Pune Police Dhananjay Bharbhai News :  राष्ट्रपती पोलीस पदकांची (President's Police Medal) आज (25 जानेवारी) घोषणा करण्यात आली. यात महाराष्ट्रातील एकूण 74 पोलीसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यात पुणे पोलीस (Pune Police) आयुक्तालयातील विशेष शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस फौजदार धनंजय छबनराव बारभाई (Dhananjay barbhai) यांना प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. पोलीस दलात त्यांनी बजावलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत भारत सरकारने घेतली आहे. त्यांना त्यांनी केलेल्या सेवेबद्दल हा पुरस्कार जाहीर केला आहे. 


धनंजय छबनराव बारभाई हे मुळचे पुंरदरचे.  1990 साली पोलीस सेवेत रुजू झाले.  त्यांनी आतापर्यंत शिवाजी नगर पोलीस मुख्यालय, फरासखाना, सहकारनगर, स्वारगेट, दत्तवाडी, भारती विदयापीठ विशेष शाखा, पुणे शहरात तसेच पोलीस उप-आयुक्त कार्यालया परिमंडळ-1 आणि परिमंडळ-3, तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त, कार्यालय वानवडी तसेच स्वारगेट विभाग पुणे शहरात कर्तव्य बजावलेले आहे. आतापर्यंत  त्यांना एकून 277 बक्षिसं आणि  63, 414/- असे रोख स्वरूपात मिळाले आहेत. 


पुणे शहरातील पहिली मोक्का कारवाई केली...


पुण्यातील खुनाच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारांना अटक करण्यासाठी त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना मदत केली होती. अर्बन नक्शलच्या केससंदर्भात महत्वाची कामगिरी केली. त्यावेळी 5000 रुपयांचं रिवार्ड मिळाला होता. 2003 साली स्वारगेट परिसरात हत्या झाली होती. त्यावेळी  मोरोतराव देशमुख हे तपास अधिकारी होते. या हत्येचा छडा लावण्यासाठी आणि गुन्हेगाराला पकडण्यासाठी धनंजय छबनराव बारभाई यांनी जीवाचं रान केलं होतं. या गुन्ह्यातील आरोपीवर पुण्यातील पहिला मोक्का लागला होता. पुणे शहरातील पहिला मोक्का लावणारे पोलीस फौजदार म्हणून त्यांना ओळखले जाते.


खून, खूनाचा प्रयत्न, दरोडा, जबरीचोरी, घरफोडी, वाहनचोरी, फसवणुक एट्रासिटी, पोक्सो, इत्यादी गुन्हेगारांचे विरुध्द मा.न्यायालयात दोषारोप पत्र पाठविण्यासाठी त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. यातील अनेक गुन्ह्यातील आरोपींना  तुरुंवासाची शिक्षा झालेली आहे. त्याचं पोलीस दलातील उत्कृष्ठ काम पाहून 2013 मध्येही त्याचा सन्मान करण्यात आला होता. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी पोलीस पदक “सन्मानचिन्ह" प्रदानाने गौरवण्यात आलं आहे. त्याच  उत्कृष्ठ कामगिरीची दखल आता देशपातळीवर घेण्यात आली आहे. गुणवत्तापुर्ण सेवेबद्दल भारत सरकारने 26 जानेवारी 2023करीता मा. राष्ट्रपतीचे पोलीस पदक जाहीर झालेले आहे. मी केलेल्या कामगिरीचं आज चिज झाल्यासारखं वाटत आहे, असं ते म्हणतात.