Baramati Crime News: स्टंट करणाऱ्या वाहन चालकाला हटकलं; रागात थेट अंगावर गाडी घातली, पोलीस जखमी, बारामतीमधील धक्कादायक घटना
Baramati Crime News: संतोष दत्तू कांबळे असं या जखमी पोलीस हवालदाराचे नाव आहे. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकावर बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा ही दखल करण्यात आला आहे.

बारामती: रात्रीच्या वेळी रस्त्यात स्टंट करणाऱ्या वाहन चालकाला हटकले म्हणून बारामतीत (Baramati Crime News) एका पोलिस हवालदाराच्या अंगावर गाडी घालून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेत बारामती तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार जखमी झाला आहे. संतोष दत्तू कांबळे असं या जखमी पोलीस हवालदाराचे नाव आहे. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकावर बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा ही दखल करण्यात आला आहे. जखमी पोलीस हवालदार कांबळे यांना बारामती मधील भाग्यजय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. बारामती शहरातील विद्या प्रतिष्ठानकडे जाणाऱ्या रस्त्यावर 29 मे रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे.
नेमकं काय घडलं?
एका पोलिस हवालदाराने रात्रीच्या वेळी रस्त्यात स्टंट करणाऱ्या वाहन चालकाला हटकले. त्यानंतर त्याने रागाच्या भरात पोलिस हवालदाराच्या अंगावर गाडी घालून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. बारामती तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार जखमी झाला आहे. संतोष दत्तू कांबळे असं या जखमी पोलीस हवालदाराचे नाव आहे. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकावर बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा ही दखल करण्यात आला आहे.
पुण्यात कारने 11 जणांना उडवलं, पोलीस घटनास्थळी दाखल
पुण्यातील भावे हायस्कूलजवळ एका कारनं 11 विद्यार्थ्यांना उडवलं आहे.एमपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कारनं उडवल्याची माहिती आहे. जखमी विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विश्रामबाग पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुण्यातील मध्यवर्ती भागात भावे हायस्कूलजवळ स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी त्या परिसरात राहतात. संध्याकाळी सगळे विद्यार्थी तिथं चहा घेत होते. चालकाचं नियंत्रण कारवरील सुटल्यानंतर त्यानं विद्यार्थ्यांना धडक दिली. या घटनेत 7-8 विद्यार्थी जखमी झाले आहेत. विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार सुरु आहेत, 2 विद्यार्थी गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.
विचित्र अपघातात डस्टर कार चालकानं दुचाकीस्वार दोघांना चिरडलं
ऑटोतील प्रवाशांना राष्ट्रीय महामार्गालागत उतरविल्यानंतर चालकानं ऑटो महामार्गावर वळवला. यावेळी पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील दोघांची ऑटोला जबर धडक बसली आणि दोघेही महामार्गावर कोसळले. याच वेळी पाठीमागून भरधाव आलेल्या डस्टर कार चालकांनं महामार्गावर कोसळलेल्या दुचाकीस्वार दोघांनाही बेदरकारपणे चिरडलं. ही भीषण आणि विचित्र दुर्घटना नागपूर - कोलकत्ता राष्ट्रीय महामार्गावरील भंडारा जिल्ह्यातील साकोलीच्या उकारा फाट्यावर घडली. मृतक दोघेही गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील असून ते नागपूरला रोजगाराच्या शोधात निघाले असताना ही दुर्दैवी घटना घडली. यादवराव वघारे (36) आणि जितेंद्र उपराडे (28) असं मृतकांचं नावं आहे. याप्रकरणी साकोली पोलिसांनी ऑटो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
























