एक्स्प्लोर

Bhigwan Kidnapping Case: अपहरण झालेल्या तरूणीला शोधण्यासाठी 6 टीम रवाना; कॉल डिटेल्स अन् व्हॉट्सॲपचाही डेटा मागवला, गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप मोर्चासाठी जाणार

Bhigwan Kidnapping Case: कुणीही ताणतणावाचे वातावरण निर्माण करू नये. पोलिसांकडून जन आक्रोश मोर्चाला कोणतीही परवानगी देण्यात आली नाही, अशी माहिती संदीपप सिंह गिल यांनी दिली आहे.

पुणे : इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात लग्नाच्या खरेदीसाठी आई आणि भावासोबत गेलेल्या एका तरुणीचे भरदिवसा अपहरण झाल्याची (Bhigwan Kidnapping Case) धक्कादायक घटना काल (मंगळवारी ता. १७) उघडकीस आली आहे. दोन तरुणांनी तरुणीच्या आई व भावाच्या डोळ्यांत तिखट फेकून तरुणीचे नेल्याचा आरोप आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण-तरुणीमध्ये मोबाईलवरून संपर्क असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे ही घटना अपहरणाची (Bhigwan Kidnapping Case) आहे की प्रेमसंबंधातून घडलेला प्रकार, याबाबत विविध शक्यता तपासल्या जात आहेत. दरम्यान या घटनेप्रकरणी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी माहिती देताना सांगितलं की, आरोपीला शोधण्यासाठी (Bhigwan Kidnapping Case) सहा टीम रवाना केले आहेत. गोपीनीय आणि तांत्रिक तपास सुरू आहे. काल वातावरण तापलं होतं, सर्व समाजाच्या प्रतिनिधी सोबत आमचे बोलणे झाले आहेत, पोलीस काटेकोरपणे तपास करीत आहे असंही गिल यांनी म्हटलं आहे.(Bhigwan Kidnapping Case) 

कुणीही ताणतणावाचे वातावरण निर्माण करू नये. पोलिसांकडून जन आक्रोश मोर्चाला कोणतीही परवानगी देण्यात आली नाही, कुटुंबाला आम्ही माहिती दिली तसेच आम्ही त्यांच्याकडून देखील माहिती घेतली आहे, सर्व प्रतिनिधी आम्हाला सहकार्य करत आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी आमचे प्रयत्न (Bhigwan Kidnapping Case) सुरू आहेत. पोलीस आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन आम्ही केले आहे. आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. आरोपी आणि पीडित एकमेकांच्या घराशेजारी राहतात, ते संपर्कात होते, याचा तपास सुरू आहे, बाकी माहिती तपास पुर्ण झाल्यानंतर समोर येईल असंही संदीप सिंह गिल यांनी म्हटलं आहे. (Bhigwan Kidnapping Case) 

हिंदू जन आक्रोश निषेध मोर्चाला पडळकर आणि संग्राम जगताप लावणार हजेरी

पोलिसांनी हिंदू जन आक्रोश निषेध मोर्चाला परवानगी नाकारली असताना मोर्चा काढण्यावर ते ठाम असल्याची माहिती आहे. या मोर्चाला भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप लावणार हजेरी  लावणार आहेत, दुपारी साडे तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडणार आहेत. गुन्हेगारांना अटक करावी, तसेच मुलगी शोधून ताब्यात द्यावी ही प्रमुख मागणी असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.(Bhigwan Kidnapping Case) 

आतापर्यंत या प्रकरणात काय झालं?

