पुणे: बिग बॉस मराठी सीझन 5च्या विनर ट्रॉफीवर सूरज चव्हाणने आपलं नाव कोरलं आहे. या संपूर्ण सीजनबद्दल मराठी चाहत्यांमध्ये ग्रामीण भागातून आलेल्या सूरज चव्हाणची क्रेझ निर्माण झाली होती. पहिल्या आठवड्यापासूनच घरातील त्याचं वागणं, बोलणं या सगळ्याचच घरातील आणि घराबाहेरही चर्चा होत होती. अगदी शांतपणे सूरज त्याचा खेळ साऱ्यांच्याच पसंतीस पडला. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनच्या ट्रॉफीवर सूरजने नावं कोरलं आहे. बिग बॉसच्या निर्मात्यांकडून त्याला 14 लाख रूपये बक्षिस म्हणून मिळाले आहेत. विजयी झालेल्या सूरजवर कौतुकाचा वर्षाव होत आहे, जिंकल्यानंतर त्याने आज अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच सुरज चव्हाणने दर्शन घेतले.


सुरज चव्हाण जेजुरीच्या खंडेरायाच्या चरणी


अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच सुरज चव्हाणने दर्शन घेतलं. बिग बॉसची ट्रॉफी घेतल्यानंतर सूरज चव्हाण जेजुरीला पोहोचला आणि त्याने खंडोबाचे दर्शन घेतलं. खरंतर अनेकदा बिग बॉसमध्ये असताना सुरज चव्हाण जेजुरीच्या खंडेरायाचा उल्लेख केला होता. त्यानंतर प्रत्यक्षात ट्रॉफी जिंकल्यानंतर सुरत चव्हाण थेट जेजुरीत पोहोचला. यावेळी त्याने पूजा करून खंडेरायाच्या चरणी भंडारा उधळला. 




अजितदादांनी दिला भेटीचा प्रस्ताव, सूरज म्हणाला...


उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आताच मी सुरज चव्हाणशी फोनवरून बोललो. त्याला मी सांगितलं की, मी आज बारामतीत आहे, आपण भेटूया तो म्हणाला, मी प्रयत्न करतो..." 


सूरजनं ट्रॉफी जिंकल्यावर अजितदादांनी केलेली खास पोस्ट 


अजित पवार यांनी आधीचं ट्विटर म्हणजेच, एक्स मीडियावर पोस्ट केली होती. त्यांनी लिहिलेलं की, "आमच्या बारामतीचा सुपुत्र सुरज चव्हाण बिग बॉस मराठीचा विजेता ठरला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत सूरजनं हे यशाचं सर्वोच्च शिखर गाठलं आहे. सूरज आपल्या मेहनतीच्या आणि प्रतिभेच्या जोरावर महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. त्याच्या यशामुळे बारामतीचाच नव्हे तर, संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान वाढला आहे. सूरजला उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!"


रील्सस्टार ते बिगबॉस विजेता, सूरज चव्हाणचा प्रवास


बुक्कीत टेंगूळ देऊन बारामतीचा सूरज चव्हाण विजेता ठरला. गायक असलेला अभिजीत सावंत दुसऱ्या क्रमांकावर राहिला. ज्याला गेम कळत नाही अशी टीका होत असलेल्या सूरज चव्हाणने त्याची पॉवर दाखवली आणि बिग बॉस जिंकत बक्कळ कमाई केली. सूरज चव्हाणवर आता बक्षीसांचा वर्षाव झाला असून एका क्षणात तो लखपती झाला. इतकंच नव्हे तर दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सूरज चव्हाणला घेऊन एक चित्रपट करणार असल्याची घोषणाही केली. 


बारामतीमधील सूरज चव्हाण हा बिग बॉस मध्ये येण्यास उत्सुक नव्हता, पण बिग बॉसच्या टीमने शेवटी त्याला घरामध्ये आणले. त्यानंतरही सूरज चव्हाण अडखळताना दिसला. सूरज चव्हाणला गेम समजत नाही अशी टीकाही त्याच्यावर होत होती. पण महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी भरभरून दिलेल्या पाठिंब्यावर सूरज चव्हाणने अखेर बिग बॉसच्या पाचव्या सीजनच्या ट्रॉफीवर नाव कोरलं.