पुणे : पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूटच्या कार्यालयावर सीबीआयनं छापेमारी सुरू केली आहे. सीबीआयनं आज सिंहगड रस्ता, हडपसर, पुणे-मुंबई रस्ता या ठिकाणी असलेल्या कार्यालयावर छापे मारले. या कारवाईदरम्यान महत्त्वाची कागदपत्रं सीबीआयच्या हाती लागल्याची माहिती मिळत आहे.
सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारूती नवले यांनी सेंट्रल बँकेकडून घेतलेले 75 कोटी बेकायदेशीरित्या दुसरीकडे वर्ग केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सीबीआयनं गुन्हा दाखल केला असून नवले यांच्या घराचीही झडती घेण्यात येणार आहे.
तसंच नवले यांच्या बँक खात्यांची आणि लॉकर्सचीही तपासणी करण्यात येणार असल्याचं समजतं आहे.