पुणे: पुणे महानगरपालिकेत (Pune Municipal Corporation Election 2025)  आंदेकर विरुद्ध कोमकर (Andekar VS Komkar) असा सामना रंगणार असल्याचं दिसून येत आहे. गुंड गणेश कोमकर याची पत्नी कल्याणी कोमकर हिने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मुलाखत दिली. प्रभाग क्रमांक २३ रविवार पेठ आणि नारायण पेठमधून कल्याणी कोमकर निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे. १९ तारखेला शिवसेना भवन येथे जाऊन कल्याणी हिने निवडणुकीसाठी सुरू असलेल्या इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखत दिली आहे. यावेळी नीलम गोऱ्हे, रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी कल्याणी हिची मुलाखत घेतली, तर कालच कल्याणी हिने आंदेकर कुटुंबाला उमेदवारी दिल्यास आत्मदहण करणार असा इशारा दिला आहे.

Continues below advertisement

तर पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत (Pune Municipal Corporation Election 2025) आंदेकर कुटुंबातील व्यक्तीला तिकीट देऊ नका, अशी विनंती आयुष कोमकरच्या (Ayush Komkar) आईने राजकीय पक्षाकडे केली आहे. पुण्यातील माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांचा नातेवाईक असलेल्या गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याची गोळीबार करून हत्या करण्यात आली होती. या हत्येमुळे पुण्यासह राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. यात गोळीबाराच्या घटनेनंतर आंदेकर टोळीतील वाद अधिक चिघळला. या प्रकरणात बंडू उर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर (70, रा. नाना पेठ) याच्यासह 13 जणांविरोधात खून आणि मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान आता आयुष कोमकरच्या आई कल्याणी कोमकर यांनी राजकीय पक्षाकडे विनंती करत जर पक्षांनी उमेदवारी त्यांना दिली तर त्या पक्षाच्या कार्यालयापुढे आत्महदहनाचा इशारा दिला आहे.

Pune Ayush Komkar Case : न्याय देता येत नसेल तर आमच्यावरती अन्याय तरी करू नका, अन्यथा मी....

पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर यांच्या कुटुंबातील दोन महिलांना आगामी पुणे महापालिका निवडणूक लढवण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली आहे. बंडू आंदेकर यांच्यासह माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर आणि माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली आंदेकर या तिघांना निवडणूक रिंगणात उतरण्यास न्यायालयाने हिरवा कंदिल दाखवला आहे. दुसरीकडे आगामी महापालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून आंदेकर कुटुंबातील दोन सदस्य निवडणूक रिंगणामध्ये उतरण्याची चर्चा आहे. परिणामी याच विषयावर बोलताना आयुष कोमकरच्या आईने राष्ट्रवादीसह राजकीय पक्षांना विनंती केली आहे कि, सर्व राजकीय नेत्यांना माझी कळकळीची विनंती आहे जर आम्हाला न्याय देता येत नसेल तर आमच्यावरती अन्याय तरी करू नका. आंदेकरांना निवडणुकीचे तिकीट देऊ नका. माझ्या लहान मुलाचं त्यांनी आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. तरीही असं झाल्यास मी आत्मदहन करून आयुष्य संपवेल, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतलाय. त्यामुळे आता या प्रकरणी राजकीय पक्षाकडून या विनंतीची कितपत दखल घेतली जाते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Continues below advertisement

पुणे महानगरपालिकेसाठी (Pune Municipal Corporation) 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. यंदा पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये मुख्य लढत असून भाजप शिवसेना शिंदे गटसह युती करणार आहे.