एक्स्प्लोर

Amol Kolhe: अमोल कोल्हेंच्या छत्रपती शिवरायांवरील व्याख्यानाला पुण्यात कडाडून विरोध, विद्यार्थ्यांचं थेट विद्यापीठाच्या कुलगुरूंना पत्र; नेमकं कारण काय?

Amol Kolhe: शिवजयंतीनिमित्त पुण्यातल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अमोल कोल्हे यांच्या व्याख्यानाचे आयोजन आज संध्याकाळी करण्यात आले आहे.

Amol Kolhe: शिवजयंतीनिमित्त (Shiv Jayanti 2026) आयोजित करण्यात आलेल्या खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या व्याख्यानाला विरोध झाल्यामुळे पुण्यातील (Pune News) शैक्षणिक वर्तुळात वाद निर्माण झाला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे 20 फेब्रुवारी 2025 रोजी इरावती कर्वे सभागृहात कोल्हे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले असून, काही विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला राजकीय स्वरूप येईल, असा आक्षेप घेतला आहे.

Amol Kolhe: विद्यार्थ्यांचा आक्षेप काय?

‘सकल विद्यार्थी समूहा’च्या वतीने कुलगुरूंना सह्यांचे पत्र देण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंती हा सर्व समाजाच्या सामूहिक चेतनेचा उत्सव असल्याचे नमूद करत, केवळ काही लोकांच्या आग्रहामुळे राजकीय पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला निमंत्रित करणे योग्य नसल्याचा आक्षेप विद्यार्थ्यांनी घेतला आहे. कार्यक्रमाबाबत शिवजन्मोत्सव विद्यार्थी उत्सव समितीला पूर्वकल्पना देण्यात आली नसल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. विद्यापीठ प्रशासनाने अशा प्रकारच्या कार्यक्रमास समर्थन देते का, याबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी, तसेच हा कार्यक्रम रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Amol Kolhe: डॉ. कोल्हे समर्थनार्थही काही विद्यार्थ्यांचे पत्र

दुसरीकडे, काही विद्यार्थ्यांनी डॉ. कोल्हे यांच्या समर्थनार्थ कुलगुरूंना स्वतंत्र पत्र दिले आहे. दरवर्षी विद्यापीठात विविध महापुरुषांच्या जयंतीनिमित्त अभ्यासू आणि प्रेरणादायी वक्त्यांना आमंत्रित केले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असलेल्या व्यक्ती म्हणून अमोल कोल्हे यांचे व्याख्यान विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास समर्थक विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.

Amol Kolhe: अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया

याबाबत खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे की, काही विद्यार्थी संघटनांनी माझ्या व्याख्यानाला विरोध केलाय. मात्र, पुणे विद्यापीठाकडून मला अधिकृत कोणतीही माहिती नाही. त्यामुळे आज चार वाजता होणाऱ्या व्याख्यानाला मी जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची माहिती देणे हे माझं कर्तव्य आहे. राजकीय जोडे बाजूला ठेऊन मी अशा व्याख्यानाला जात असतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Ahilyanagar Crime: 'कॉलेजला जाते' सांगून 15 वर्षीय मुलगी घरातून बाहेर पडली, नराधमांनी अपहरण करून घनदाट जंगलात नेलं, 5 दिवस डांबून ठेवत नको ते केलं, अहिल्यानगरमध्ये नेमकं काय घडलं?

