पुणे: इराण आणि इस्त्रायल अमेरिकेतील युद्धाच्या झळा आता भारतापर्यंत पोहोचू लागल्यात. इराण आणि इस्त्रायल-अमेरिकेतील युद्धामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम होऊ लागल्याने व्यवसायिक वापराच्या गॅस (Commercial gas Iran war) सिलेंडरचा पुरवठा कालपासून थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घरगुती वापराचा गॅस पुरवठा लोकांना व्यवस्थित होत राहावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यातील बीपीसीएलच्या शिक्रापूर इथल्या प्लांटमध्ये आणि चाकण मधील एचपीसीएलच्या प्लांटमध्ये व्यावसायिक वापराचे सिलेंडर देणं बंद करण्यात आलं आहे.(Commercial gas Iran war) डीलर्सनी व्यवसायिक वापराच्या सिलेंडर्ससाठी गाड्या पाठवू नयेत अशा सुचना त्यांना देण्यात आल्या आहेत. व्यवसायिक वापराचा सिलेंडर ५,१९,३५,४७ आणि ४२७ किलो अशा वेगवेगळ्या प्रमाणात उपलब्ध असतो. हॉटेल्स आणि इतर व्यवसायिक कारणांसाठी त्याचा वापर केला जातो.(Commercial gas Iran war)

व्यवसायिक वापराचा सिलेंडर कुठे वापरला जातो

- व्यवसायिक वापराचा सिलेंडर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समधे वापरला जातो. - इंडस्ट्रीयल युजसाठी देखील त्याचा उपयोग केला जातो. धातु वितळवणे, पावडर कोटींग करणे अशा वेगवेगळ्या कामांसाठी हा गॅस वापरला जातो. - त्याचबरोबर पाच आणि सात किलोच्या प्रमाणात देखील तो लोकांच्या सोयीसाठी उपलब्ध आहे. - व्यवसायिक वापराच्या सिलेंडरव सरकारकडून अनुदान दिले जात नाही त्यामुळे घरगुती सिलिंडरपेक्षा त्याची किंमत जास्त असते.

कमर्शियल सिलेंडरच्या नव्या ऑर्डर घेऊ नका. एचपीसीएल आणि बीपीसीएलच्या डीलर्सला अशा सूचना देण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर आणि चाकण प्लांट मधून या सूचना देण्यात आल्या आहेत. हॉटेल आणि उद्योग जगतातील सिलेंडरसाठी या महत्त्वाच्या सूचना आहेत. डीलर्सने सिलेंडरसाठी गाड्या पाठवू नयेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 5, 19, 47, 35, 427 किलो सिलेंडरच्या ऑर्डर आता रोखण्यात आल्या आहेत, याचा मोठा परिणाम उद्योग विश्वावर आणि हॉटेलवरती होऊ शकतो, कारण त्यासाठी लागणारे कमर्शियल सिलेंडर असतात. त्याच्या नव्या ऑर्डर घेऊ नका किंवा त्यासाठी गाड्या पाठवू नका अशा सूचना आता देण्यात आल्या आहेत, अशा प्रकारचे सिलेंडर देणारे त्या प्लांटमधून या सूचना देण्यात आल्या आहेत, त्यामुळे आता याचा मोठा परिणाम पुढच्या काही काळामध्ये होणार आहे, आखाती देशामध्ये सुरू असलेले युद्धाचा परिणाम आता भारतात देखील जाणवू लागला आहे, याचा परिणाम किती दिवस राहतो हे पण महत्त्वाचा ठरणार आहे, आता जो काही स्टॉक आहे तोच हॉटेल व्यवसायिकांना आणि उद्योग जगताला वितरित केला जाईल, त्यानंतर आता नव्या ऑर्डर्स पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत पुण्यातील चाकण आणि शिक्रापूर परिसरात सुरू असलेल्या प्लांट मधून या सूचना देण्यात आले आहेत, पुढच्या ऑर्डर देऊ नयेत आणि गाडीही पाठवू नयेत अशा सूचना प्लांट काढून देण्यात आल्या आहेत.