पुणे: पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्शे अपघात (Pune Porsche Accident) प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. येरवडा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहायक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. एका अल्पवयीन तरूणाने १९ मे २०२४ रोजी पुण्यातील कल्याणीनगर (Pune Porsche Accident) भागात एका भरधाव पोर्शे कारने २ जणांचा जीव घेतला होता. अपघात प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत येरवडा पोलिस ठाण्याचे २ अधिकारी शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहेत.(Pune Porsche Accident) 

Continues below advertisement

पोलीस शिपाई अमित शिंदे आणि आनंदा भोसले या दोघांना पाच वर्ष पदाच्या मूळ वेतनावर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्यक्षदर्शी म्हणून घटनास्थळी पोहचलेल्या दोन पोलिसांनी ही माहिती कंट्रोल रुमला न कळवल्याने अपघाताची माहिती रात्री ऑन ड्युटी असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहचली नव्हती, त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली आहे.(Pune Porsche Accident) 

Pune Porsche Accident : नेमका कसा घडला होता अपघात?

19 मे 2024 च्या रात्री पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात एका हाय-स्पीड पोर्शे कारने दुचाकीवरून जाणाऱ्या दोन अभियंत्यांना धडक दिली होती. दोन्ही अभियंते (अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया) यांचा या अपघातात जागीच मृत्यृ झाला होता. अपघाताच्या वेळी गाडी चालवणारा तरूण हा 17 वर्षे आणि 8 महिन्यांचा होता आणि तो दारू पिलेला होता. पुणे पोलिसांनी त्याला प्रौढ म्हणून वागवण्याची मागणी केली होती, कारण तो 18 वर्षांपेक्षा फक्त 4 महिने कमी वयाचा होता.

Continues below advertisement

अपघातानंतर काय घडलं?

सुरुवातीला पोलिसांनी निष्काळजीपणे गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल केला होता, परंतु जेव्हा आरोपी दारू पिऊन असल्याचे उघडकीस आले तेव्हा प्रकरण गंभीर झाले. सुरुवातीला, बाल न्याय मंडळाने (जेजेबी) अवघ्या 14 तासांत आरोपीला 100 शब्दांचा निबंध, 'समाजसेवा' आणि 'अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे' अशा अटी घालून जामीन मंजूर केला होता. यामुळे देशभरात संताप आणि संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर झालेल्या टीकेनंतर प्रकरण जोरदार चर्चेत आलं होतं.