- काल दुपारी साडे तीनच्या दरम्यान लग्नाची खरेदी करून जात असताना भावाच्या आईच्या डोळ्यात चटणी टाकून मुलीचा अपहरण करण्यात आलं.
- रात्री मोठ्या संख्येने पोलीस ठाण्याबाहेर जमाव जमला होता.
- पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करावी या मागणीसाठी भिगवन बंदची हाक देण्यात आली.
- रात्री पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या दिल्यानंतर पुणे सोलापूर हायवे रोखून धरण्यात आला.
- अपहरण झालेल्या मुलीचे आणि मुलाचे घर शेजा शेजारी आहे.
- दोघांच्यात एक महिनाभरापासून फोनवर बोलणं होत होतं असे कॉल डिटेल्स पोलिसांनी काढलेत.
- व्हॉट्सअॅप माध्यमातून काय बोलणं झालं हे पोलीस काढत आहेत.
- मुलीचे वय 21 वर्ष आहे.
- अद्यापही मुलीचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलं नाही.
- अपहरण झालेल्या मुलीचे 22 तारखेला लग्न आहे.
- आई, भाऊ आणि ती लग्नाच्या खरेदीवरून घरी जात असताना अपहरण करण्यात आलं आहे. 
- आरोपी आणि अपहरण झालेली मुलगी एकमेकांना लहानपणापासून ओळखतात.
- शोधासाठी पोलिसांनी सहा पथके रवाना केली आहेत.
- पोलिसांनी 165 किलोमीटरचा रूट मॅप केला आहे.
- यामध्ये कोणताही धार्मिक ते निर्माण होऊ नये याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी.
- कोणत्याही प्रकारचे मोर्चे काढू नयेत असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
- जर कुणी अशा पद्धतीचे वर्तन केलं तर त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.
- पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली आहे.

 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

VK Singh On Ajit Pawar Plane Crash: सीआयडीच्या चौकशीत VSR कंपनीच्या मालकाचा धक्कादायक जबाब; अजितदादांच्या अपघातावर काय म्हणाले?
सीआयडीच्या चौकशीत VSR कंपनीच्या मालकाचा धक्कादायक जबाब; अजितदादांच्या अपघातावर काय म्हणाले?
Baramati Accident News: काम आटोपून घरी परतताना काळाचा घाला, बारामतीत भीषण अपघातात ग्रामसेवकाचा दुर्दैवी अंत, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको
काम आटोपून घरी परतताना काळाचा घाला, बारामतीत भीषण अपघातात ग्रामसेवकाचा दुर्दैवी अंत, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको
Pune Porsche Accident : कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट; पोराच्या हाती 17 व्या वर्षी पोर्शे कारचं स्टिअरिंग देणाऱ्या विशाल अग्रवालांना जामीन मंजूर
कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट; पोराच्या हाती 17 व्या वर्षी पोर्शे कारचं स्टिअरिंग देणाऱ्या विशाल अग्रवालांना जामीन मंजूर
Pune Gas Cylinder : गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे पुण्यातील हॉटेल बंद होण्याची शक्यता; नोकरदार, विद्यार्थी अन् नागरिकांची तारांबळ
गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे पुण्यातील हॉटेल बंद होण्याची शक्यता; नोकरदार, विद्यार्थी अन् नागरिकांची तारांबळ
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Khanawal Gas Shortage : पुण्यात गॅस तुटवड्यांमुळे अनेक खानावळी बंद;बॅचलर,विद्यार्थ्यांचे हाल
Vishakha Subhedar Son Return to Mumbai : कुवेतमधून सुखरुप परतला विशाखा सुभेदार यांचा मुलगा
BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
Mhada House : धूळ खात पडलेली घरे विक्रीला; म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळाच्या तिजोरीत तब्बल 800 कोटींची भर
धूळ खात पडलेली घरे विक्रीला; म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळाच्या तिजोरीत तब्बल 800 कोटींची भर
युद्धामुळे गॅस महागला आता सोन्याच्या भावातही मोठी उसळी, 1 तोळं सोनं किती रुपयांनी महागलं? जाणून घ्या लेटेस्ट दर
युद्धामुळे गॅस महागला आता सोन्याच्या भावातही मोठी उसळी, 1 तोळं सोनं किती रुपयांनी महागलं? जाणून घ्या लेटेस्ट दर
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
Maharashtra Weather Update: मुंबई तापणार! 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाचा महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा
मुंबई तापणार! 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाचा महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा
Rohini Khadse : गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
BCCI Give Team India Prize Money T20 World Cup 2026 मोठी बातमी: विश्वविजेत्या टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; आयसीसीपेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; ICC पेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
Buldhana Crime: तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
Embed widget