एक्स्प्लोर

Sharad Pawar: शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; डॉक्टरांकडून महत्त्वाची माहिती, म्हणाले...

Sharad Pawar: शरद पवारांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना पुण्यातील रूबी रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आलं आहे. आज शरद पवार यांना खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने पुण्यातील रुबी क्लिनिकमध्ये तपासणीसाठी आणि उपचारांसाठी नेण्यात आलं आहे. आज सकाळी आधी डॉक्टरांचं एक पथक त्यांच्या बारामतीतील गोविंद बाग या निवासस्थानी तपासणीसाठी गेले होते, त्यानंतर त्यांना पुण्यातील रूग्णालयात आणण्यात आलं आहे. (Sharad Pawar) त्यांची प्रकृती स्थिर असल्याची  माहिती समोर आली आहे. शरद पवारांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे.

रोहित पवारांनी केलं कार्यकर्त्यांना आवाहन

मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो रुग्णालयात तुम्ही येऊ नका. त्यांची प्रकृती स्थिर आहे. काळजी करण्याचे कारण नाही. तुम्ही इकडे येऊ नका. त्यांना थोड्याश्या प्रमाणात कफ आहे. थोडे दिवस इथं ठेवलं जाईल. ते आय सी यू मध्ये नाहीत तर खाजगी रूममध्ये दाखल आहेत, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली आहे. पवार साहेबांच्या तब्येतीबद्दल आम्ही सर्वजण रुबी हॉल या हॉस्पिटलमध्ये आलो आहोत आणि तेथील डॉक्टर अभिजीत लोढा आपल्या सर्वांना शरद पवार यांच्या प्रकृती बद्दल माहिती सांगतील. 

शरद पवार यांचा फिजिकल एक्झर्शन झाल्यामुळे छातीत कफ झालेला आहे,आम्ही योग्य त्या तपासण्या केलेल्या आहेत आणि ट्रीटमेंट चालू आहे, आता त्यांची प्रकृती स्थिर आहे, तपासण्यांच्या डिटेल्स रिपोर्ट आल्यानंतर आम्हाला उपचारात काय बदल करायचा असेल ते बदल करू, रिपोर्ट आल्याशिवाय आम्ही आणखी काही माहिती सांगू शकत नाही, आता सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे, तपासणीचे रिपोर्ट झाल्यानंतर कोणती ट्रीटमेंट करायची किंवा काय बदल करायचा ते ठरवू, त्यांना कफ झाला आहे, बाकी सगळं स्थिर आहे काळजी करण्यासारखं काहीही नाही, पवार साहेब आता रूममध्ये आहेत, आयसीयू मध्ये नाहीत. आम्ही योग्य तपासण्या केल्या आहेत. सध्या प्रकृती स्थिर आहे. आता काळजी करण्यासारखं काही नाही.सध्या पवारसाहेब खाजगी रूममध्ये आहेत. त्यांना दोन तीन दिवसांपासून त्रास होता. ते नॉर्मल बोलत आहेत, अशी माहिती देखील डॉक्टर  अभिजीत लोढा यांनी दिली आहे. 

सुप्रिया सुळे यांचा डॉक्टरांशी झालेला संवाद समोर 

डॉक्टर तुम्ही म्हणाल तसं आम्ही सगळं करू, तुमचं सजेशन अंतिम राहील. दहा मिनिटात डॉक्टर सगळ्या माध्यमांना शरद पवार यांच्या प्रकृतीची माहिती देतील. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि हॉस्पिटलच्या नियमानुसार सगळे उपचार पार पडतील. कोणत्याही विजिटर्सला सोडू नका, तुमच्या हॉस्पिटलचे सगळे नियम पाळा. खासदार सुप्रिया सुळे यांचा शरद पवार यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांशी झालेला संवाद समोर आला आहे.

शरद पवार यांना पाच दिवस दिले जाणार अँटिबायोटिक्स, सुप्रिया सुळे यांची माहिती 

शरद पवार यांना छातीत कंजेशन झाल्याची सुप्रिया सुळे यांची माहिती, शरद पवार यांना पाच दिवस अँटिबायोटिक्स दिले जाणार आहेत, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. शरद पवारांची प्रकृती उत्तम असल्याचं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं. सुप्रिया सुळे यांनी डॉक्टर यांचे आभार मानले 