Bhigwan Kidnapping Case: भिगवण अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट; तरूणी मध्यरात्री दीडच्या सुमारास पोलीस ठाण्यात, पळून गेल्यानंतर कुठे कुठे लपले अन् फिरले तपशील समोर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सोलापुरात रंगणार 4 थी 'महिला महाराष्ट्र केसरी'; तारीख ठरली, मानाची गदा अन् बक्षीस देऊन गौरव
सोलापुरात रंगणार 4 थी 'महिला महाराष्ट्र केसरी'; तारीख ठरली, मानाची गदा अन् बक्षीस देऊन गौरव
Baramati Crime News: तोंडाला मास्क बांधून तिघे आले, प्रेमी युगलाला मारहाण करत सोन्या-चांदीचे दागिने पळवले, बारामतीतील धक्कादायक घटना
तोंडाला मास्क बांधून तिघे आले, प्रेमी युगलाला मारहाण करत सोन्या-चांदीचे दागिने पळवले, बारामतीतील धक्कादायक घटना
Pimpri-Chinchwad: आधी शेपूट अन् पाय पकडले, नंतर हवेत फिरवून खाली आपटलं; भटक्या कुत्र्याला अमानुष मारहाण; पिंपरी-चिंचवडमध्ये क्रूरतेचा कळस
आधी शेपूट अन् पाय पकडले, नंतर हवेत फिरवून खाली आपटलं; भटक्या कुत्र्याला अमानुष मारहाण; पिंपरी-चिंचवडमध्ये क्रूरतेचा कळस
जय पवारांनी शेअर केलेला व्हिडिओ मी पाहिला; हवाई उड्डाणमंत्री मुरलीधर मोहोळांकडून दखल, म्हणाले..
जय पवारांनी शेअर केलेला व्हिडिओ मी पाहिला; हवाई उड्डाणमंत्री मुरलीधर मोहोळांकडून दखल, म्हणाले..
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

America Israel Attack Iran : युद्धामुळे सोलापूरच्या द्राक्षांची आखाती देशातील बाजारपेठ बंद
America Israel Attack Iran : इस्रायलचा इराणच्या गोलेस्टन पॅलेसवरही हल्ला, 500 वर्षांपूर्वीच बांधकाम
Jay Pawar on Ajit Pawar : झोपा काढणाऱ्या पायलटवर कारवाई कधी होणार? Special Report
Iran Attack Effect On Market : युद्ध पश्चिम आशियात, माल अडकला बंदरात Special Report
Israel America Attack Iran : इराणकडून हल्ल्याला उत्तर; अमेरिकेचे तळ लक्ष्य Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pandharpur Viral Video : पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण, नो एन्ट्री कारवाईचा पोलिसांचा दावा, व्हिडीओने खळबळ
पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण, नो एन्ट्री कारवाईचा पोलिसांचा दावा, व्हिडीओने खळबळ
संतापजनक... बदलापुरात 5 रुपयासाठी महिलेला लघुशंकेपासून रोखले; आमदाराचं ठिय्या आंदोलन, गुन्हा दाखल
संतापजनक... बदलापुरात 5 रुपयासाठी महिलेला लघुशंकेपासून रोखले; आमदाराचं ठिय्या आंदोलन, गुन्हा दाखल
Sam Curran : वानखेडे स्टेडियमवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, इंग्लंडच्या सॅम करनचा 'पॅट कमिन्सच्या' स्टाईलमध्ये भारताला इशारा
वानखेडेवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, मैदान शांत ठेवणार,इंग्लंडच्या सॅम करनचा इशारा
मोठी बातमी! शासकीय वसतिगृहांच्या नावातून मागासवर्गीय शब्द हटवला; दोन महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय
मोठी बातमी! शासकीय वसतिगृहांच्या नावातून मागासवर्गीय शब्द हटवला; दोन महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय
सोलापुरात रंगणार 4 थी 'महिला महाराष्ट्र केसरी'; तारीख ठरली, मानाची गदा अन् बक्षीस देऊन गौरव
सोलापुरात रंगणार 4 थी 'महिला महाराष्ट्र केसरी'; तारीख ठरली, मानाची गदा अन् बक्षीस देऊन गौरव
शरद पवार दिल्लीला जाणारच, मविआकडून राज्यसभेसाठी नावावर एकमत; दोन नेत्यांच्या मध्यस्थीने तोडगा?
शरद पवार दिल्लीला जाणारच, मविआकडून राज्यसभेसाठी नावावर एकमत; दोन नेत्यांच्या मध्यस्थीने तोडगा?
रंग खेळून पोहोयला गेलेल्या दोघांचा तलावात बुडून मृत्यू; भंडाऱ्यात भीषण अपघातात 1 ठार दोन जखमी
रंग खेळून पोहोयला गेलेल्या दोघांचा तलावात बुडून मृत्यू; भंडाऱ्यात भीषण अपघातात 1 ठार दोन जखमी
Dharashiv Politics : प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही, प्रताप सरनाईकांची स्पष्ट भूमिका
प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही, प्रताप सरनाईकांची स्पष्ट भूमिका
Embed widget