पुणे/पिंपरी चिंचवड : पुणे आणि पिंपरी चिंचवडला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारुकांडात (Pune Liquor Poisoning Case) मोठा ट्विस्ट समोर आला आहे. मिथेनॉलचा पुरवल्या प्रकरणी सीआयडीने ठाण्यातून अटक केलेले दोघे बापलेक निघाले. रेक्स इंटरनॅशनल कंपनी ही त्यांच्या मालकीची असून या दोघांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे योगेश व्हानखेडेला (Pune Liquor Poisoning Case) मिथेनॉल पुरवले. याप्रकरणी या बापलेकांला सीआयडीने अटक केली आहे. अरुण जगदीश चौबे आणि त्याचा मुलगा अभिषेक अरुण चौबे अशी त्यांची नावं आहेत. चौबे बाप-लेकाने विक्री केलेल्या मिथेनॉलचा (Pune Liquor Poisoning Case) वापर करुन योगेशने विषारी दारु बनवली. त्याचं दारूचं सेवन केल्याने 25 जणांचा मृत्यू झाला.(Pune Liquor Poisoning Case)

दापोडी आणि हिंजवडी परिसरातील विषारी दारुकांडाचा तपास करत असताना सीआयडी मिथेनॉलचा पुरवठा करणाऱ्या कंपनीपर्यंत पोहचली. या तपासात ठाण्यातील रेक्स इंटरनॅशनल कंपनीचे मालक अरुण चौबे आणि अभिषेक चौबे या बापलेकाला ती चूक भोवली. त्यानंतर सीआयडीने नारपोली परिसरातून दोघांना अटक केली. बनावट जीएसटी क्रमांक आणि प्रदीप शर्मा यांच्या नावाचं बनावट आधार कार्ड वापरून योगेश व्हानखेडेला 17 हजार 500 रुपयांना 210 लिटर मिथेनॉल पुरवण्यात आलं. हेच मिथेनॉल विषारी दारूमध्ये मिसळण्यात आलं आणि त्यातून 25 जणांचा मृत्यू झाला. या बापलेकाला पिंपरी न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या कोठडीत सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल डेटा आणि आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी सुरू झाली. या तपासात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.(Pune Liquor Poisoning Case)

Pune Liquor Poisoning Case:  योगेश व्हानखेडेने अवघ्या 6600 रुपयांसाठी 22 जणांचा जीव घेतला

विषारी दारू प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली. योगेश व्हानखेडेने अवघ्या 6 हजार 600 रुपयांसाठी 18 जणांचा जीव घेतला. मिथेनॉल आणि दारू खरेदी करण्यासाठी योगेशने केलेला खर्च आणि त्याने मिथेनॉल मिक्स करुन विक्री केलेली दारू यातील फरक काढला तर 6 हजार 600 रुपयांचा येतो. हे ऐकून विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंनी चिंता व्यक्त केली. अशी घटना भविष्यात घडू नये म्हणून पोलिसांनी आता तरी दारू अड्डे उद्वस्थ करावेत. मी मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी करणार असल्याचं बनसोडे म्हणालेत.

Pune Liquor Poisoning Case: योगेश व्हानखेडेने 6600 रुपयांसाठी 18 जणांचा जीव घेतला

- योगेश वानखेडेने 210 लिटर मिथेनॉल खरेदी केलं - 17500 रुपये मोजले

- 9 मे ला ही खरेदी केली

- 23 मे ला मिथेनॉलचा प्रयोग करायचं ठरवलं

- मग 35 लिटर चे 1 ड्रम - 1900 रुपये

- याप्रमाणे 5 ड्रम - 9500 रुपयांची खरेदी केली

- 5 ड्रममध्ये 5 ड्रम पाणी मिस्क केले आणि 10 ड्रम बनवले

- या 10 ड्रममध्ये निम्म्याहून अधिक मिथेनॉल मिक्स केलं आणि त्याचे 12 ड्रम बनवले

- मिथेनॉल 17500 + 5 ड्रम दारुचे 9500 = एकूण 27000 रुपये खर्च

- प्रति ड्रम 2800 रुपये प्रमाणे 12 ड्रमची विक्री केली

- यातून 33 हजार 600 रुपये मिळाले

- खरेदीसाठी झालेला खर्च आणि विक्रीतून मिळालेले पैसे यातील फरक

- 33600 - 27500 = 6 हजार 600 रुपयांचा फायदा झाला