बारामती: बारामतीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिवी दिल्याच्या कारणावरून दोन मित्रांनी मित्राची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बारामती शहरात (Baramati Crime News) वादातून दोन मित्रांनी मिळून तिसऱ्या मित्रावर दगडाने प्राणघातक हल्ला करत त्याची निर्घृण हत्या (Baramati Crime News) केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत अविनाश उर्फ माऊली धनंजय लोंढे या तरुणाचा मृत्यू झाला आहे.(Baramati Crime News)

Continues below advertisement

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी अविनाशच्या डोक्यात दगड घालून तो मरेपर्यंत अमानुष मारहाण केली. हल्ल्यानंतर अविनाश गंभीर जखमी अवस्थेत पडून होता आणि काही वेळातच त्याचा मृत्यू (Baramati Crime News) झाला. घटना लक्षात येताच संशयित आरोपींना झालेल्या कृत्याची जाणीव झाली. समीर इक्बाल शेख आणि प्रथमेश राजेंद्र दळवी हे दोघे पोलीस ठाण्यात स्वतः हजर झाले असून त्यांनी पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी तात्काळ दोघांनाही ताब्यात घेतले असून घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून हत्या नेमकी कोणत्या कारणातून घडली, याचा शोध पोलीस घेत आहेत.(Baramati Crime News)

Baramati Crime News: नेमकं काय घडलं?

बारामतीतील जुन्या मोरगाव रस्त्यावर तीन मित्रांची मैफील जमली होती, तिघे दारू पीत होते. पिताना काही गोष्टी सुरू झाल्या आणि नशा चढू लागली, तशी त्यांच्यात शिवीगाळ सुरू झाली आणि शिवीगाळचे रूपांतर वादात झालं. माऊली धनंजय लोंढे याने केलेली शिवागाळ दोघांच्या जिव्हारी लागली आणि दोन्ही मित्रांनी नशेतच त्याला संपवलं. या तिघांचा वाद इतका वाढला की, संतप्त झालेल्या दोघांनी बाजूला असलेला एक दगड उचलला आणि तिसऱ्या मित्राच्या डोक्यात दगड घालून त्याला ठेचून मारलं. त्यांचा मित्र मरेपर्यंत दोघांनी त्याला दगडाने मारहाण केली आणि त्याचा डोक्याचा चेंदामेंदा केला. काही वेळ तो तिथेच विव्हळत पडला होता.

Continues below advertisement

या घटनेनंतर भानावर आलेल्या दोन्ही मित्रांनी थेट पोलीस ठाण्यात हजेर लावली आणि त्यांनी पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशीरा घडलेल्या या घटनेत अविनाश उर्फ माऊली धनंजय लोंढे (वय 20, राहणार बारामती) याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी समीर इक्बाल शेख आणि प्रथमेश राजेंद्र दळवी या दोघांना ताब्यात घेतले आहे. या घटनेनं शहरात एकच खळबळ उडाली. या घटनेनं शहर हादरलं आहे.