पुणे : बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर नेतेमंडळी आणि बीडमधील (Beed) नेत्यांच्या आरोपात नाव असलेल्या वाल्मिक कराडेने अखेर पोलिसांना शरणागती पत्करली आहे. मी खंडणीप्रकरणातील गुन्ह्यात आरोपी असून मी अटकपूर्व जामीनासाठी देखील अर्ज करु शकतो, पण मी सीआयडी पोलिसांना शरण येत असल्याचे वाल्मिक कराडने पोलिसांना शरण येण्यापूर्वी बनवलेल्या एका व्हिडिओतून म्हटलं. तसेच, माझ्यावर राजकीय सुडातून हे आरोप केले जात असून संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येतील आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे, अशी माझी मागणी असल्याचेही कराड यांनी म्हटलं. त्यानंतर, एका नव्या कोऱ्या स्कॉर्पिओ कारमधून वाल्मिक कराड (walmik karad) पोलिसांना शरण आल्याचं पाहायला मिळालं. 

Continues below advertisement

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर संतोष देशमुख हत्याप्रकरणात बीड पोलीस आणि सीआयडीची पथके वाल्मिक कराड यांच्या मागावर होती. मात्र, वाल्मिक कराड यांनी तब्बल 23 दिवस पोलिसांना सहजपणे गुंगारा दिला. काहीवेळापूर्वीच ते स्वत:हून पुण्यातील सीआयडी कार्यालयात हजर झाले. त्यामुळे वाल्मिक कराड यांचा शोध संपला असला तरी यानिमित्ताने एक नवा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण, वाल्मिक कराड हा खूनाच्या गुन्ह्यात आरोपी नसून ते खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी आहे. तर, त्याची अटक ही खंडणीच्या गुन्ह्यात झाली आहे. त्यामुळे, वाल्मिक कराड यांचा हत्याप्रकरणात हात आहे का, या अँगलने पोलीस तपास करणार का, हाही प्रश्न उपस्थित होत आहे. 

MH.23.BG.2231 या पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडी कार्यालयात दाखल झाला आहे, विशेष म्हणजे ही गाडी सीआयडीची नसून खासगी मालकीची आहे. त्यामुळे, पोलिसांनी त्याला त्याच्या खासगी गाडीने कसे काय येऊ दिले, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. तर, सीआयडीला शरण येण्यापूर्वीच त्याने व्हिडिओ बनवून माध्यमांपुढे आपली प्रतिक्रिया देखील दिली आहे. त्यामुळे, पोलिसांनी त्याला एवढी सवलत कशी दिली, किंवा पोलिस यंत्रणांना गुंगारा देऊन त्याने पद्धतशीरपणे शरणागती पत्करली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

Continues below advertisement

ती स्कॉर्पिओ कोणाची

दरम्यान,वाल्मिक कराड ज्या गाडीतून सीआयडी कार्यालयात आला, त्या गाडीचा क्रमांक हा MH.23.BG.2231 असा आहे. ही गाडी अनिता शिवलिंग मोराळे नामक व्यक्तीच्या नावे असून तो शिवलिंग मोराळे ही व्यक्ती बीड जिल्ह्यातील पालीचा रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर, शिवलिंग मोराळे हा मंत्री धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता असल्याचे दिसून येते. मात्र, याबाबतही अधिकृत माहिती लवकरच समोर येईल. 

हेही वाचा

Walmik Karad: 23 दिवस पोलिसांना गुंगारा, शरण येण्याची वेळ आणि स्थळ स्वत:च ठरवलं; वाल्मिक कराडांच्या शरणागतीनंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह