पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर जनावरांचा आरामात वावर, प्रवाश्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
एबीपी माझा वेब टीम | 18 Jun 2019 11:54 PM (IST)
एक्सप्रेस वेवरील यंत्रणा अप्रत्यक्षपणे प्रवाश्यांच्या जीवाशीच खेळत आहे. एक्सप्रेस वेवरील वाहन प्रतितास 120 किलोमीटरच्या वेगाने धावतात. अशात म्हशी, गाई, शेळ्या, कुत्री जर मार्गावर आली तर चालक वाहनावर ताबाच ठेवू शकत नाही.
पिंपरी-चिंचवड : पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर जनावरं ही आता आरामात वावरु लागली आहेत. त्यामुळेच आता पुणे-मुंबई एक्सप्रेस वेला खरचं एक्सप्रेस वे म्हणायचं का असा प्रश्न पडला आहे. आधीच अपघातंनी वेढलेल्या या मार्गावर जनावरांचा वावर वाढल्याने एक्सप्रेस वेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. एक्सप्रेस वेवरील यंत्रणा अप्रत्यक्षपणे प्रवाश्यांच्या जीवाशीच खेळत आहे. एक्सप्रेस वेवरील वाहन प्रतितास 120 किलोमीटरच्या वेगाने धावतात. अशात म्हशी, गाई, शेळ्या, कुत्री जर मार्गावर आली तर चालक वाहनावर ताबाच ठेवू शकत नाही. परिणामी होणाऱ्या अपघातात प्रवाश्यांना जीव ही गमवावा लागू शकतो. Mum-Pune Express Way | मुंबई-पुणे एक्सप्रेसवर गाडी दुभाजकाला धडकून अपघात, चालकाचा मृत्यू | ABP Majha पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर याआधी अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला आहे. तर दोन वर्षांपूर्वी चरायला सोडलेल्या म्हशी द्रुतगतीवर आल्याने, एका शेतकऱ्यावर बेफिकीरीचा गुन्हा तळेगाव पोलिसात दाखल झाला होता. या घटनेनंतरही शेतकरी त्यांच्या जनावरांवर लक्ष देत नाही आहे. तसेच प्रशासन यंत्रणाही एक्सप्रेस वे लगतच्या जाळ्या बसवण्याकडे कानाडोळा करत आहेत. त्यामुळेच प्रशासन यंत्रणेचा हा अक्षम्य हलगर्जीपणा प्रवाश्यांच्या जीवावर बेतणारा ठरतो आहे.