एक्स्प्लोर

Vaishnavi Hagawane death: वैष्णवीचे व्हाट्सअप चॅट तपासा; 'त्या' मुलाचा 18 तारखेला साखरपुडा, म्हणूनच...; आत्महत्येबाबत हगवणेच्या वकिलाचा कोर्टात दावा

Vaishnavi Hagawane death: हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी वैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणामध्ये युक्तिवाद करताना वैष्णवीच्या चारित्र्यावरच बोट ठेवलं. वैष्णवीची प्रवृत्तीच आत्महत्या करण्याची होती, असा दावा हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी केला आहे.

पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या (Vaishnavi Hagawane death) प्रकरणातील आरोपींना काल (बुधवारी) पुण्यातील कोर्टामध्ये हजर करण्यात आलं. सरकारी युक्तीवाद आणि आरोपींच्या वकिलांच्या युक्तीवादानंतर वैष्णवीचा नवरा शशांक हगवणे, नणंद करिश्मा हगवणे आणि सासू लता हगवणे यांना एका दिवसाची कोठडी सुनावली आहे. तर राजेंद्र हगवणे, सुशील हगवणे या बाप लेकांना 31 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अमानुषपणे मारहाण करणाऱ्या, छळ करणाऱ्या हगवणे परिवाराच्या बचावासाठी कोर्टात त्यांच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे देखील उडवले. वैष्णवी नको त्या व्यक्तीसोबत चॅट करायची तिचे चॅट पकडले असा संतापजनक दावा हगवणेच्या वकिलांनी केला आहे. हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी वैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणामध्ये युक्तिवाद करताना वैष्णवीच्या (Vaishnavi Hagawane death) चारित्र्यावरच बोट ठेवलं. वैष्णवीची प्रवृत्तीच आत्महत्या करण्याची होती, असा दावा हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी केला आहे.

18 तारखेला त्या मुलाचा साखरपुडा म्हणून.., वकिलांचा युक्तीवाद काय?

वैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणी हगवणेंचा बचाव करणाऱ्या वकीलांनी कोर्टात युक्तिवाद करताना म्हटलं की, वैष्णवी नको त्या व्यक्तीसोबत चॅट करायची तिचे हे चॅट हगवणेंनी पकडले होते. त्या व्यक्तीने नकार दिल्यानेच वैष्णवीने आत्महत्या केली आहे. 18 तारखेला त्या मुलाचा साखरपुडा झाला, त्यामुळे ती कॉल करत होती. तपास अधिकाऱ्याला त्या व्यक्तीचे नाव दिले आहे, असा दावा देखील वकिलांनी न्यायालयात केला आहे. 

वैष्णवीची प्रवृत्ती सुसाईड करण्याचीच होती. ती मुलगी वेगळी होती. तिनं अनेकदा आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला होता. एकदा रॅट पॉईझन (उंदीर मारण्याचं औषध) खाऊन आणि एकदा गाडीतून उडी मारून तिने जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता. ज्या माणसासोबत ती चॅट करत होती त्याने तिला नकार दिला असेल म्हणून ती नैराश्यात असेल म्हणून तिने आत्महत्या केली आहे. नवरा तिला घरी का पाठवत होता, ते शोधा, त्यासाठी तिचे चॅट तपासा, असंही वकिलांनी म्हटलं आहे.

सोने गहाण ठेवण्यास वैष्णवी यांनी विरोध केला नव्हता

व्यवसायासाठी पैशांची आवश्यकता असल्याने हगवणे कुटुंबातील सर्वांचे सोने गहाण ठेवण्यात आले होते. हे सोने गहाण ठेवण्यास वैष्णवी यांनी विरोध केला नव्हता. त्याबाबतचा काही उल्लेख देखील या प्रकरणात दाखल असलेल्या फिर्यादीत नाही. वैष्णवी यांनी एका तरुणाशी केलेले चॅटिंग पती शशांक यांना मिळालं होतं. त्यावरून दोघांत वाद झाला होता. ही बाब हगवणे यांनी वैष्णवी यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात आणून दिली होती. त्यानंतर कस्पटे कुटुंबीयांनी वैष्णवी यांचा मोबाईल काढून घेतला होता, असा युक्तिवाद अॅड. दुशिंग यांनी न्यायालयात केला आहे.

वैष्णवीवर आरोप

वैष्णवी यांचे ज्या तरुणाशी चॅटिंग सुरू होते, त्या तरुणाने त्यांना नकार दिल्याने त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले आहे का? त्या नकाराचा वैष्णवी यांच्यावर काही परिमाण झाला होता का? तो तरुण कोण आहे? याचा पोलिसांनी तपास करावा. वैष्णवी यांनी आत्महत्या केल्यानंतर दोन दिवसांनी त्या तरुणाचा साखरपुडा झाला आहे. या प्रकरणात पोलिस एकाच दिशेने तपास करत आहेत. हगवणे कुटुंबाचे देखील या प्रकरणात मोठे नुकसान झाले आहे, असे अॅड.. दुशिंग यांनी कोर्टात म्हटलं आहे.

