पुणे : पुणे येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गुवाहाटीला (Pune Crime News) जाणाऱ्या विमानातील प्रसाधनगृहात शुक्रवारी बॉम्ब असे लिहिलेले चिठ्ठी सापडली. प्रवाशांना घेऊन विमान झेपवण्यासाठी सज्ज होत असतानाच एअर होस्टेसला चिठ्ठी सापडल्यानंतर खळबळ उडाली. त्यानंतर विमान तातडीने (Pune Crime News) निर्मनुष्य ठिकाणी नेऊन प्रवाशांना सुखरूप उतरवण्यात आले त्यानंतर तपासणी केली. ही चिठ्ठी लिहिणाऱ्या अनोळखी व्यक्ती विरोधात विमानतळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pune Crime News)

Continues below advertisement

Pune Crime News : एक चिठ्ठी सापडली या चिट्टीवर ठळक अक्षरात बॉम्ब लिहिलेलं

हा प्रकार शुक्रवारी सकाळी पावणे सातच्या सुमारास पुणे गुवाहाटी (Pune Crime News) विमानात निदर्शनास आला. संबंधित कंपनीचे विमान सकाळी सातच्या सुमारास आंतरराष्ट्रीय तळावरून गुहाटीला जाणार होते. विमानात प्रवासी बसलेले असताना एअर होस्टेस महिलेने विमानातील प्रसाधनगृहाची पाहणी केली असता तिला एक चिठ्ठी सापडली या चिट्टीवर ठळक अक्षरात बॉम्ब असं लिहिले होते. सुरक्षा यंत्रणांनी तपास केला असता कोणतीही बॉम्ब सदृश्य वस्तू अथवा स्फोटक पदार्थ सापडला नाही. सर्व तपासणी झाल्यानंतर विमान गुवाहाटी दिशेने निघाले. अधिक तपास विमानतळ पोलीस करत आहेत. (Pune Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगो विमान कंपनीचे सहायक सुरक्षा प्रमुख विशालकुमार श्रीवास्तव (वय ३०, रा. लोहगाव) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. इंडिगो कंपनीचे पुणे ते गुवाहाटी हे विमान २९ मे रोजी सकाळी ७ वाजता आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेणार होते. प्रवासी विमानातील एअरहोस्टेसला लेव्हीटरीमध्ये पांढऱ्या रंगाच्या पेपरच्या तुकड्यावर 'बॉम्ब' असे लिहिलेली चिठ्ठी सापडली. (Pune Crime News)

Continues below advertisement

Pune Crime News : विमानाच्या तपासाच आक्षेपार्ह वस्तू आढळली नाही

विमानाची बीडीडीएस पथक, एअर लाईन इंजिनिअरिंग पथक, एअर लाईन्स सिक्युरिटी पथकाकडून तपासणी झाली. विमानात कोठेही आक्षेपार्ह वस्तू (Pune Crime News) आढळून आली नाही. विमानातील लेव्हीटरीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने ती चिठ्ठी कोणी लिहिली हे समजले नाही. कागदाच्या तुकड्यावर बॉम्ब असा धमकीचा संदेश लिहून प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आणून भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. एअरहोस्टेसने ही चिठ्ठी लीड केबीन क्रू यांच्या ताब्यात दिली. पहाटे ६ वाजून ४४ मिनिटांनी याची माहिती सुरक्षा विभागाला दिल्यानंतर प्रवाशांना खाली उतरविण्यात आले. तसेच कंपनीच्या अभियंत्यांनी विमान आयसोलेशनला नेले. तपासणी झाल्यानंतर मात्र सर्वांनी सुटकेचा निश्वास घेतला. (Pune Crime News)