिनेता, मॅनेजरनं सांगितली परिस्थिती
इन्स्टा Live करताना 150च्या स्पीडने गाडी डिव्हाडरला धडकली; रस्त्यावर तडफडताना दिसला 'बिग बॉस'फेम अभिनेता, मॅनेजरनं सांगितली परिस्थिती
India vs New Zealand, Final T20 World Cup: टीम इंडियाला न्यूझीलंडच्या 'फाईव्ह स्टार राॅकेट'चा अडथळा! एकाचं सर्वात जलद शतक, दुसऱ्याने 3 अर्धशतके ठोकली अन् उर्वरित दोघांनी..
टीम इंडियाला न्यूझीलंडच्या 'फाईव्ह स्टार राॅकेट'चा अडथळा! एकाचं सर्वात जलद शतक, दुसऱ्याने 3 अर्धशतके ठोकली अन् उर्वरित दोघांनी..
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Gas cylinder LPG: इराण-अमेरिका युद्धामुळे घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था
इराण-अमेरिका युद्धामुळे घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था
Dhurandhar 2: धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस
धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस
Embed widget