शिवानी पांढरे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: पुण्यात प्रेमप्रकरणाचा भयंकर अंत; प्रेयसीच्या कुटुंबीयांनी प्रियकराला संपवलं; आईला व्हिडिओ कॉलवर दिली धमकी, एफआयआरमधून धक्कादायक माहिती समोर
पुण्यात प्रेमप्रकरणाचा भयंकर अंत; प्रेयसीच्या कुटुंबीयांनी प्रियकराला संपवलं; आईला व्हिडिओ कॉलवर दिली धमकी, एफआयआरमधून धक्कादायक माहिती समोर
Bhimashankar Temple Nishikant Dubey: महाराष्ट्रातील भाविकांना महाशिवरात्रीलाही शंकराचं दर्शन घेऊ दिलं नाही पण युपीच्या खासदारासाठी नियम डावलून भीमाशंकर मंदिराचे दरवाजे उघडले, भाविकांमध्ये संतप्त भावना
महाराष्ट्रातील भाविकांना महाशिवरात्रीलाही शंकराचं दर्शन घेऊ दिलं नाही, पण युपीच्या खासदारासाठी नियम डावलून भीमाशंकर मंदिराचे दरवाजे उघडले; भाविकांमध्ये संतप्त भावना
Murlidhar Mohol Pune: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ रुग्णालयात; 29 वर्षांपूर्वीच्या दुखापतीमुळे ऑपरेशनची वेळ, पैलवान खासदाराला महिनाभर सक्तीची विश्रांती
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ रुग्णालयात; 29 वर्षांपूर्वीच्या दुखापतीमुळे ऑपरेशनची वेळ, पैलवान खासदाराला महिनाभर सक्तीची विश्रांती
मोठी बातमी : LPG गॅसला पर्याय सापडला, पुण्यातील शास्त्रज्ञांचा दावा, 20 वर्षांच्या संशोधनाला यश!
LPG गॅसला पर्याय सापडला, पुण्यातील शास्त्रज्ञांचा दावा, 20 वर्षांच्या संशोधनाला यश!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
Kuldeep yadav Marriage : कुलदीप यादवच्या लग्नाची धूम, मैत्रीण वंशिकाबरोबर लग्नगाठ बांधली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dubai Live News: अब्जाधीश, गर्भश्रीमतांच्या दुबई इराणी चटक्यांनी होरपळून निघाली अन् आता हजारो किमी अंतरावर असलेल्या लंडनला अचानक सुगीचे दिवस! नेमकं काय घडतंय?
अब्जाधीश, गर्भश्रीमतांच्या दुबई इराणी चटक्यांनी होरपळून निघाली अन् आता हजारो किमी अंतरावर असलेल्या लंडनला अचानक सुगीचे दिवस! नेमकं काय घडतंय?
Gold Silver Price Today: आज सोने-चांदी स्वस्त की महाग? खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या दर
आज सोने-चांदी स्वस्त की महाग? खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या दर
मोदींनी देशाची बदनामी थांबवावी, संघर्ष थांबवण्याची क्षमता जर असती, तर इराण आणि इस्रायलमध्ये हजारो निष्पाप लोकांचे प्राण गेले नसते; संजय राऊतांचा प्रहार
मोदींनी देशाची बदनामी थांबवावी, संघर्ष थांबवण्याची क्षमता जर असती, तर इराण आणि इस्रायलमध्ये हजारो निष्पाप लोकांचे प्राण गेले नसते; संजय राऊतांचा प्रहार
Gudi Padwa 2026 Pune: गॅस टंचाईमुळे गुढीपाडव्याला 'कॉमन मॅन'ला भुर्दंड, साखरेच्या माळांच्या किंमतीत मोठी वाढ
गॅस टंचाईमुळे गुढीपाडव्याला 'कॉमन मॅन'ला भुर्दंड, साखरेच्या माळांच्या किंमतीत मोठी वाढ
'अमेरिकन नेव्ही लावतो, 20 पटीने हार्डर हल्ला करतो अन् बरंच काही'..! 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'साठी वल्गना करणाऱ्या ट्रम्पना इराणनं गुडघ्यावर आणलं; आता ट्रम्प चीन, जपान, ब्रिटनला विनंती करत काय म्हणाले?
'अमेरिकन नेव्ही लावतो, 20 पटीने हार्डर हल्ला करतो अन् बरंच काही'..! 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'साठी वल्गना करणाऱ्या ट्रम्पना इराणनं गुडघ्यावर आणलं; आता ट्रम्प चीन, जपान, ब्रिटनला विनंती करत काय म्हणाले?
Pune Accident News: भरधाव कारवरील नियंत्रण सुटलं, कार थेट 10 फुट खड्ड्यात गेली अन्...; पुण्यात भीषण अपघात
भरधाव कारवरील नियंत्रण सुटलं, कार थेट 10 फुट खड्ड्यात गेली अन्...; पुण्यात भीषण अपघात
Devendra Fadnavis on gas Shortage: मोदीजी सगळं नीट करतील विश्वास ठेवा, गॅस टंचाईबाबत फडणवीसांकडून नागरिकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न
मोदीजी सगळं नीट करतील विश्वास ठेवा, गॅस टंचाईबाबत फडणवीसांकडून नागरिकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न
Maharashtra Weather Update : राज्यात उन्हाचा तडाखा वाढला; सोमवारपासून शाळांच्या वेळेत बदल, तर काही भागांत अवकाळीचा 'यलो अलर्ट'
राज्यात उन्हाचा तडाखा वाढला; सोमवारपासून शाळांच्या वेळेत बदल, तर काही भागांत अवकाळीचा 'यलो अलर्ट'
Embed widget