Continues below advertisement

पुणे : पार्थ पवार (Parth Pawar) यांचे जमीन प्रकरण वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने जय पवारांची (Jay Pawar) नगराध्यक्ष पदाची उमेदवारी हुकली का असा प्रश्न पडला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जय पवार हे बारामती नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नसणार हे आज स्पष्ट केले. मात्र तरी देखील जय पवारांच्या उमेदवारीला काट कोणामुळे मिळाली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बारामती नगराध्यक्ष पदासाठी जय पवार उमेदवार असतील अशी चर्चा मागच्या आठवड्यात होती. मात्र पार्थ पवारांचे प्रकरण पुढं आलं आणि जय पवारांची संधी हुकली का असा सवाल विचारला जातोय.

Continues below advertisement

जय पवार उपमुख्यमंत्री अजित पवारांच धाकट चिरंजीव, परंतु थोरल्याच्या प्रतापामुळे धाकट्यावरती अन्याय झालाय का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पार्थ पवारांच जमीन प्रकरण समोर आलं आणि त्यामुळे जय पवारांची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी हुकली अशा चर्चांना उधाण आल आहे.

Parth Pawar Land Deal : पार्थच्या पाठीशी पवार कुटुंब

पार्थ पवार प्रकरणी आजोबा शरद पवार वगळता संपूर्ण कुटुंब पार्थ पवारांच्या पाठीशी उभा राहिलेल आपल्याला पाहायला मिळते. आत्या सुप्रिया सुळे यांनी तर थेट पार्थ काही चूक करणार नाही असं म्हणत त्याची पाठराखणच केली. तर भाऊ रोहित पवार यांन भाजपला प्रश्न विचारले. तर वडील म्हणून अजित पवार देखील पार्थ पवार यांच्या पाठीमागे आहेत.

गेल्या महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीतील एका जाहीर कार्यक्रमात पोरांना किती जरी कमावून ठेवलं तरी कमीच असतं असं वक्तव्य केलं होतं. उपमुख्यमंत्री अजित पवारांना हे प्रकरण आगामी काळात उघडकीस येणार याची कुणकुण लागली होती का असावा या निमित्ताने उपस्थित होते.

जय पवार यांच्या उमेदवारीवरून अजित पवारांनी जरी त्याला पूर्णविराम दिला असला तरी आगामी काळात जर गटबाजीचे पेव फुटलं तर अचानक जय पवारांचे नाव पुन्हा रिंगणात येऊ शकतं अशी शक्यता नाकारता येत नाही.

Baramati Election : दुसरा उमेदवार दिला तर गटबाजीचा धोका

जय पवार हे बारामती नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील तर नगराध्यक्षाची निवडणूक अजित पवारांना सोपी जाईल. मात्र जय पवार यांच्या जागी जर दुसरा उमेदवार उभा केला त्याचा अंतर्गत गटबाजीचा फटका उमेदवाराला बसणार हे सांगण्यासाठी कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही. जरी आता अजित पवारांनी या चर्चा नाकारल्या असल्या तरी फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

ही बातमी वाचा: