एक्स्प्लोर

Ketan Agarwal Death Case : सियाचा प्रियकर चेतन दुसऱ्याच मुलीच्या होता मागे; लातूरच्या तरुणीनं चेतनची कुंडलीच काढली बाहेर, नशेत रूम बुक केली, नंतर नको 'त्या' गोष्टीसाठी दबाव अन्...

Ketan Agarwal Death Case : केतनच्या हत्येच्या एक वर्ष आधी चेतन दुसऱ्या तरुणीच्या मागे लागला होता; पोलिसांच्या तपासात मोठा खुलासा.

पुणे: केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांच्या हाती अत्यंत महत्त्वाची माहिती लागली आहे. या प्रकरणातील आरोपी चेतन चौधरी याने हत्येच्या सुमारे एक वर्ष आधी पुण्यातील एका दुसऱ्या तरुणीशी संबंध वाढवण्याचा आणि तिचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात समोर आली आहे. यासोबतच, चेतन चौधरी आणि सिया गोयल पुण्यातील दोन वेगवेगळ्या हॉटेलमध्ये एकत्र राहिल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.

Ketan Agarwal Death Case : कॉलेजच्या विद्यार्थिनीशी संबंध वाढवण्याचा प्रयत्न

पोलीस तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, ९ मे २०२६ रोजी चेतन चौधरी याने पुण्यातील एका कॉलेजच्या विद्यार्थिनीशी जबरदस्तीने संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. ही तरुणी मूळची लातूरची असून ती त्या वेळी आपल्या मैत्रिणीसोबत पुण्यात राहत होती. पोलिसांनी या दोन्ही तरुणींचे जबाब नोंदवून घेतले आहेत.

तरुणीने दिलेल्या जबाबामध्ये नमूद केले आहे की, ती, तिची मैत्रीण, मैत्रिणीचा बॉयफ्रेंड आणि चेतन चौधरी असे चौघे एस. बी. रोडवरील (सेनापती बापट रोड) एका क्लबमध्ये पार्टीसाठी गेले होते. तिथे दारू पिल्यानंतर, उशिरा रात्री हे चौघे मार्केट यार्ड परिसरातील एका लॉजवर गेले.

जबाबानुसार, मैत्रिणीचा बॉयफ्रेंड आणि ती मैत्रीण एका खोलीत गेले, तर ही तरुणी आणि चेतन दुसऱ्या खोलीत गेले. तिथे चेतनने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी या तरुणीने ही संपूर्ण घटना आपल्या मैत्रिणीला सांगितली. त्या मैत्रिणीनेही पोलिसांना दिलेल्या जबाबादरम्यान स्पष्ट केले की, चेतनने त्या तरुणीसोबत २ ते ३ वेळा संबंध वाढवण्याचा प्रयत्न केला होता.

Ketan Agarwal Death Case : चेतन आणि सिया पुण्यातील २ हॉटेल्समध्ये एकत्र

तपासादरम्यान चेतन आणि सिया गोयल यांच्यातील संबंधांबाबतही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. लग्न ठरण्याआधी हे दोघे पुण्यातील दोन वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये रात्रीच्या मुक्कामासाठी थांबले होते. पोलिसांनी दोन्ही हॉटेल्सचे मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले असून, मुक्कामादरम्यान त्यांनी सादर केलेल्या ओळखपत्रांच्या (आयडी प्रूफ) प्रती जप्त केल्या आहेत.

नोव्हेंबर २०२५ मध्ये चेतनने एनआयबीएम (NIBM) रोडवरील एका हॉटेलमध्ये रूम बुक केली होती. त्यांना खोली क्रमांक ३०४ देण्यात आली होती. हॉटेलच्या असिस्टंट फायनान्स मॅनेजरने पोलिसांना सांगितले की, चेतनने स्वतःचे ओळखपत्र आणि सियाचे लर्निंग लायसन्स (ओळख पुरावा म्हणून) जमा केले होते. दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजताच्या सुमारास दोघांनी चेक-आऊट केले. पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून दोन्ही ओळखपत्रांच्या प्रती ताब्यात घेतल्या आहेत. यानंतर जानेवारी २०२६ मध्ये चेतन आणि सिया गुलटेकडी परिसरातील दुसऱ्या एका हॉटेलमध्ये राहण्यासाठी गेले होते. त्या हॉटेलच्या मॅनेजरचा जबाबही पोलिसांनी नोंदवला आहे.

Ketan Agarwal Death Case : 'डिलीट केलेले चॅट्स परत मिळवता येतात का?' चेतनची मित्राकडे विचारणा

या प्रकरणात पोलिसांनी चेतनच्या एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या मित्राचाही जबाब नोंदवला आहे. जबाबातील माहितीनुसार, २२ जून रोजी चेतनने आपल्या या मित्राशी संपर्क साधला होता. लोणावळ्यातील एका घटनेचा उल्लेख करत चेतन म्हणाला की, मित्राच्या गाडीने एका दुसऱ्या गाडीला धडक दिली होती आणि त्यानंतर ते तिथून निघून आले होते. त्यानंतर त्या गाडीच्या नंबरवरून आणि मोबाईल नंबरवरून व्हॉट्सॲप (WhatsApp) व इन्स्टाग्रामवर (Instagram) आपल्याला त्रास दिला जात आहे, असे चेतनने मित्राला सांगितले. पुढे त्याने मित्राला विचारले की, 'पोलीस व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्रामचे डिलीट केलेले चॅट्स परत मिळवू (रिकव्हर करू) शकतात का?' इतकेच नाही तर क्राईम ब्रँच (गुन्हे शाखा) किंवा कोणत्याही मोबाईल कंपनीत मदत करू शकेल असा कोणी ओळखीचा व्यक्ती आहे का, अशी विचारणाही चेतनने केल्याचे मित्राने पोलिसांना सांगितले.

त्याचबरोबर, आपल्याकडे असा कोणताही संपर्क नसल्याचे सांगत तपासादरम्यान पोलीस डिलीट झालेला डेटा रिकव्हर करू शकतात, अशी कल्पना मित्राने चेतनला दिली. त्या रात्री दोघांनी भेटण्याचे ठरवले होते; पण कामाच्या गडबडीमुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी चेतन आणि सियाला पोलिसांनी अटक केल्याची बातमी मित्राला समजली. या संपूर्ण प्रकरणात पोलीस सध्या सर्व बाजूने अधिक तपास करत आहेत.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
मावळात भाजपचे तीन गट, मुख्यमंत्र्यांसोबत फोटो काढायचा आणि काही नाही मिळालं की आंदोलन करायचं, राष्ट्रवादीच्या आमदाराने उडवली खिल्ली
मावळात भाजपचे तीन गट, मुख्यमंत्र्यांसोबत फोटो काढायचा आणि काही नाही मिळालं की आंदोलन करायचं, राष्ट्रवादीच्या आमदाराने उडवली खिल्ली
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त

Embed widget