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

आरजू बिष्णोई टोळीच्या शूटर्सना हरिद्वारमध्ये बेड्या, पिंपरी चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई
आरजू बिष्णोई टोळीच्या शूटर्सना हरिद्वारमध्ये बेड्या, पिंपरी चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई
डिव्हायडरचा पत्रा थेट गाडीत घुसला, पुणे मुंबई एक्सप्रेसवे वर भीषण अपघात, दोघांचा जागीचं मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी
डिव्हायडरचा पत्रा थेट गाडीत घुसला, पुणे मुंबई एक्सप्रेसवे वर भीषण अपघात, दोघांचा जागीचं मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी
Pune Crime Ravi Landge: पिंपरीचे महापौर रवी लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी, थेट सीपी ऑफिसमध्ये फोन, महापौर म्हणाले, 'आधी दोन वेळा भेटलेला; पुस्तकही भेट दिलं...'
पिंपरीचे महापौर रवी लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी, थेट सीपी ऑफिसमध्ये फोन, महापौर म्हणाले, 'आधी दोन वेळा भेटलेला; पुस्तकही भेट दिलं...'
NEET Paper Leak : ब्यूटी पार्लर ते नीट पेपरफुटी...वाघमारे आणि मांढरेने विद्यार्थ्यांना दिलेली ती ट्रिक, निवासस्थानी काय काय घडायचं?
ब्यूटी पार्लर ते नीट पेपरफुटी...वाघमारे आणि मांढरेने विद्यार्थ्यांना दिलेली ती ट्रिक, निवासस्थानी काय काय घडायचं?

व्हिडीओ

Maharashtra on Petrol Diesel : देशात पुरेसा इंधनसाठा, मग इंधनटंचाई का? Special Report
Rohit Pawar Special Report : पवारांच्या बैठकीत रोहित पवारांची दांडी? राजकीय चर्चांना उधाण
NCP Merger Sharad Pawar Sunetra Pawar : पडदा विलिनीकरणावर लक्ष 'पवार 'नीतीवर Special Report
Rahul Gandhi Sharad Pawar on PM Modi काँग्रेसचे बोल कडवे,पवारांनी गायले गोडवे Special Report
PM Modi meets Italian PM Meloni : मोदी,मेलोनी आणि मेलोडी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Re-Exam : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची उच्चस्तरीय सुरक्षा बैठक; फेक टेलिग्राम चॅनेल्सवर कारवाईचे आदेश
NEET : फेक टेलिग्राम चॅनेल्सवर होणार मोठी कारवाई, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे कडक निर्देश
छत्रपती संभाजीनगर हादरलं! पाच वर्षीय गतिमंद मुलाला सावत्र बापाने संपवलं, आईचाही गुन्ह्यात सहभाग
छत्रपती संभाजीनगर हादरलं! पाच वर्षीय गतिमंद मुलाला सावत्र बापाने संपवलं, आईचाही गुन्ह्यात सहभाग
Giorgia Meloni : 'परिश्रम ही सफलता की कुंजी'; मोदींसमोर हिंदीत बोलल्या जॉर्जिया मेलोनी, व्हिडीओ व्हायरल
'परिश्रम ही सफलता की कुंजी'; मोदींसमोर हिंदीत बोलल्या जॉर्जिया मेलोनी, व्हिडीओ व्हायरल
Ladki Bahin Yojana : मार्च एप्रिलच्या हप्त्याच्या 3000 रुपयांची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, महत्त्वाचा शासन निर्णय जारी
मार्च एप्रिलच्या हप्त्याच्या 3000 रुपयांची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, महत्त्वाचा शासन निर्णय जारी
EPFO : 7 कोटी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, यूपीआयद्वारे पीएफचे पैसे काढण्याची चाचणी यशस्वी, मनसुख मांडवीय यांच्याकडून मोठी अपडेट 
यूपीआयद्वारे पीएफचे पैसे काढण्याची चाचणी यशस्वी, मनसुख मांडवीय यांच्याकडून मोठी अपडेट 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 मे 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 मे 2026 | बुधवार
बाॅयफ्रेंडसोबत राहायचं म्हणून गर्लफ्रेंडनं 1.66 कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, तीन दिवस लपले; चौथ्या दिवशी गर्लफ्रेंड हॉटेलमध्ये अंघोळीला जाताच तोच गुजराती बाॅयफ्रेंड चोरलेल्या दागिन्यांसह फरार
बाॅयफ्रेंडसोबत राहायचं म्हणून गर्लफ्रेंडनं 1.66 कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, तीन दिवस लपले; चौथ्या दिवशी गर्लफ्रेंड हॉटेलमध्ये अंघोळीला जाताच तोच गुजराती बाॅयफ्रेंड चोरलेल्या दागिन्यांसह फरार
BAN vs PAK : बांगलादेशकडून कसोटी मालिकेत पाकिस्तानला व्हाईट वॉश, पाकिस्तानचा पराभव आणि भारताला WTC मध्ये मोठा धक्का
बांगलादेशसमोर पाकिस्तानचा दोन्ही कसोटीत पराभव, इकडे टीम इंडियाला मोठा धक्का, काय घडलं?
Embed widget